Home /News /lifestyle /

WEIGHT LOSS TIPS: वाढत्या वजनामुळे फेव्हरेट ड्रेस घालता येत नाहीत? हे खाऊन पाहा !

WEIGHT LOSS TIPS: वाढत्या वजनामुळे फेव्हरेट ड्रेस घालता येत नाहीत? हे खाऊन पाहा !

काही विशिष्ट फळं आणि भाज्यांचा समावेश जेवणात केल्याने महिलांना इतरांपेक्षा अधिक वेगाने वजन कमी करण्यास मदत होईल.

    मुंबई, 29 ऑक्टोबर: असं म्हणतात की वजन कमी करण्यासाठी पोषकतत्त्वांनी समृद्ध असलेला आहार घेतला पाहिजे. प्रश्न असा आहे की, जगभरात उपलब्ध फळं आणि भाज्यांच्या 5000 प्रकारांपैकी आपण सर्वोत्कृष्ट आहार कसा ओळखणार? आमच्याकडे आपल्या समस्येवर प्रभावी उपाय आहे. नुकतेच प्रकाशित झालेल्या न्युट्रिएंट्स या जर्नलमधील अभ्यासानुसार काही फळं आणि भाज्या खाल्ल्यामुळे स्त्रिया इतरांपेक्षा अधिक वेगाने वजन कमी करू शकतात. हो, हे अगदीच खरं आहे. अभ्यासाने हे सिद्ध केले आहे की आहारात काही विशिष्ट पदार्थ आल्यामुळे वजन कमी करू शकता. कोबी कोबीमध्ये कॅलरी कमी असतात आणि तांदूळ आणि पीठ यासारख्या उच्च कॅलरीयुक्त पदार्थांचा पर्याय असू शकतो. एक कप कोबीत फक्त 25 कॅलरीज असतात, त्यामुळे कोबीचा समावेश आपल्या आहारात जास्तीत जास्त करता येईल. स्ट्रिंग बीन (वाल) स्ट्रिंग बीन (वाल)च्या एक कप कच्च्या दाण्यांमध्ये फक्त 31 कॅलरी असतात आणि त्यात चरबी नसते. त्यात साखर फक्त 6.6 ग्रॅम असते. हे व्हिटॅमिन C, K, A, कॅरोटीनोईड, अँटिऑक्सिडेंट आणि फायबरने भरलेले आहे. 46-51 वयोगटातील महिलांसाठी वजन कमी करण्यासाठी हा सर्वोत्तम आहार आहे. सिमला मिर्ची आपल्या कोशिंबीर किंवा सँडविचमध्ये सिमला मिर्चीचा वापर करा. वजन कमी करण्यासाठी हा एक उत्कृष्ट आहार आहे. चरबी कमी होण्याबरोबरच, ही भाजी व्हिटॅमिन 'सी'ने समृद्ध आहे. सिमला मिर्चीमुळे पोटाची चरबी कमी करण्यास आणि आपला मूड चिअर करण्यात मदत करते. गाजर गाजरामध्ये वजन कमी करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व घटक असतात. गाजरामध्ये कॅलरीजचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे महिलांनी गाजराचा समावेश आहारात समावेश केला पाहिजे. गाजरात फायबर आणि बीटा-कॅरोटीन जास्त प्रमाणात असतं. आपण गाजरचा रस, कोशिंबीर इत्यादी खाऊ शकता. गाजरामुळे पित्त स्रवायला मदत होते त्यामुळे चरबी नष्ट होते आणि वजन कमी करण्यास मदत करते. गाजर डोळ्यांसाठीही चांगलं असतं. पालक जेव्हा वजन कमी करण्याची वेळ येते तेव्हा आपल्याला हिरव्या भाज्यांची आठवण येते. त्या अतिशय पोषक असतात. या भाज्यांमध्ये कॅलरी कमी आणि फायबर जास्त प्रमाणात असते. हिरव्या भाज्या आरोग्यास हानिकारक गोष्टी टाळण्यास मदत करतात. ब्रोकोली 33 ते 40 वर्षे वयोगटातील महिलांचे वजन कमी करण्यासाठी ब्रोकोली ही सर्वात महत्त्वाची भाजी आहे. या भाजीत कार्बस् चा चांगला स्रोत असून त्यात फायबरही जास्त आहे. ही भाजी रोज खाल्ल्यास बद्धकोष्ठता आणि जास्त खाण्याची सवय कमी होऊ शकते. सफरचंद आणि नास्पती सफरचंद आणि नास्पती ही फळं वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम मानली जातात. दोन्ही फळं फायबरने परिपूर्ण आहेत आणि त्यांच्यात एंटी-इंफ्लेमेटरीचे गुण आहेत. याशिवाय दोन्हीमध्ये कॅलरीही कमी आहे, ज्यामुळे वजन कमी होण्यास सफरचंद आणि नास्पती फायदेशीर ठरतात. स्ट्रॉबेरी व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि फायबर समृद्ध स्ट्रॉबेरी हे वजन कमी करण्यासाठी आणखी एक चांगले फळ आहे. 1 कपभर स्ट्रॉबेरी खाल्ल्याने तुमच्या रोजच्या व्हिटॅमिन सीच्या प्रमाणात 163 टक्क्यांची वाढ होऊ शकते. याशिवाय हे अँटिऑक्सिडंटनी समृद्ध आहे आणि त्यात कॅलरीसुद्धा कमी आहेत.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: Lifestyle, Weight loss

    पुढील बातम्या