मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /उकाडा जाणवतो आहे? टेस्टी मिंट मोइतो करेल ताजंतवानं! कसं करायचं वाचा..

उकाडा जाणवतो आहे? टेस्टी मिंट मोइतो करेल ताजंतवानं! कसं करायचं वाचा..

दररोज पुदीना खायचा असेल तर त्याचा पाण्यामध्ये वापर करता येऊ शकतो. पाण्याच्या बाटलीमध्ये पुदीन्याची सात ते आठ पानं टाका. रात्रभर हे पाणी फ्रीजमध्ये ठेवून द्या. दिवसभर हे पाणी प्या नुसतं पाणी पिणं शक्य नसेल तर, यामध्ये लिंबू देखील मिळू शकता.

दररोज पुदीना खायचा असेल तर त्याचा पाण्यामध्ये वापर करता येऊ शकतो. पाण्याच्या बाटलीमध्ये पुदीन्याची सात ते आठ पानं टाका. रात्रभर हे पाणी फ्रीजमध्ये ठेवून द्या. दिवसभर हे पाणी प्या नुसतं पाणी पिणं शक्य नसेल तर, यामध्ये लिंबू देखील मिळू शकता.

tasty mojito recipe दरवर्षी वाढत्या उन्हावर उतारा म्हणून हे टेस्टी आणि हेल्दी ड्रिंक.

मुंबई, 2 मार्च : तुम्हाला जाणवत असेल, आता आसपास उष्णता वाढते आहे. अशावेळी ऊन आणि उष्णतेवर मात करण्यासाठी खास पेयं घरीच  बनवू शकता. स्वस्त आणि मस्त. शिवाय  आरोग्यदायीसुद्धा. याच पेयांपैकी एक म्हणजे मिंट मोहितो. याचा मिंटी लेमनी स्वाद तुम्हाला नक्की आवडेल. जाणून घ्या अगदी सोपं असलेलं हे ड्रिंक कसं बनवायचं. (summer tasty mojito drink recipe)

साहित्य

पुदिन्याची पानं - 800 ग्रॅम

लिंबू - 1 किलोग्रॅम (24)

साखर - 1 किलोग्रॅम

मिंट मोइतो बनवण्याची पद्धत (homemade summer drink)

मिंट मोइतो बनवण्यासाठी लिंबं धुवून कापून घ्या. आता एका भांड्यात लिंबाचा रस कापून घ्या.

मोइतो बनवण्यासाठी आधी पाक बनवा. यासाठी एका भांड्यात साखर आणि 2 कप पाणी टाकून गॅसवर ठेवा. हे तोवर शिजू द्या जोवर साखर पूर्णतः विरघळून जाईल. मध्येमध्ये याला ढवळत राहा. तार आलेला पाक तयार झाला असेल तर थोडा काळ अजून शिजवून बंद करा. (mint lemon mojito for summer)

आता दाट झालेल्या पाकात 1 टेबलस्पून लिंबाचा रस टाका. पाक तीनतारी झाला पाहिजे. पाकाची कन्सिस्टन्सी तपासण्यास पाक चमच्यानं खाली पडून पहा. तो तीन तारेप्रमाणे पडत असेल तर समजा पाक तयार झाला आहे. आता पाक थंड होऊ द्या. (how to make mint lemon mojito)

हेही वाचा चिकन खा; मस्त लागेल रात्रीची झोप; झोपेच्या समस्येसाठी 5 उपाय नक्की करून पाहा

आता मिक्सरमध्ये सगळा पुदिना टाकून पुदिना आणि लिंबाचा रस हे  मिश्रण बारीक करून घ्या. पोरकं पूर्णतः थंड झाल्यावर त्यात पुदिन्याची वाटलेली पानं टाकून चांगलं मिसळून घ्या. यानंतर हे गाळून घ्या. आता हे सिरप एका बाटलीत भरा. फ्रेश मिंट मोहितो तयार आहे.

हेही वाचा Covaxin की Covishield; तुम्हाला घेता येईल का तुमच्या पसंतीची कोरोना लस?

सर्व्हिंग ग्लासमध्ये आइस क्यूब्ज टाका. यात 4 चमचे मोहितो आणि सोडा टाका. ग्लासात पुदिना आणि लिंबू लावून गार्निश करा.

First published:

Tags: Food