मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

शरीरातील युरिक अ‍ॅसिड नियंत्रित करतात ‘या’ बिया; आहारात समावेश केल्यास होईल खूप फायदा

शरीरातील युरिक अ‍ॅसिड नियंत्रित करतात ‘या’ बिया; आहारात समावेश केल्यास होईल खूप फायदा

जवस बिया

जवस बिया

युरिक अ‍ॅसिडचं प्रमाण वाढलं असल्यास त्यावर नियंत्रण मिळवता येऊ शकतं.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • New Delhi, India

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडचं प्रमाण वाढलं तर अनेक आजार होऊ शकतात. युरिक अ‍ॅसिड वाढल्याने सांधे आणि हाडांमध्ये वेदना वाढू लागतात आणि शरीरातील विविध भागांवर सूज निर्माण होत असल्याची तक्रार अनेक लोक करतात. युरिक अ‍ॅसिड वाढल्यानं हात-पायांच्या बोटांमध्ये वेदनाही होऊ लागते. विविध औषधींसह जवसच्या बिया खाल्ल्यानंही शरीरात वाढलेल्या युरिक अ‍ॅसिडच्या प्रमाणावर नियंत्रण मिळवता येऊ शकतं. जवसाच्या बियांमध्ये ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड आणि अँटिऑक्सिडंट्स असतात.

जवसाच्या बिया खाणं प्रकृतीसाठी उत्तम - 

एनसीबीआयने प्रकाशित केलेल्या संशोधन अहवालानुसार, शरीरात वाढलेलं युरिक अ‍ॅसिड कमी करण्यासाठी जवसाच्या बिया खूप फायदेशीर आहेत. जवसाच्या बियांचा आहारात समावेश केल्यास आरोग्यासाठी ते लाभदायी तर आहेच, पण युरिक अ‍ॅसिडचं प्रमाण वाढलं असल्यास त्यावर नियंत्रण मिळवता येऊ शकतं. रात्री झोपण्याच्या आधी जवसा बिया पाण्यात भिजवा. सकाळी रिकाम्यापोटी त्या बिया खा. यामुळे पचनक्रिया सुधारून युरिक अ‍ॅसिड नियंत्रणात येतं.

अशा पद्धतीनं करायला हवं सेवन -

शरीरात युरिक अ‍ॅसिडचं प्रमाण वाढलं असेल तर तु म्ही जवसाच्या बिया खाणं सुरू करू शकता. जवसाच्या बियांची पावडर तयार करावी. कोमट पाण्यात एक चमचा ती पावडर टाकून प्यावं. यामुळे युरिक अ‍ॅसिडशी संबंधित समस्या लवकर दूर होऊ शकते. युरिक अ‍ॅसिड आणि आपला आहार याचा खूप जवळचा संबंध आहे. त्यामुळे आपल्या खाण्या-पिण्यावर विशेष लक्ष दिलं जाणं आवश्यक आहे. आरोग्यदायी आहार घेण्यासह सॅलड किंवा भाजीमध्ये जवसाच्या बिया मिसळून त्या खाव्यात. त्यामुळे लवकरच युरिक अ‍ॅसिड नियंत्रणात येऊ शकतं.

कोमट पाण्यात जवसाची पूड घ्यावी वाटत नसेल तर या बिया भाजून जेवण केल्यानंतर अर्धा ते एक तासांनी ती पूड खाऊ शकता. आहारादरम्यान हा प्रयोग केला तर काही दिवसांतच युरिक अ‍ॅसिडमुळे सांधेदुखी आणि सूज निर्माण झालेल्या समस्येवर मात करता येईल. जवसाच्या बियांमध्ये अनेक पोषक घटक असतात जे शरीराला फिट ठेवण्यासाठी मदत करतात.

हेही वाचा - मध खाण्याचा हार्ट अटॅक, स्ट्रोकवर असा होतो परिणाम; संशोधकांनी अभ्यासानंतर केला दावा

जवसात प्रोटिन, फायबरचं प्रमाणही अधिक -

जवस विविध प्रकारची जीवनसत्त्वं आणि खनिजांनी समृद्ध आहे. यात प्रोटिन्स, फायबर आणि ओमेगा-3 हे उपयुक्त घटक आढळतात. अनेक आहारतज्ज्ञांच्या मते, जवस खाल्ल्याने रक्तातील वाईट कॉलेस्टेरॉल कमी होतं व रक्तदाब नियंत्रणात राहतो. डायबेटिसमध्येही जवस उपयुक्त आहे. यात असलेल्या फायबरमुळे पोट नियमित साफ राहण्यास मदत होते. वजन नियंत्रणात ठेवणारे अनेक लोकही आवर्जून जवसाचा आहारात समावेश करत असतात. हाडे मजबूत राहण्याच्या दृष्टीनंही जवसाचा फायदा पाहायला मिळतो.

First published:

Tags: Health, Health Tips, Lifestyle