मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /ताजी लिची कशी ओळखाल? ही चार लक्षणं बघूनच करा खरेदी!

ताजी लिची कशी ओळखाल? ही चार लक्षणं बघूनच करा खरेदी!

ताजी लिची कशी ओळखाल?

ताजी लिची कशी ओळखाल?

पिकलेल्या लिचीला गोडसर वास येतो. हा सुगंध गुलाबाच्या सुगंधाप्रमाणे वाटतो. हा नैसर्गिक सुगंध लिचीचा ताजेपणा ओळखण्यासाठी मदत करतो.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 3 जून : उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी रसदार फळं खाल्ली जातात. तसंच काही फळं शरीराला झटपट ऊर्जा आणि थंडावाही देतात. लिची हे याच प्रकारातलं फळ आहे. बाजारात लिची खरेदी करताना अनेकदा फसवणूक होण्याची शक्यता असते. वरून लाल रंगाची दिसली तरीही आतून लिची खराब असू शकते. म्हणूनच लिची खरेदी करताना कोणत्या गोष्टी तपासल्या पाहिजेत, हे आज आपण जाणून घेणार आहोत.  याबाबत ‘नवभारत टाइम्स’नं वृत्त दिलं आहे.

    लिची हे उन्हाळ्यात मिळणारं भरपूर पाणी असलेलं फळ आहे. ते आंबट-गोड असतं. यात पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, कॉपर आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात. डोळे, हृदय यांचं आरोग्य आणि पचन सुधारण्यासाठी लिचीचा फायदा होतो. संसर्गापासून बचाव करण्यासाठीही याची मदत होते. लिची नेहमी खाण्याचा सल्ला दिला जात नाही, मात्र उन्हाळ्याच्या दिवसांत हे आवर्जून खाल्लं जातं. उन्हाळ्यात बाजारात लिची उपलब्ध होतात, मात्र ताजी व चांगली लिची कोणती हे ओळखणं अवघड असतं. त्यामुळे बरेचदा फसवणूक होण्याची शक्यता असते. ताजी लिची ओळखण्यासाठी तिचा रंग, आकार व इतर काही गोष्टी काळजीपूर्वक पाहिल्या पाहिजेत.

    लिचीचा रंग

    लिचीची फळं गुलाबी-लाल रंगाची तसंच बोरासारखी काहीशी तपकिरीही असू शकतात. ही लिची पिकलेली असते. मात्र लिची जर हिरव्या रंगाची असेल, तर ती फळं कच्ची असू शकतात. लिची झाडावरच पिकते. कच्च्या स्वरूपात ती तोडून नंतर पिकवता येत नाही. कच्च्या लिची खाणं धोकादायक ठरू शकतं. त्यात विषारी घटक असतात. त्यामुळे लिची नेहमी पिकलेली लाल-गुलाबी रंगाचीच घ्यावी.

    फळाचा आकार

    लिची ही छोटी छोटी फळं असतात. साधारणपणे 1 इंच व्यास असणारी लिची असेल, तर ती ताजी असू शकते. या लिची व्यवस्थित पिकलेल्या असतात. त्यामुळे त्यांची चवही छान असते.

    मऊ लिची 

    पिकलेल्या लिची थोड्या मऊ असतात. त्या सहज हातानं दाबल्या जातात. मात्र त्या खूपच लिबलिबित असतील, तर त्या घेऊ नयेत. कारण अशा लिची जास्त पिकलेल्या असतात. त्यांची चवही चांगली नसते.

    Morning Routine : सकाळी नाश्त्यात चुकूनही खाऊ नका या गोष्टी, अन्यथा आरोग्यावर होईल गंभीर परिणाम

    लिचीचा वास 

    पिकलेल्या लिचीला गोडसर वास येतो. हा सुगंध गुलाबाच्या सुगंधाप्रमाणे वाटतो. हा नैसर्गिक सुगंध लिचीचा ताजेपणा ओळखण्यासाठी मदत करतो. लिचीमुळे तत्काळ ऊर्जा मिळते व थकवा घालवते. लिचीमुळे त्वचेचं सौंदर्यही वाढतं. उन्हाळ्यात लिची खाणं आरोग्यवर्धक ठरतं

    First published:

    Tags: Fruit