Home /News /lifestyle /

Food Poisoning : लहान मुलांना अन्नातून विषबाधा झाली असेल तर या पदार्थांपासून ठेवा दूर

Food Poisoning : लहान मुलांना अन्नातून विषबाधा झाली असेल तर या पदार्थांपासून ठेवा दूर

अन्नातून कोणालाही विषबाधा (Food poisoning) होऊ शकते. परंतु लहान मुलांना याचा अधिक धोका असतो. कारण त्यांची रोगप्रतिकारक शक्ती (children Immune system) विकसित झालेली नसते. लहान मुलांचं पोट बिघडलंय असं वाटल्यास लगेच काही गोष्टी करायला आणि काही टाळायला हव्यात.

पुढे वाचा ...
  मुंबई, 5 जुलै : मुलांना होणारा फूड पॉयझनिंग (Food poisoning) हा एक कॉमन प्रॉब्लेम आहे. विषारी अन्नपदार्थ ( Toxic foods) खाण्यात आल्यानंतर फॉड पॉयझनिंग होत असते. खराब झालेल्या अन्नातून कोणालाही विषबाधा होऊ शकते. परंतु लहान मुलांना याचा अधिक धोका (Food poisoning to children) असतो. कारण त्यांची रोगप्रतिकारक शक्ती (Childrens Immune System) जंतूंशी लढण्यासाठी हवी तेवढी विकसित झालेली नसते. अशा परिस्थितीत जीवाणू किंवा विषाणूंमुळे विषारी झालेले अन्न मुलांच्या खाण्यापिण्यात आले तर त्यांना विषबाधा (Food poisoning occurs) होऊ शकते. आहारतज्ञ रितू पुरी यांनी 'herzindagi' ला दिलेल्या माहितीनुसार अन्नपदार्थांमधून विषबाधा झाल्यानंतर मुलांमध्ये पोटदुखी, जुलाब, उलट्या, डोकेदुखी यांसारखी लक्षणे दिसतात.मुलांना अन्नातून विषबाधा झाल्यास तात्काळ डॉक्टरांच्या सल्ल्याची आवश्यकता भासू शकते. परंतु ते टाळण्यासाठी मुलांच्या आहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. फायबरयुक्त पदार्थ टाळा: फायबरयुक्त अन्न आरोग्यासाठी चांगले मानले जाते. परंतु मुलांना अन्नातून विषबाधा झाली असेल तर त्यांना हाय फायबर फूड देणे टाळावे. अन्नातून विषबाधा झाल्यामुळे मुलाचे पोट खराब होते आणि त्याला विश्रांतीची आवश्यकता असते. अशा वेळी डाळ किंवा साल असलेल्या भाज्या असे फायबरयुक्त अन्न बाळाला दिल्यास पोटात जास्त जळजळ होते. अशा स्थितीत बाळाला अतिशय हलके आणि द्रव पदार्थ खायला देण्याचा प्रयत्न करा.

  Side effects of chocolates: सावधान! जास्त चॉकलेट खात असाल तर वेळीच घ्या काळजी, नाहीतर ‘या’ समस्यांना पडाल बळी

  शितपेयं टाळा: अन्नातून विषबाधा झाली तर मुलांना पोटदुखी वगैरे सारखा त्रास होऊ शकतो. अशा वेळी अनेक वेळा पालक मुलाच्या पोटात थंडावा मिळावा म्हणून त्यांना काही शीतपेये प्यायला देतात. परंतु यामुळे अधिक त्रास होऊ शकतो. कोल्ड ड्रिंक मुळे शरीर अधिक डिहाइड्रेट होते. अन्नातून विषबाधा झाल्यामुळे मुलांना उलट्या आणि जुलाब होतात आणि त्यांच्या शरीरात पाण्याची कमतरता भासते. अशा स्थितीत त्यांनी कोल्ड्रिंक्सचे सेवन केले तर समस्या आणखी वाढू शकते. पॅकेजमधील पदार्थ : मुलांना अन्नातून विषबाधा झाल्यास त्यांना चिप्स, चॉकलेट्स इत्यादी पॅकेज केलेले पदार्थ देणे टाळा. कारण त्यात कर्बोदकांचे प्रमाण जास्त असते. तसेच फूड पायझनिंग झाल्यास मुलांना स्टमक लायनिंगला ग्लूटेनपासून दूर ठेवणे गरजेचे असते. पॅकेज केलेल्या वस्तूंमध्ये ग्लूटेन आढळते. त्यामुळे मुलांना मैदा असलेले पदार्थ किंवा बिस्किटे इत्यादी देणे टाळावे. त्याऐवजी तुम्ही त्यांना खिचडी वगैरे खायला देऊ शकता यामुळे त्याच्या पोटाला आराम मिळेल. Workout Tips: तासनतास कसरत करायला वेळ नसतो? फक्त २ मिनिटांच्या ‘या’ व्यायामाने स्वतःला ठेवा तंदुरुस्त चहा-कॉफी टाळा : अन्नातून विषबाधा झाल्यानंतर मुलांना चहा-कॉफी देणे टाळावे. कॉफीमुळे मुलांना थोडा वेळ ताजेतवाणे वाटू शकते. परंतु त्यात असलेल्या कॅफीनमुळे शरीर अधिक डिहायड्रेट होऊ शकते. अशी कोणतीही वस्तू मुलाला देऊ नका ज्यामुळे त्यांच्या शरीरात डिहायड्रेशन होईल.
  Published by:Pooja Jagtap
  First published:

  Tags: Food, Health Tips, Lifestyle

  पुढील बातम्या