• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • अंड्याचा असा रंग दिसला तर सावधान, तुम्ही पडू शकता आजारी!

अंड्याचा असा रंग दिसला तर सावधान, तुम्ही पडू शकता आजारी!

अशी अंडी आहारात आली, तर तुम्ही गंभीर आजारी पडू शकता. त्यामुळे अंडी खाण्यासाठी उकडण्यापूर्वी किंवा खाण्यापूर्वी ती चांगली आहेत का?

अशी अंडी आहारात आली, तर तुम्ही गंभीर आजारी पडू शकता. त्यामुळे अंडी खाण्यासाठी उकडण्यापूर्वी किंवा खाण्यापूर्वी ती चांगली आहेत का?

अशी अंडी आहारात आली, तर तुम्ही गंभीर आजारी पडू शकता. त्यामुळे अंडी खाण्यासाठी उकडण्यापूर्वी किंवा खाण्यापूर्वी ती चांगली आहेत का?

 • Share this:
  मुंबई, 19 ऑक्टोबर : 'संडे हो या मंडे रोज खाओ अंडे' हे वाक्य तुम्ही लहानपणापासून ऐकत आला असाल. लहान मुलांपासून वयस्कर माणसांपर्यंत सर्वांच्याच आरोग्यासाठी अंडं (eggs) लाभदायक मानलं जातं. शरीराला प्रोटीन्सचा (protein) पुरवठा करणाऱ्या पदार्थांच्या तुलनेत अंडी खूपच स्वस्त असतात. काही जण अगदी आवडीने अंडी खातात. व्यायाम करणाऱ्या लोकांचा तर अंडी आवडता पदार्थ असतो; मात्र अंडी खाताना काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. नाही तर तुमचं आरोग्य (health) धोक्यात येऊ शकते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, काही अंड्यांमध्ये धोकादायक जिवाणू (bacteria) आढळतात. अशी अंडी आहारात आली, तर तुम्ही गंभीर आजारी पडू शकता. त्यामुळे अंडी खाण्यासाठी उकडण्यापूर्वी किंवा खाण्यापूर्वी ती चांगली आहेत का, हे पाहणं गरजेचं आहे. 'पोल्ट्री सायन्स'मध्ये (Poultry Science) प्रकाशित झालेल्या संशोधनातल्या माहितीनुसार, खराब झालेल्या अंड्यांना आंबट वास येतो. तसंच खराब अंड्यांवर पांढरा आणि तंतुमय थर येतो, जो नंतर हलका तपकिरी रंगाचा होतो. अंड्याचा पांढरा रंग बदलला, म्हणजे ती खराबच असावीत असंही नाही. USDAच्या माहितीनुसार, अनेकदा कोंबड्यांच्या आहारावर देखील अंड्यांचा रंग अवलंबून असतो. कोंबड्यांनी पिवळ्या किंवा संत्र्यांच्या रंगाचे पदार्थ खाल्ले असतील, तर अंडी थोडी पिवळसर असू शकतात, असं वृत्त 'आज तक' या वृत्तवाहिनीने दिले आहे. मिसेस मुख्यमंत्री' आता पौराणिक भूमिकेत; तुम्ही पाहिला का हा VIDEO? अंडी खरेदी केल्यानंतर ती ज्या कार्टनमध्ये असतात, त्याच कार्टनमध्ये ठेवावीत. तसंच अंडी फ्रीजमध्ये ठेवताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. अंडी रेफ्रिजरेटरमध्ये 45 अंश फॅरेनहाइट किंवा त्यापेक्षा कमी तापमानात ठेवावीत. यामुळे अंडी खराब होण्याचा धोका खूप कमी होतो. अमेरिकेच्या कृषी विभागाने (USDA) बॅक्टेरियायुक्त अंडी कशी ओळखावी, याबाबत काही सूचना केल्या आहेत. तुम्हाला अंड्याच्या पांढऱ्या भागात गुलाबी रंग दिसला तर ते अंडं लगेच फेकून देणंच चांगलं. तसंच अंड्याच्या सर्वसामान्य रंगात बदल झालेला दिसला, तर त्या अंड्यात स्युडोमोनास बॅक्टेरिया असू शकतो, हे लक्षात घ्यावं. ही संसर्गग्रस्त अंडी खाल्ल्याने अन्न विषबाधा (food poisoning) किंवा गंभीर समस्या उद्भवू शकते. Bigg Boss 15 मध्ये असं काय झालं ज्यामुळे विशालने अफसानाच्या झिंज्या धरून फरफटलं अंड्यात तयार होणारा धोकादायक जिवाणू (Bacteria) हा एक हिरवा आणि पाण्यात विरघळणारा द्रव तयार करतो. त्यामुळे तुम्हाला अंड्यामधल्या पांढऱ्या भागात काही फरक दिसला, तर ते अंडं खाणं टाळावं. तसंच अंड्यात गुलाबी किंवा इंद्रधनुष्यासारखा थोडा रंग दिसला तरीही ते अंडं खाण्याची चूक अजिबात करू नका. ताबडतोब ते अंडं फेकून द्यावं. हे अंडं स्युडोमोनास बॅक्टेरियाचा (Pseudomonas Bacteria) संसर्ग झालेलं असू शकतं. अशा प्रकारच्या अंड्यांचं सेवन अजिबात करू नका. अंडी खाताना या गोष्टींची काळजी घ्या आणि तंदुरुस्त राहा.
  First published: