मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /भोपाळची फेमस 'घमंडी लस्सी' आता मुंबईत! कमी कालावधीत झाली सुपरहिट, पाहा Video

भोपाळची फेमस 'घमंडी लस्सी' आता मुंबईत! कमी कालावधीत झाली सुपरहिट, पाहा Video

X
मध्य

मध्य प्रदेशातल्या भोपाळमधील प्रसिद्ध घमंडी लस्सी आता मुंबईतही दाखल झाली असून फक्त दीड महिन्यात ती सुपरहिट झाली आहे.

मध्य प्रदेशातल्या भोपाळमधील प्रसिद्ध घमंडी लस्सी आता मुंबईतही दाखल झाली असून फक्त दीड महिन्यात ती सुपरहिट झाली आहे.

 • News18 Lokmat
 • Last Updated :
 • Mumbai, India

  नुपूर पाटील, प्रतिनिधी

  मुंबई, 15 मार्च : उन्हाळा आला की थंड पेय पिण्याच्या ठिकाणी गर्दी वाढू लागते. अनेक नवे कोल्ड्रिंक या निमित्तानं बाजारात येतात. कोल्ड्रिंकच्या जाहिरातीमध्ये ताक, मठ्ठा, लस्सी हे भारतीय थंड पदार्थ आजही लोकप्रियता टिकवून आहेत. मुंबईतील प्रत्येक भागात या पदार्थांची विक्री करणारे एक तरी दुकान हमखास असते. त्या दुकानात उन्हाळ्यात चांगलीच गर्दी होते. मध्य प्रदेशातल्या भोपाळमधील प्रसिद्ध घमंडी लस्सी आता मुंबईतही दाखल झाली असून फक्त दीड महिन्यात ती सुपरहिट झाली आहे.

  घमंडी नाव का?

  घमंडी याचा साधारण अर्थ गर्विष्ठ असा होतो. पण, आम्हाला आमच्या प्रॉडक्टचा अभिमान आहे. त्यामुळे आम्ही मोठ्या अभिमानानं या लस्सीला घमंडी लस्सी असं म्हणतो. आम्ही ग्राहकांना संपूर्ण शुद्ध प्रॉडक्ट देतो. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे पिझेर्व्हेटिव्ह मिसळत नाही, अशी माहिती विक्रेता किशोर रजनी यांनी दिली.

  कशी बनवतात लस्सी?

  लस्सीसाठी 12 तास दूध दही बनवायला ठेवलं जातं. त्यात कोणतेही केमिकल वापरले जात नाही.त्यानंतर त्यात साखर टाकून लस्सी बनवली जाते. काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड असे विविध प्रकारचे ड्रायफ्रूट्स टाकून लस्सी ग्राहकांना दिली जाते.

  उन्हाळ्यात मिळेल हमखास थंडावा, पुण्यातील सर्वात फेमस मठ्ठा पिऊन तर पाहा! Video

  घमंडी लस्सीमध्ये काय मिळतं?

  घमंडी लस्सी या दुकानात कोल्डकॉफी, कस्टर्ड, मँगो शेक, मसाला दूध मिळतं. ही लस्सी मध्य प्रदेश मधील भोपाळ येथे खुप प्रसिद्ध आहे. 1991 मध्ये ही लस्सी मध्यप्रदेशमध्ये विकली जाऊ लागली. या आधी रेस्टोरंट होते मात्र त्यात लस्सी जास्त फेमस झाली आणि म्हणून आम्ही फक्त स्पेशल लस्सी विकू लागलो.

  'मुंबईत उकाडा जास्त आहे. त्यामुळे आम्ही याची मुंबईत विक्री सुरू केली आहे. अवघ्या दीड महिन्यात ही लस्सी मुंबईकरांमध्ये लोकप्रिय झाली आहे. बरेच जण दिवसातून दोनदा लस्सी पिण्यासाठी येतात. अनेकांनी ही लस्सी पिऊन समाधान व्यक्त केलं आहे.

  घमंडी हे नाव वाचून ग्राहक इथं येतो. एकदा आलेला ग्राहक पुन्हा आल्याशिवाय राहत नाही. आता आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात ही लस्सी न्यायची आहे,' असं विक्रेता किशोर रजनी यांनी सांगितलं.

  कुठे आहे लस्सी शॉप?

  दादर पश्चिमेला रानडे रस्त्यावर सुरती फरसणार मार्टच्या बाजूला हे लस्सी शॉप आहे.

  संपर्क क्रमांक - 9826088332

  गूगल मॅपवरून साभार

  First published:
  top videos

   Tags: Local18, Local18 food, Mumbai