मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करताय? आहारात या बियांचे सेवन केल्यास होईल मदत

वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करताय? आहारात या बियांचे सेवन केल्यास होईल मदत

वाढलेल्या चरबीमुळे शारीरिक त्रास तर होतोच शिवाय मानसिक स्थितीवरही परिणाम होतो. काही लोक लठ्ठपणा कमी करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतात; पण त्यांचं वजन कमी होत नाही.

वाढलेल्या चरबीमुळे शारीरिक त्रास तर होतोच शिवाय मानसिक स्थितीवरही परिणाम होतो. काही लोक लठ्ठपणा कमी करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतात; पण त्यांचं वजन कमी होत नाही.

वाढलेल्या चरबीमुळे शारीरिक त्रास तर होतोच शिवाय मानसिक स्थितीवरही परिणाम होतो. काही लोक लठ्ठपणा कमी करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतात; पण त्यांचं वजन कमी होत नाही.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Lanja, India

    नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर : लठ्ठपणा हा निरोगी जीवनाचा मोठा शत्रू आहे. लठ्ठपणामुळे डायबेटिस, हृदयविकार, मेंदूचे आजार, डोळ्यांच्या समस्या इत्यादी आजार होऊ शकतात. कोणताही आजार असेल तर डॉक्टर सर्वांत अगोदर लठ्ठपणा कमी करण्याचा सल्ला देतात. वाढलेल्या चरबीमुळे शारीरिक त्रास तर होतोच शिवाय मानसिक स्थितीवरही परिणाम होतो. काही लोक लठ्ठपणा कमी करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतात; पण त्यांचं वजन कमी होत नाही. जर तुम्हीदेखील त्यापैकी एक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट दीप्ती खातुजा यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, लठ्ठपणा कमी करण्यासाठी फ्लेक्ससीड्स (जवस) खूप उपयुक्त ठरू शकतात.

    हार्ट डिसिज आणि कॅन्सरचा धोका होतो कमी

    जवसाच्या बियांमध्ये भरपूर पोषक घटक आणि फायबर असतं. अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी त्यांच्या वापर केला जाऊ शकतो. या बियांपासून तेलही बनवलं जातं. त्यात शरीरासाठी अतिशय उपयुक्त असलेलं ओमेगा 3 फॅटी अॅसिड असतं. लठ्ठपणा कमी करण्यासाठी जवसाच्या बियांच्या उपयुक्ततेवर अद्याप सखोल संशोधन झालेलं नाही. परंतु, काही रिसर्चमध्ये असं दिसून आलं आहे की, जवसाच्या बिया इन्फ्लमेशन (जळजळ) कमी करू शकतात. जळजळीमुळे हार्ट डिसिजचा धोका वाढतो. या व्यतिरिक्त, या बिया ऑटोइम्युन डिसीज कमी करण्यासाठीही उपयुक्त आहेत. कॅन्सरच्या काही प्रकारांचा धोका जवसाच्या बियांमुळे कमी होतो.

    अमिनो अॅसिडचा स्रोत

    जवसाच्या बियांमध्ये लिग्निन कंपाउंड असतं. हा एक पॉलिमर आहे जो वनस्पतींच्या पेशींच्या भिंतीमध्ये आढळतो. अलीकडील संशोधनात असं दिसून आलं आहे की, लिग्निनमुळे वजन आणि ब्लड प्रेशर कमी होण्यास मदत होते. त्यामुळे किडनीही सुस्थितीत राहते. संशोधनातील निष्कर्षानुसार, लिग्निनमध्ये असलेले इस्ट्रोजेन आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म कॅन्सरचा धोका कमी करतात. जवसाच्या बियांमध्ये असलेलं प्रोटिन पचण्यासाठी वेळ लागतो. त्यात भरपूर प्रमाणात अमिनो अॅसिडही असतं. त्यामुळे लवकर भूक लागत नाही. शिवाय या बिया अधिक पोषक असल्यामुळे स्नायूंची योग्य वाढ होते. या सर्व कारणांमुळे फ्लेक्ससीड्स वजन कमी करण्यासाठी उपयुक्त मानल्या जातात.

    हे वाचा - बोलता बोलता मृत्यूने गाठलं, जीम ट्रेनरने खुर्चीतच सोडला जीव; पाहा Shocking Video

    जवसाच्या बियांचं सेवन कसं करावं?

    जवसाच्या बियांचं सेवन करताना त्यांची पावडर करावी. कारण जवसाच्या बियांचा बाहेरील थर सहज पचत नाही. त्यामुळे त्यातील सर्व पोषक तत्त्वं शरीराला मिळत नाहीत. परिणामी, ते खाण्याचा कोणताही फायदा होत नाही. जेव्हा तुम्ही फ्लेक्स सीड्स खाता तेव्हा भरपूर पाणी प्या. कारण, त्यात भरपूर फायबर असतं जे पचनसंस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी पुरेसं पाणी पिणं आवश्यक असतं. तुम्ही फ्लेक्स सीड्स बारीक करून कोमट पाण्यात टाकूनही पिऊ शकता. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही त्यात लिंबाचा रसही घालू शकता.

    First published:

    Tags: Weight, Weight loss