या उपायांनी झोपल्यावरही कमी करू शकता वजन, वापरा या सहज सोप्या टिप्स
जगभरात लोकांना आरोग्याच्या ज्या काही मुख्य समस्या आहेत त्यात एक समस्या आहे ते म्हणजे झोप न येणं.

जगभरात लोकांना आरोग्याच्या ज्या काही मुख्य समस्या आहेत त्यात एक समस्या आहे ते म्हणजे झोप न येणं. सुदृढ आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणं फार महत्त्वाचं आहे.

जगभरात 10 कोटी लोक निद्रानाशमुळे हैराण झाले आहेत. फिलिप्स इंडिया लिमिटेडने या संदर्भात संशोधन केलं. हे संशोधन आरोग्य तंत्रज्ञान कंपनीकडून करण्यात आले होते.

प्रत्येक सुदृढ व्यक्तीसाठी सहा ते आठ तास झोपणं आवश्यक आहे. झोप न येण्याला स्लीप डिसऑर्डर असं म्हटलं जातं. झोप पूर्ण झाली तर आरोग्यही तंदुरुस्त राहायला मदत मिळते. म्हणूनच झोपल्यानंतरही तुम्ही वजन कसं कमी करू शकता याबद्दल आम्ही काही टिप्स देणार आहोत.

उपाशी पोटी झोपू नका- तुम्हाला भूक लागली तर लगेच झोपू नका. भुकेमुळे शांत झोप येणार नाही. अपुरी झोपेमुळे वजन वाढतं. असं म्हटलं जातं की, फक्त दिवसाच नाही तर रात्री झोपण्यापूर्वीही उपाशी राहू नये.

झोपण्याआधी नाश्ता म्हणून पनीर खा. पनीरमध्ये लीन प्रोटीन असतं. लीन प्रोटीन म्हणजे एक असं प्रोटीन ज्यामध्ये फॅट फार कमी असते. यात amino acid tryptophan असतं.

अमीनो अॅसिड ट्रिप्टोफॅन, सेरोटोनिन लेवलला वाढवून झोपण्याच्या गुणवत्तेत सुधार आणतं. serotonin नावाचं ब्रेन केमिकल कमी झाल्याने अनिद्राचा त्रास सुरू होतो. यामुळे शरीराचं संतुलन बिघडतं आणि वजन वाढतं.

हर्बल चहामध्ये कॅमोमाइल चहा, आल्याचा चहा, पुदीन्याचा चहा यांचं मिश्रण असतं. हर्बल चहा प्रकारातील सर्वोत्तम चहा म्हणून कॅमोमाइल चहाकजे पाहिलं जातं. डोकं शांत ठेवण्यासाठी हर्बल चहा घेणं हे एक सर्वोत्कृष्ट मानलं जातं. या चहामुळे थकवा तर दूर होतोच शिवाय वजन कमी होण्यासही मदत मिळते. झोपण्यापूर्वी हर्बल चहा घेणं हा एक चांगला पर्याय आहे.

झोपण्यापूर्वी फार मसालेदार आणि हेवी जेवण जेवू नका. रात्री भरपेट जेवल्यास ब्लड शुगर आणि इन्सुलिनमध्ये वाढ होते. ब्लड शुगर आणि इन्सुलिन वाढलं तर पर्यायाने वजनही वाढतं. यामुळे पचनक्रियेवरच परिणाम होतो असं नाही तर झोपेच्या गुणवत्तेवरही परिणाम होतो. रात्री भरपेट जेवल्याने लठ्ठपणा आणि कार्डियोमेटाबोलिकसारख्या आजारांचा धोका वाढतो.

प्री- स्लंबर रेसिसटॅन्स ट्रेनिंग- झोपण्यापूर्वी प्री- स्लंबर रेसिसटॅन्स ट्रेनिंग केल्यामुळे शांत झोप लागण्यास मदत होते. esistance training एक्सरसाइज बेली फॅट कमी करण्यास मदत करतं. ही गोष्ट आंतरराष्ट्रीय जर्नल ऑफ सपोर्ट न्यूट्रिशनमध्ये प्रसिद्ध झाली होती.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.
First Published: Sep 22, 2019 06:34 PM IST