मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /डान्स करत 'हॉट डॉग' विकणारा मुंबईकर तरुण आहे तरी कोण? पाहा Video

डान्स करत 'हॉट डॉग' विकणारा मुंबईकर तरुण आहे तरी कोण? पाहा Video

X
मुंबईतील

मुंबईतील एका तरुणाने हॉट डॉग या विदेशी पदार्थाच्या विक्रीचा स्टार्टअप सुरू केलाय. त्याच्या खास शैलीमुळे हे रेस्टॉरंट सध्या चांगलंच लोकप्रिय झालं आहे.

मुंबईतील एका तरुणाने हॉट डॉग या विदेशी पदार्थाच्या विक्रीचा स्टार्टअप सुरू केलाय. त्याच्या खास शैलीमुळे हे रेस्टॉरंट सध्या चांगलंच लोकप्रिय झालं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

    धनंजय दळवी, प्रतिनिधी

    मुंबई, 27 मार्च : आपल्या देशातील प्रत्येक राज्याची खास अशी खाद्यसंस्कृती आहे. बदलत्या काळानुसार भारतीयांची खाण्याची पद्धत, जेवणातील मसाले यामध्ये बदल झालाय. परदेशी पदार्थांनीही देशात विशेषत: महानगरामध्ये स्थान मिळवलं आहे. तरुणाईमध्ये तर हे पदार्थ चांगलेच लोकप्रिय झाले आहेत. मुंबईतील एका तरुणाने हॉट डॉग या विदेशी पदार्थाच्या विक्रीचा स्टार्टअप सुरू केलाय. त्याच्या खास शैलीमुळे हे रेस्टॉरंट सध्या चांगलंच लोकप्रिय झालं आहे.

    डान्स करत विक्री

    मुंबईतील मालाड परिसरात राहणाऱ्या अभिषेक वादवा या तरुणाने हॉट डॉगचा स्टार्टअप सुरू केलाय. अभिषेक हा डान्सर आहे. तो त्याच्या दुकाना डान्स करत ग्राहकांना हा पदार्थ देतो. त्याची ही पद्धत अनेकांना आवडत असून, मुंबईकर सध्या अभिषेकच्या या स्टार्टअपकडे आकर्षित होत आहेत. फक्त डान्स करून काही भागत नसल्याने सोबत आणखी काहीतरी केलं पाहिजे असं अभिषेकच्या मनात आलं आणि त्याने मुंबईच्या रस्त्यांवर हॉट डॉग विकण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या स्टार्टअपची सध्या मुंबईत चर्चा आहे. पण, हा प्रवास सरळ झालेला नाही.

    'मी बारावीनंतर बॅचलर ऑफ मास मीडियाची डिग्री घेण्यासाठी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. दोन वर्ष नियमित कॉलेज केलं.माझ्या बोलण्याची, प्रेझेंटेशनची शैली तिथं विकसित झाली.  पण, माझं मन तिथं लागत नव्हतं. मी अखेर घरच्यांशी बोलून हे काम सोडलं. त्यानंतर एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम सुरू केलं,' असं अभिषेकनं सांगितलं.

    कोकणातील सी फूड ठाण्यात, नणंद भावजयीच्या ट्रकमध्ये मिळतात ताजे मासे, Video

    कशी सुचली कल्पना?

    अभिषेकला रेस्टॉरंटमध्ये काम करतानाच हॉट डॉग बनवण्याची कल्पना सुचली. 'मी घरच्याकडून थोडे पैसे घेतले. माझं थोडं सेव्हिंग होतं. आपल्याकडे हॉट डॉगच्या नावाखाली अनेक बेकरी, दुकानांमध्ये गोल पावात साधी बटाट्याची भाजी आणि कोबी भरून दिला जातो. मात्र, ओरिजनल हॉट डॉग हा शाकाहारी नाही तर हा एक मांसाहारी पदार्थ आहे. त्यामुळे मी ओरिजनल हॉट डॉग मुंबईकरांना खायला देण्याचा निर्णय घेतला,' असं अभिषेकनं यावेळी स्पष्ट केलं.

    हॉट डॉग डान्स करत देण्याचं कारणही अभिषेकनं यावेळी सांगितलं.'आपल्याकडं हसणं आणि आनंदी राहणं आता दुर्मीळ होत चाललं आहे. प्रत्येकाला आपलं टेन्शन आहे. एखाद्याकडं पाहिल्यानंत प्रसन्न वाटल असं कुणीही नसतं. या वातावरणात माझ्या दुकानात येणारा प्रत्येक जण आनंदी व्हावा असं मला वाटतं. ग्राहक माझ्या दुकानात येतात. माझा डान्स बघतात. त्यांचं टेन्शन थोड्यावेळासाठी तरी विसरतात. हे माझ्यासाठी खूप आहे,' असं अभिषेक म्हणाला.

    ऑथेंटिक हॉट डॉगमध्ये गोल भाजलेला पाव ज्यामध्ये काही सॉस, मसाले, कांदा व सॉसेजेस भरून हा हॉट डॉग तयार होतो. तोच ऑथेंटिक हॉट डॉग मी मुंबईच्या स्ट्रीट फूडमध्ये आणला आहे. आपल्याकडं काही वर्षांपूर्वी शोर्मा हा पदार्थ कुणालाही माहिती नव्हता. पण, आज प्रत्येक गल्लीत याचा एक तरी विक्रेता असतो. मलाही त्याचप्रकारचं बनायचं आहे. मी मुंबईच्या स्ट्रिट फूडमध्ये हॉट डॉग सुरू केला आहे. माझं हे स्टार्टअप पाहून मुंबईतील प्रत्येक गल्लीत ऑथेंटिक हॉट डॉग सुरू झाला पाहिजे,' अशी माझी इच्छा असल्याचं तो म्हणाला.

    गूगल मॅपवरून साभार

    First published:
    top videos

      Tags: Food, Local18, Local18 food, Mumbai