OMG VIDEO : या रेस्टॉरंटमध्ये डायनिंग टेबल घेतं टेकऑफ! हवेतल्या जेवणाचा थरार

OMG VIDEO : या रेस्टॉरंटमध्ये डायनिंग टेबल घेतं टेकऑफ! हवेतल्या जेवणाचा थरार

एखादी गोष्ट सेलिब्रेट करायची असेल तर आपण खास रेस्टॉरंटच्या शोधात असतो. असं एक खास रेस्टॉरंट बंगळुरूमध्ये आहे आणि ते तुम्हाला या जमिनीवर सापडणार नाही कारण हे रेस्टॉरंट आहे हवेमध्ये लटकतं रेस्टॉरंट.

  • Share this:

बंगळुरू, 30 जुलै : एखादी गोष्ट सेलिब्रेट करायची असेल तर आपण खास रेस्टॉरंटच्या शोधात असतो. असं एक रेस्टॉरंट बंगळुरूमध्ये आहे आणि ते तुम्हाला या जमिनीवर सापडणार नाही कारण हे रेस्टॉरंट आहे हवेमध्ये लटकतं रेस्टॉरंट. ढगांवर स्वार होऊन, हवेत तरंगत्या टेबलवर लज्जतदार मेजवानी करायची अशी या रेस्टॉरंटची थीम आहे. हे रेस्टॉरंट तर आहेच पण असं 160 फूट उंचावर लटकणाऱ्या टेबलवर जेवण घेणं म्हणजे एक अ‍ॅडव्हेंचरही आहे.बंगळुरूमधल्या फ्लाइट डायनिंगमध्ये जाऊन तुम्ही हा थरार अनुभवू शकता. या रेस्टॉरंटमधल्या या टेबलला जोडलेल्या खुर्च्यांमध्ये तुम्ही बसलात की हे टेबल टेक ऑफ घेतं. हे टेबल क्रेनने लिफ्ट करून हवेत सोडलं जातं.

हा नेमका काय अनुभव आहे याचा तुम्ही कधी विचार केला नसेल, हे पाहिलंही नसेल मग अनुभवण्याची गोष्ट तर दूरच राहिली.

बंगळुरूमधल्या मोठ्या सरोवरावर हे तुमचं डायनिंग टेबल विहरत असतं आणि एकेक मस्त डिश तुमच्यासमोर येते. एवढ्या उंचीवर गेल्यावर इथल्या गेस्टच्या सुरक्षिततेचा प्रश्न आलाच. पण डोन्ट वरी. उंचावर जाण्यापूर्वी सगळ्या गेस्ट्सना खुर्च्यांना सेफ्टी बेल्टने बांधलेलं असतं. या खुर्च्या इतक्या सेफ आहेत की तुम्ही त्यावर आरामात रेलू शकता.

इथे कुणीतरी कुणालातरी प्रपोज करायला येतं तर कुणी करवा चौथ साजरी करायला. कल्पना करा, या लटकत्या रेस्टॉरंटमध्ये बर्थ डे सेलिब्रेट करायला किती मजा येईल!

याच कारणांसाठी तर बंगळुरूला जाणाऱ्या प्रत्येकाच्या बकेट लिस्ट वर हे हॉटेल असतं. या रेस्टॉरंटचा हा थरारक व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हालाही इथे नक्कीच जावंसं वाटेल.

===============================================================================================

शिवेंद्रराजेंच्या जाण्यामुळे पवारांसह काँग्रेसच्या या नेत्याची जागा धोक्यात? पाहा हा SPECIAL REPORT

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 30, 2019 08:42 PM IST

ताज्या बातम्या