कोरोना काळात पावसाळ्यातील आजारांपासून कसा कराल बचाव; आयुष मंत्रालयाने दिला उपाय

कोरोना काळात पावसाळ्यातील आजारांपासून कसा कराल बचाव; आयुष मंत्रालयाने दिला उपाय

पावसाळा इतर संसर्गजन्य आजार डोकं वर काढतात. त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी सरकारने टीप्स दिल्या आहेत.

  • Last Updated: Jul 30, 2020 06:43 PM IST
  • Share this:

जगभरात पसरलेल्या कोरोनाच्या साथीने सगळेच भयग्रस्त झालेत. त्यामुळे कुणी थोडे जरी आजारी पडले तर कोरोनाचा संसर्ग तर झाला नाही ना म्हणून भीती वाटायला लागते. आता भारतात पावसाळा जोर धरेल, त्यामुळे अन्य संसर्गजन्य आजार डोके वर काढतील. या आजारांची लक्षणेही कोरोना संसर्गासारखीच असतात. myupchar.com चे एम्सशी संबंधित डॉ. नबी वली यांनी सांगितलं, सर्दीलादेखील 100 प्रकारचे वेगवेगळे विषाणू कारणीभूत असू शकतात. त्यामुळे या मोसमी आजारांपासून बचाव करण्यासाठी आयुष मंत्रालयाने दिलेल्या सूचनांचे आपण पालन करायला हवे

पावसाळ्यातील मोसमी आजारांची लक्षणे

पावसाळ्यात ओलाव्याने जीवाणू आणि विषाणूंच्या संक्रमणाचा धोका वाढत असतो. घराच्या आसपास साठणाऱ्या पाण्यात ते वाढतात. पावसाळ्यात रोग प्रतिकारशक्ती पण कमजोर झालेली असती. त्यामुळे या जीवाणू आणि विषाणूंचा हल्ला आपल्या शरीरावर होऊ शकतो. ते सगळ्यात आधी आपल्या श्वसनसंस्थेवर आघात करतात. कारण हे जीवाणू-विषाणू आपल्या शरीरात नाक, तोंड आणि डोळ्यांवाटे प्रवेश करतात. त्याने आपल्याला श्वास घेण्यास त्रास होतो, नाक बंद होते, खोकला येतो, सर्दी होते, थकवा जाणवतो आणि स्नायू आखडतात. अशीच काही लक्षणं कोविड -19 मध्येही दिसून येतात.

फ्लूपासून सुरक्षित राहण्यासाठी आयुष मंत्रालयाच्या सूचना

कोमट पाणी प्या : आयुष मंत्रालयाच्या सूचनेनुसार मोसमी आजारापासून आणि फ्लू होऊ नये म्हणून, दिवसातून अनेकदा आपण कोमट पाणी प्यायला हवे. त्याने गळ्यातील जीवाणू-विषाणू नष्ट होतात.

घरी बनवलेला आयुर्वेदिक काढ़ा प्या : आयुर्वेदिक काढा अनेक प्रकारच्या औषधी पदार्थांनी बनवला जातो. त्याने रोग प्रतिकारशक्ती चांगली होते, शरीर रोगांच्या संक्रमणाशी लढू शकते. आयुष मंत्रालयाने सुचवले आहे की फ्लूपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी ओवा, पुदीना, आले, काळे मिरे, या घरगुती औषधांपासून तयार केलेला काढा जरूर प्यावा. जर घरी काढा तयार करता येत नसेल तर बाजारात आजकाल असा काढा तयार मिळतो तो गरम करून प्यावा.

रात्री झोपताना हळदीचे दूध प्या : myupchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला यांनी सांगितलं, हळद बहुगुणी आहे, त्यात अँटीऑक्सिडंटही असतात. ती शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवते. म्हणून मोसमी आजारांपासून रक्षण व्हावे यासाठी रात्री झोपताना हळदीचे दूध प्यावे. विशेषतः मुलांना ते जरूर द्यावे. कारण लहान मुलांची रोग प्रतिकारशक्ती मोठ्यांचा तुलनेने कमजोर असते आणि त्यामुळे त्यांना मोसमी आजार लवकर होतात.

अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - मासिक पाळीच्या समस्या

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: July 30, 2020, 6:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading