दिल्ली, 8 सप्टेंबर : दैनंदिन आपल्या आहारात अनेक खाद्यपदर्थांचा समावेश असतो. त्यातले काही खाद्यपदार्थ (Food) हे आपल्या आरोग्यासाठी हानीकारक (Harmful to health) ठरण्याची शक्यता असते. अशा वेळी आपल्या आहारात नेमक्या कोणत्या गोष्टींचा समावेश होतो आहे आणि त्या कशा पद्धतीने घातक ठरू शकतात, याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी आपण जाणून घेऊयात. (Harmful Foods in Diabetes) आपले आरोग्य हे आपल्या आारावर आधारलेले असते. ज्या काही गोष्टी खातो त्या आपल्या शरिराला अनेकदा घातक ठरू शकतात.
काही आरोग्याला हानीकारक अशी अन्नपदार्थ जर आपल्या आहारात आली तर त्याचा मोठी किंमत आपल्या शरिराला मोजावी लागते. त्यात उच्च रक्तदावाचा धोका अधिक असतो. त्यामुळे आहारातील समतोल साधणे फार गरजेचे असते. या लेखात असा 3 पांढऱ्या गोष्टींबद्दल आपण माहिती घेणार आहोत ज्या मधुमेहाने ग्रस्त असणाऱ्या व्यक्तीने सेवन करू नयेत. ज्यामुळे उच्च रक्तदाबाची (High blood sugar) समस्या होऊ शकते, कदाचित डॉक्टरांचाही सल्ला घ्यावा लागू शकतो, त्यामुळे पुढील काही गोष्टींवर लक्ष देऊन आपला आहार ठरवण्याची गरज आहे.
तुम्हीही घेत असाल ही औषधं तर चुकूनही पिऊ नका कॉफी नाहीतर...
मैदा
डायबिटिज असणाऱ्या रूग्णाला (Diabetic Patient) मैद्याचे सेवन करणे महागात पडू शकते. डॉ. रंजना सिंह यांच्या मते मैद्यात जीआय Value ही 72-75 च्या आसपास असते. त्यामुळे तो रक्तप्रवाहाला वाढवतो. मैद्याने तयार होणारे समोसे, कचौरी आणि इतर पदार्थांमुळेही धोका निर्माण होऊ शकतो.
बटाटा
बटाटा हा असा पदार्थ आहे जो कशा पद्धतीनेही खाल्ला जाऊ शकतो, त्याला भाजून आणि चिप्स बनवूनही खाल्ले जाते. डॉ. रंजना सिंह यांच्या मते बटाट्यात जीआय Value चं प्रमाण हे 78-85 असते. त्यामुळे मैद्याबरोबर बटाटा खाणे धोकादायक ठरू शकते.
पांढरा भात
भारत एक असा देश आहे जिथ दिवसातून एकदातरी भात खाल्ला जातो, परंतु याचे अतिरिक्त सेवन करणे धोकादायक ठरण्याची शक्यता असते, कारण यात ग्लायसेमिक इंडेक्स Value ही 73-78 ऐवढी असते.
(Disclaimer: या लेखात दिलेली माहिती ही केवळ सामान्य ज्ञानाच्या आधारावर आहे. News 18 Lokmat ने यातल्या व्यक्तीसापेक्ष बाबींची खातरजमा केलेली नाही, त्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांशी संपर्क साधावा )
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips, Tips for diabetes