Home /News /lifestyle /

मासिक पाळी सुसह्य होण्यासाठी लक्षात ठेवा 'या' 5 गोष्टी

मासिक पाळी सुसह्य होण्यासाठी लक्षात ठेवा 'या' 5 गोष्टी

मासिक पाळी सुसह्य होण्यासाठी लक्षात ठेवा 'या' 5 गोष्टी

मासिक पाळी सुसह्य होण्यासाठी लक्षात ठेवा 'या' 5 गोष्टी

मासिक पाळीच्या चक्रावर स्त्रियांचं शारीरिक व मानसिक आरोग्यही अवलंबून असतं. काही स्त्रियांना मासिक पाळीविषयी काही गैरसमज असतात. म्हणूनच मासिक पाळीच्या दिवसांत काय काळजी घेतली पाहिजे जाणून घ्या.

मुंबई, 16 जून: स्त्रियांच्या आयुष्यात तीन टप्पे खूप महत्त्वाचे असतात. पहिल्यांदा मासिक पाळी (Menstrual Cycle) येते तो टप्पा, गर्भधारणा आणि मासिक पाळी बंद होते तो टप्पा. या तिन्ही टप्प्यांवर स्त्रियांनी स्वतःची अधिक काळजी घेणं जरूरीचं असतं. मासिक पाळी एकदा सुरु झाली, की आयुष्यातली अनेक वर्षं त्यासोबत घालवायची असतात. तसंच त्यावर शारीरिक व मानसिक आरोग्यही अवलंबून असतं. त्यामुळे त्या चार दिवसांत स्त्रियांनी स्वतःची संपूर्णपणे काळजी घेतली पाहिजे. काही स्त्रियांना मासिक पाळीविषयी काही गैरसमज असतात, तर काहींना त्या चार दिवसांचा कंटाळाही येतो. मात्र तसं करणं तब्येतीसाठी घातक ठरू शकतं. म्हणूनच मासिक पाळीच्या दिवसांत काय काळजी घेतली पाहिजे, याबाबत झी न्यूज हिंदीनं सविस्तर वृत्त दिलं आहे. 1. मासिक पाळीच्या काळात सॅनिटरी नॅपकिन (sanitary Napkin) ते वेळोवेळी बदललं पाहिजे. काहींना या गोष्टीचा कंटाळा येतो, मात्र तसं न केल्यास इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. त्याव्यतिरिक्त आता कॉटन सॅनिटरी नॅपकिनचा पर्याय उपलब्ध आहे. 2. व्यायाम करणं नेहमी चांगलंच असतं, पण या काळात व्यायामाचा अतिरेक (Don’t Do Heavy Exercise) करू नका. शरीरावर खूप ताण येईल, असे व्यायामप्रकार टाळा. शरीर आधीच खूप थकलं असलं आणि अधिक व्यायाम केला, तर कंबरदुखी व आरोग्याच्या इतर तक्रारी उद्भवू शकतात. स्ट्रेचिंगसारखे हलके व्यायामप्रकार यावेळी करता येतात. 3. डाएटिंग करणाऱ्या स्त्रियांनी या काळात व्यवस्थित आहार घ्यावा. तसंच पौष्टिक अन्न घ्यावं. अन्यथा अशक्तपणा येऊ शकतो. 4. या चार दिवसांमध्ये हॉर्मोन्समधील बदलांमुळे चिडचिड, मानसिक ताण असतो. अशा वेळी बाहेरचं चमचमीत खाण्याची इच्छा होते. मात्र हेच जंक फूड (Avoid Junk Food) शरीराला घातक ठरू शकतं. त्यामुळे या काळात जंक फूड खाऊ नका. 5. या काळात शरीराची स्वच्छता खूप महत्त्वाची असते. त्यासाठी हार्ड सोप्सचा (Avoid Hard Soaps) अर्थात साबणांचा वापर करू नका. तसं केल्यानं शरीराच्या नाजूक भागात कोरडेपणा येतो, खाज सुटू शकते. त्यामुळे माइल्ड साबणांचाच वापर करा. हेही वाचा - पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी या' 4 गोष्टी ठेवा लक्षात! मासिक पाळीच्या काळात पुरेशी झोप घेणंही गरजेचं असतं, कारण शरीराला व सोबतच मनाला विश्रांतीची अधिक गरज या दिवसांत असते. धूम्रपान व मद्यपान करणाऱ्या स्त्रियांनी या काळात ते करू नये. या काळात नियमित व पौष्टिक आहार, विश्रांती, हलका व्यायाम व शरीराची स्वच्छता या गोष्टींकडे लक्ष देणं जरूरीचं असतं. ज्यांना पोटदुखी, कंबरदुखी व इतर काही गंभीर त्रास होतात, त्यांनी वैद्यकीय सल्ल्याने औषधं घ्यावी. सोप्या गोष्टींची काळजी घेतल्यास, त्या चार दिवसांचं ओझं स्त्रियांना वाटणार नाही.
First published:

Tags: Lifestyle

पुढील बातम्या