मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

तुम्ही आहार कसा घेता यातच आहे वजन कमी करण्याचं सिक्रेट; या 5 चुका कधीही करू नका

तुम्ही आहार कसा घेता यातच आहे वजन कमी करण्याचं सिक्रेट; या 5 चुका कधीही करू नका

वाढलेलं वजन ही आपल्यापैकी अनेकांची समस्या आहे. वजन नियंत्रणात आणण्यासाठी सोप्या 5 टिप्सचा अवलंब करा. तुम्हाला निश्चितच फरक जाणवेल.

वाढलेलं वजन ही आपल्यापैकी अनेकांची समस्या आहे. वजन नियंत्रणात आणण्यासाठी सोप्या 5 टिप्सचा अवलंब करा. तुम्हाला निश्चितच फरक जाणवेल.

वाढलेलं वजन ही आपल्यापैकी अनेकांची समस्या आहे. वजन नियंत्रणात आणण्यासाठी सोप्या 5 टिप्सचा अवलंब करा. तुम्हाला निश्चितच फरक जाणवेल.

  • Published by:  Amruta Abhyankar
मुंबई, 21 डिसेंबर: वजन वाढल्यानंतर (Weight Gain) वजन कमी कसं करायचं (Weight Loss) हा खूप मोठा प्रश्न निर्माण होतो. वजन कमी करण्यासाठी आहार आणि व्यायाम या दोन्ही गोष्टींवर लक्ष देण्याची गरज असते. खरंच वजन कमी करण्याची इच्छा असल्यास, काही गोष्टी पाळणं अत्यंत आवश्यक आहे. बऱ्याचदा आपल्या जेवणाच्या वेळा सांभाळता येत नाहीत. त्यामुळं वजन वाढते. पण हे वजन वाढल्यानंतर अथवा शरीरात चरबी (Fats) जमा झाल्यानंतर ती कमी करण्यासाठी मात्र दमछाक होते. तुम्ही तुमच्या आहारात बदल केला, जेवणाच्या वेळा सांभाळल्या तर तुमचे वजन नियंत्रित राहण्यात तुम्हाला मदत होणार आहे. आहारामध्ये केवळ दुपारचं किंवा संध्याकाळचं जेवण महत्त्वाचं नसून सकाळचा नाश्ता (Breakfast) महत्त्वाचा आहे. दिवसाची सुरुवात उत्साहाने करायची असल्यास नाश्त्यावर लक्ष देण्याची गरज आहे. संध्याकाळचे जेवण हलके घेण्याची गरज असून कमी कॅलरी(Calorie) सेवन केल्यास वजन नियंत्रणात राहण्यास मदत होणार आहे. अवेळी जेवण, अवेळी चहा घेणं, फास्ट फूड आणि जंक फूडचा आहारात समावेश, जेवताना आहाराकडे लक्ष न देणं अशा चुका आपल्याकडून होतात. आणि वजन वाढत जातं. त्यामुळे या चुका कधीही करू नका. आहाराच्या या 5 सवयींमुळं ठेवता येईल वजन नियंत्रणात 1)रात्रीचं जेवण वेळेवर करा रात्रीचं जेवण वजन नियंत्रित ठेवण्यासाठी फार महत्त्वाचं आहे. रात्री लवकर जेवण केल्यास याचा तुम्हाला मोठा फायदा होणार आहे. रात्री कमी प्रमाणात आणि हलकं जेवण (Light Dinner) करावं. त्याचबरोबर झोपेच्या 3 ते 4 तास आधी जेवण केल्यास अधिक उत्तम. तसंच जेवल्यानंतर कोणत्याही प्रकारचा पदार्थ खाऊ नये. अनेक डॉक्टर (Doctor) आणि न्यूट्रिशनिस्ट (Nutritionist) देखील संध्याकाळी 7 नंतर कोणत्याही प्रकारचे कार्बोहायड्रेट्सचे सेवन न करण्याचा सल्ला देतात. 2)मेंदूवर ताबा ठेवा अनेकदा आपण भूक नसेल तरी काही ना काही खात असतो. त्यामुळं शरीरामध्ये अतिरिक्त चरबी तयार होण्यास मदत होते. यामुळे एकदा जेवण केल्यानंतर पुन्हा काही खाऊ नका. यासाठी तुमचा मनाबरोबर मेंदूवरदेखील ताबा ठेवायला हवा. लहान प्लेटमध्ये खाल्ल्याने कमी सेवन होते. यामुळे वजन कमी करण्यात आणि नियंत्रणात राहण्यास मदत होईल. 3)फास्ट फूड टाळा अनेकदा आपण फास्ट फूड(Fast Food) खाण्याकडं लक्ष देतो. यामुळं आपल्याला सतत भूक लागते. त्यामुळं दीर्घकाळ भूक न लागणार अन्न खावे. यामुळे रात्री लवकर जेवण केल्यास मध्यरात्री तुम्हाला भूक लागणार नाही. चीज (Cheese) आणि कार्बोहाड्रेट्स (Carbohydrates) असणारे पदार्थ पचायला वेळ लागतो. यामुळे यासारख्या पदार्थांचा आहारात समावेश केल्यास तुम्हाला दीर्घकाळ भूक लागणार नाही. 4)खाण्यावर लक्ष द्या अनेकदा आपण जेवण करताना टीव्ही पाहणे, गप्पा मारणे यांसारख्या गोष्टी करत असतो. त्यामुळं अन्न आपल्या अंगी लागत नाही. तसेच योग्य जेवण करणे देखील महत्त्वाचं आहे. यामुळं खाताना टीव्ही पाहणे किंवा मोबाईल बघणे बंद करा. यासाठी तुम्ही शांत गाणे लावून जेवणाचा आनंद घेऊ शकता. 5)थोड्या थोड्या वेळाने खात राहा दुपारच्या जेवणानंतर संध्याकाळी चहाच्या वेळी पुन्हा भूक लागते. यामुळं दर 2 तासांनी थोडंथोडं खाल्ल्यास तुम्हाला जास्त भूक लागणार नाही. यामुळं तुम्हाला रात्रीच्या जेवणात मदत होणार असून रात्री कमी जेवण जाईल. यामुळं थोड्या थोड्या वेळाने हलके पदार्थ खाणे आरोग्याला फायदेशीर आहे.
First published:

पुढील बातम्या