सतत कॉम्प्युटरवर काम करत असाल तर हे आजार होऊ शकतात, जाणून घ्या यापासून वाचण्याचे उपाय

सतत कॉम्प्युटरवर काम करत असाल तर हे आजार होऊ शकतात, जाणून घ्या यापासून वाचण्याचे उपाय

भविष्यात या वाईट सवयींचा त्रास होणार असल्याचं माहीत असूनही त्यावर नोकरीमुळे काही करता येत नाही.

  • Share this:

सतत कॉम्प्युटरसमोर बसल्याने आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. भविष्यात या वाईट सवयींचा त्रास होणार असल्याचं माहीत असूनही त्यावर नोकरीमुळे काही करता येत नाही. कॉम्प्युटरसमोर सतत बसल्यामुळे कंबर दुखी, डोके दुखी, मान दुखणं, डोळे लाल होणं आणि त्यातून सतत पाणी वाहणं यांसारख्या गोष्टी सहन कराव्या लागतात. डॉक्टरांच्या मते, कॉम्प्युटरसमोर फार वेळ बसणं योग्य नाहीच, यामुळे शरीराच्या ठेवणीमध्येही बदल होतात. तुमच्यासोबतही असं होत असेल तर वेळीच सावध व्हा. कारण यामुळे अजाणतेपणी भविष्यात अनेक आजार होऊ शकतात.

रिपीटेटीव्ह स्ट्रेन इन्जरी- याचा सर्वात जास्त परिणाम डोळ्यांवर होतो. कॉम्प्युटरवर सतत काम केल्यामुळे डोळ्यांना त्याचा सर्वाधिक त्रास होतो. कॉम्प्युटरवर काम करताना एकटक स्क्रीनकडे पाहणं होतं. साहजिकच त्याचा ताण डोळ्यांवर येतो. यामुळे डोळ्यांची जळजळ, सूज येणं, सतत खाज येणं आणि डोळे जड झाल्यासारखे वाटतं. याशिवाय जवळच्या वस्तू, रंग अस्पष्ट दिसणं, एक वस्तू दोन असल्यासारखं दिसणं यांसारखे त्रास सुरू होतात.

ड्राय आय सिड्रोम- कॉम्प्युटरवर एकटक पाहत काम करत राहिल्यामुळे डोळ्यांमधील मॉइश्चरायजर कमी होण्यास सुरुवात होते. असं केल्याने डोळ्यांचा ओलावा कमी होतो. त्यामुळे शक्य तेवढ्यावेळी डोळ्यांच्या पापण्यांची उघड- झाप करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. पापण्यांची उघड- झाप केल्याने डोळ्यातील ओलावा टिकून राहतो. तासाला किमान 5 ते 10 मिनिटं डोळे बंद ठेवले पाहिजेत.

या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका-

प्रत्येक तासाला किमान 10 मिनिटं डोळे बंद करून ठेवणं गरजेचं आहे.

कॉम्प्युटरचा ब्राइटनेस कमी करून काम करण्याला प्राधान्य द्या. यामुळे डोळ्यांना आराम मिळेल.

कॉम्प्युटर काम करताना ताठ बसा, त्यामुळे पाठीचं हाड मजबूत राहील.

कॉम्प्युटरवर काम करताना फोन आल्यास खांदा आणि मानेच्यामध्ये फोन ठेवून बोलू नये. यामुळे मानेवर ताण पडेल आणि मानेचं दुखणं सुरू होईल.

कॉम्प्युटरवर काम करताना हात 90 अंशाच्या कोनात ठेवून काम करावं.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

Vastushastra: घराच्या मुख्य दरवाजाकडे करू नका दुर्लक्ष, नाही तर व्हाल कंगाल!

पोटाची चरबी कमी करायची आहे? नाश्त्यात हे पदार्थ नक्की खा!

विमानातून प्रवास करताना या गोष्टींकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका

VIDEO : भाजप प्रवेशाआधी हर्षवर्धन पाटलांनी पुन्हा बोलून दाखवली मनातील खदखद

Published by: Madhura Nerurkar
First published: September 11, 2019, 2:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading