मुंबई, 2 मार्च : चहासोबत बिस्कीट खाऊन कंटाळा आला असेल, तर काहीतरी नवीन ट्राय करा. ही एकदम नवीन अनोखी रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. (snacks with tea)
ही रेसिपी आहे भरवां मशरुम. (stuffed mushroom with tea) या प्रकारात खूप पौष्टिक भाज्या टाकलेल्या असतात. यातून तुम्हाला काहीतरी चमचमीत खाल्ल्याचा आनंद मिळेल आणि सोबतच आरोग्यालाही फायदा होईल. (healthy and tasty stuffed mushroom) शिवाय ही रेसिपी बनवण्यास खूप जास्त साहित्यही लागत नाही. घरात असलेल्या मोजक्या वस्तू वापरून तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. (stuffed mushroom easy recipe)
यासाठी लागणारं साहित्य (easy mushroom snacks at home)
200 ग्रॅम मशरूम
कापलेलं गाजर - अर्धा कप
कापलेला कांदा - एक कप
शिमला मिर्ची - अर्धा कप
बारीक कापलेले टोमॅटो - एक कप
मटार - अर्धा कप
लाल मिर्ची - 1 लहान चमचा
मीठ चवीनुसार
चिली फ्लेक्स - 1 चमचा
ग्रीन हर्ब्स - अर्धा चमचा
गार्लिक मेयॉनीज
थोडंसं ऑलिव्ह ऑईल
1 कप दूध
1 कप ब्रेड क्रम्स
कृती
भरवां मशरुम बनवण्यासाठी सगळ्यात आधी मशरुम आतून पोकळ करून घ्या. यात सारं भरायचं आहे. आता लहान आणि मोठ्या मशरुम वेगवेगळ्या काढा. एका भांड्यात कापलेलं गाजर, कांदा, हिरव्या बीन्स, शिमला मिरची, टोमॅटो, मटार टाका. त्यात लाल मिर्ची, ओरिगॅनो, चिली फ्लेक्स, ग्रीन हर्ब्स आणि मीठ टाका. आता हे मिश्रण हेल्दी आणि टेस्टी बनवायला त्यात गार्लिक मेयॉनीज टाका. मेयॉनीज मिक्स केल्यावर त्यात खूप चीज टाका. यामुळं मशरुम चिजी बनेल.
हेही वाचा चिकन खा; मस्त लागेल रात्रीची झोप; झोपेच्या समस्येसाठी 5 उपाय नक्की करून पाहा
तुम्हाला वाटलं, तर कच्च्या मशरुममध्ये स्टफिंग टाकण्यापेक्षा त्यांना तुम्ही ऑलिव्ह ऑईल आणि मीठ टाकून मॅरीनेटही करू शकता. यानंतर मशरुममध्ये स्टफिंग भरायला सुरू करा. दोन मशरुम एकत्र घेऊन त्यांना टूथपिक खोचा. त्या बंद होतील. मग एका बाऊलमध्ये मैदा आणि दूध घ्या. मश्रूम त्यात बुडवा आणि शेवटी ब्रेड क्रम्समध्ये घोळवून कढईतल्या गरम तेलात तळा.
हेही वाचा मेंदूचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश
कमी आचेवर 5 ते 6 मिनिट मश्रूम फ्राय करा. मग एका डिशमध्ये काढून घ्या. तुमची भरवां मशरुम तयार आहे. आता मशरुम मधोमध कापून सॉस आणि चहासोबत आनंद घ्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Tasty food