मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Flipkart Saleमध्ये करू शकता हा जुगाड; काही क्षणात कळेल स्वस्त प्रोडक्टची लिस्ट

Flipkart Saleमध्ये करू शकता हा जुगाड; काही क्षणात कळेल स्वस्त प्रोडक्टची लिस्ट

फ्लिपकार्ट

फ्लिपकार्ट

एखाद्या वस्तूची खरी किंमत जाणून घेण्यासाठी एक सोपा ऑप्शन उपलब्ध आहे. एका क्रोम एक्सटेंशनच्या मदतीनं तुम्ही वस्तूची खरी किंमत जाणून घेऊ शकता.

मुंबई, 23 सप्टेंबर:  लवकरच सणासुदीचे दिवस सुरू होणार आहेत. आगामी नवरात्रौत्सव, दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध ई-कॉमर्स वेबसाइट्सनी तयारी पूर्ण केली आहे. गेल्या दोन ते अडीच वर्षांत कोरोनामुळे एक वेगळंच वातावरण होतं; पण आता कोरोनाचा संसर्ग कमी असल्यानं सर्वच सण, उत्सव उत्साहात साजरे केले जाणार आहेत. सण आणि खरेदी या दोन्हींचं एक खास असं नातं आहे. सणासुदीच्या निमित्ताने अनेक जण शॉपिंग करतात. या कालावधीत नव्या वस्तू खरेदी करण्याकडे जास्त कल असतो. ही बाब लक्षात घेऊन फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉनसारख्या ई-कॉमर्स वेबसाइट्सवर ऑफर्स, डिस्काउंट्स, सेल्स पाहायला मिळत आहेत. रोजच्या वापरातल्या, तसंच अनेक खास वस्तू या साइट्सवर उपलब्ध आहेत; पण कोणतीही वस्तू खरेदी करताना ती खरोखरच स्वस्त आहे का हे पाहणंदेखील महत्त्वाचं ठरतं. एखाद्या वस्तूची खरी किंमत जाणून घेण्यासाठी एक सोपा ऑप्शन उपलब्ध आहे. एका क्रोम एक्सटेंशनच्या मदतीनं तुम्ही वस्तूची खरी किंमत जाणून घेऊ शकता. नवा स्मार्टफोन, टीव्ही किंवा कोणतीही वस्तू खरेदी करताना, ती रास्त दरात मिळावी, अशी ग्राहकांची इच्छा असते. सणासुदीच्या निमित्तानं सेल सुरू झाले आहेत. फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनवर शॉपिंगसाठी आकर्षक डिस्काउंटही मिळत आहे. समजा तुम्हाला या सेलमध्ये एखादं प्रॉडक्ट घ्यायचं आहे, पण तुम्हाला त्या प्रॉडक्टवर सर्वांत स्वस्त डील मिळत आहे का असा प्रश्न नक्की पडतो; पण आता यासाठी चिंता करण्याची गरज नाही. एका सोप्या युक्तीच्या मदतीनं तुम्ही विश लिस्टमधल्या प्रॉडक्ट्सची खरी किंमत तपासू शकणार आहात. यासाठी तुम्हाला एक क्रोम एक्स्टेंशन डाउनलोड करावं लागेल. प्राइस ट्रॅकर असं या एक्स्टेंशनचं नाव असून, याच्या मदतीनं तुम्ही एखाद्या प्रॉडक्टच्या किमतीतला चढ-उतार आणि त्याविषयीचा आलेख अशा दोन्ही गोष्टी जाणून घेऊ शकाल. हेही वाचा - नवरात्रीसाठी खरेदी करताय? पाहा मुंबईच्या बाजारात काय आहे नवीन ट्रेंड, VIDEO या आलेखाच्या मदतीनं, तुम्ही एखादं प्रॉडक्ट यापूर्वी यापेक्षा कमी किमतीत आलं होतं का ते तपासून पाहू शकता. त्याच वेळी प्राइस ड्रॉप अलर्ट त्याच्या वैशिष्ट्यानुसार तुम्हाला किमतीची माहिती देईल. याच्या मदतीनं तुमच्या आवडीचं डिव्हाइस सर्वांत कमी किमतीत केव्हा उपलब्ध होईल, याबाबतचा अलर्ट मिळेल. तथापि हे एक्स्टेंशन केवळ फ्लिपकार्टसाठीच उपयुक्त ठरतं. प्राइस ट्रॅक्टर हे एक्स्टेंशन कोणीही डाउनलोड करू शकतं. सर्व क्रोम युझर्स हे एक्स्टेंशन डाउनलोड करून त्याचा वापर करू शकतात. यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. तुम्हाला सर्वप्रथम क्रोम ब्राउझर  लॉंच करावा लागेल. त्यानंतर तुम्ही प्राइज ट्रॅकर एक्स्टेंशन डाउनलोड करू शकाल. तुम्ही हे एक्स्टेंशन गुगल क्रोम वेब स्टोअरमधून डाउनलोड करू शकता. त्यानंतर तुम्हाला हे एक्स्टेंशन तुमच्या वेब ब्राउजरमध्ये इनेबल करावं लागेल. त्यानंतर येथून तुम्हाला फ्लिपकार्ट ओपन करून त्यात लॉगिन करावं लागेल. त्यानंतर फ्लिपकार्टवर खरेदी करण्याचं प्रॉडक्ट सर्च करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला प्रॉडक्टचे प्राइस ड्रॉप अलर्ट आणि प्राइस हिस्ट्री ग्राफ असे दोन ऑप्शन्स दिसतील. या दोन्हींच्या मदतीनं तुम्ही संबंधित प्रॉडक्टच्या किमतीचा संपूर्ण इतिहास जाणून घेऊन योग्य डील मिळवू शकता. किंमत स्वस्त होईल, तेव्हा तुम्हाला त्याचा अलर्ट मिळू शकणार आहे.
First published:

Tags: Online shopping

पुढील बातम्या