मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /दररोज फक्त एक पदार्थ कंट्रोल करेल तुमचा High Blood pressure; ताज्या संशोधनातही सिद्ध झालं

दररोज फक्त एक पदार्थ कंट्रोल करेल तुमचा High Blood pressure; ताज्या संशोधनातही सिद्ध झालं

फोटो सौजन्य - Shutterstock

फोटो सौजन्य - Shutterstock

How to control blood pressure : आपल्या जीवनशैलीत थोडाफार बदल केल्यास रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो.

    मुंबई, 10 डिसेंबर : आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेकांना विविध प्रकारच्या ताणतणावांचा सामना करावा लागतो. आपण आपले आरोग्य सोडून इतर सर्व गोष्टींकडे लक्ष देतो. यात उच्च रक्तदाब (High BP) ही एक सामान्य समस्या बनली असून भारतामध्ये 2020 या वर्षात तब्बल 15 टक्के लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे असं लक्षात आलं. तर गेल्या 4 वर्षात उच्च रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे एका अहवालातून समोर आलं आहे. तर 35 टक्के लोकांच्या कुटुंबात उच्च रक्तदाबाची समस्या आहे. आपल्या जीवनशैलीत (Lifestyle) थोडाफार बदल केल्यास रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो.

    रोजच्या आहारात दह्याचा (Yogurt) समावेश केल्यास उच्च रक्तदाब (High Blood Pressure) नियंत्रित ठेवण्यास मदत होते. युनिव्हर्सिटी ऑफ साउथ ऑस्ट्रेलिया (University of South Australia) आणि यूएसए युनिव्हर्सिटी ऑफ मेनच्या (University of Maine) शास्त्रज्ञांनी संयुक्तपणे केलेल्या संशोधनातून हे समोर आलं आहे. या संशोधनात रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित रिस्क फॅक्टर्सवर दह्याच्या सेवनाचा परिणाम तपासण्यात आला. दह्याचे रोज सेवन केल्यास उच्च रक्तदाब कमी होतो, असे संशोधकांना आढळून आले. या अभ्यासाचे निष्कर्ष 'इंटरनॅशनल डेअरी जर्नल'मध्ये (International Dairy Journal) प्रसिद्ध झाले आहेत.

    हे वाचा - चुकीच्या पद्धतीनं अंघोळ केल्यानं हृदयविकाराचा झटका, अर्धांगवायू होतो का?

    संशोधकांच्या मते, जगभरात तब्बल एक अब्जापेक्षा जास्त लोकांना उच्च रक्तदाबाचा (High BP) त्रास होतो. अशा लोकांना 'कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज' (Cardiovascular disease) म्हणजे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कायम असतो. सीव्हीडी हे जगभरातील मृत्यूचे प्रमुख कारण आहे. अमेरिकेत दर 36 सेकंदाला आणि ऑस्ट्रेलियामध्ये दर 12 मिनिटांनी एका व्यक्तीचा सीव्हीडीमुळे मृत्यू होतो.

    डॉ. अलेक्झांड्रा (Dr Alexandra Wade) यांनी सांगितले, की दुग्धजन्य पदार्थ, विशेषत: दह्याच्या सेवनाने रक्तदाब कमी होतो. दुग्धजन्य पदार्थांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमसह असे सूक्ष्म पोषक (Micronutrients) घटक असतात. यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. दह्यामध्ये बॅक्टेरिया असल्याने ते अधिक प्रभावी असते.

    तब्बल 915 स्वयंसेवकांना या अभ्यासातील प्रयोगांसाठी सहभागी करून घेण्यात आलं होतं. नियमितपणे दही खाणाऱ्या लोकांचा रक्तदाब हा दही न खाणाऱ्या लोकांपेक्षा सुमारे 7 पॉईंटने कमी असल्याचे संशोधनातून दिसून आले. रिस्क फॅक्टर्स लोकांवर दह्याचे संभाव्य फायदे तपासण्यासाठी भविष्यात अधिक अभ्यास करणे गरजेचे असल्याचे संशोधकांनी म्हटलं आहे.

    हे वाचा - Sweet Potato : रताळे कधीही खाऊन फायदा मिळणार नाही; खाण्यासाठी ही वेळ आहे उत्तम

    सध्याच्या कोरोना काळात आरोग्याची (health) काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. विशेष म्हणजे हिवाळ्यात रक्तदाब कमी-जास्त होत राहतो. जीवनपद्धती, राहणीमान, खाणे-पिणे , मद्यपान, लठ्ठपणा आणि ताणतणाव ही रक्तदाबाची कारणे आहेत. त्यामुळे आपला रक्तदाब नियमितपणे तपासावा आणि रक्तदाब नियंत्रित राहिल याची काळजी घ्यावी.

    First published:

    Tags: Health, Lifestyle