Home /News /lifestyle /

हिवाळ्यात तहान लागत नाही शरीराला पाण्याची गरज आहे हे कसं ओळखायचं?

हिवाळ्यात तहान लागत नाही शरीराला पाण्याची गरज आहे हे कसं ओळखायचं?

हिवाळ्याच्या मोसमात अनेकांचे पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते. ज्यामुळे अनेक वेळा आपण शरीर हायड्रेट ठेवू शकत नाही. शरीरात पाण्याची कमतरता होताच त्याची लक्षणंही दिसू लागतात. शरीरात दीर्घकाळ पाण्याची कमतरता राहिल्यास अनेक आजार (Dehydration signs) बळावू शकतात.

पुढे वाचा ...
    मुंबई, 01 जानेवारी : निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शरीरात नेहमीच पुरेसं पाणी (sufficient water) असणं आवश्यक आहे. उन्हाळ्यातच शरीरात पाण्याची कमतरता भासते, असे अनेकांना वाटते, पण तसे अजिबात नाही. हिवाळ्यातही शरीराला पाणी कमी पडू शकतं. खरं तर हिवाळ्याच्या मोसमात अनेकांचे पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते. ज्यामुळे अनेक वेळा आपण शरीर हायड्रेट ठेवू शकत नाही. शरीरात पाण्याची कमतरता होताच त्याची लक्षणंही दिसू लागतात. शरीरात दीर्घकाळ पाण्याची कमतरता राहिल्यास अनेक आजार (Dehydration signs) बळावू शकतात. हिवाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता असल्यास उद्भवणार्‍या काही लक्षणांबद्दल आज आपण जाणून घेऊया. ही लक्षणे ओळखून तुम्‍हाला अंदाज येईल की, तुमच्या शरीराला पाणी कमी पडलंय की नाही. पुरेसे पाणी पिऊन तुम्ही स्वतःला डिहायड्रेशनपासून वाचवू शकता. पाणी कमी पडल्यास ही लक्षणं दिसतात 1. सतत भूक लागणे – जेवण केल्यानंतरही तुम्हाला वारंवार भूक लागत असेल तर ते पाण्याच्या कमतरतेमुळे देखील असू शकते. वास्तविक, जेव्हा शरीरात पुरेसे पाणी नसते, तेव्हा शरीरात निर्जलीकरण सुरू होते. यामुळे शरीर आपत्कालीन स्थितीत येते आणि यकृत ग्लायकोजेन धरून ठेवू लागते आणि त्यामुळे आपल्या शरीराला वारंवार भूक लागते. 2. लघवी पिवळसर होणे – शरीरात पाण्याच्या कमतरतेचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे लघवी पिवळसर होणे. जेव्हा शरीरातील द्रवपदार्थाची पातळी कमी होऊ लागते, तेव्हा मूत्रपिंडातील घाण थोड्या प्रमाणात लघवीमध्ये बाहेर जाऊ शकतो. त्यामुळे किडनीमध्ये जमा झालेले अतिरिक्त टॉक्सिन्स लघवीचा रंग बदलतात. 3. श्वासाची दुर्गंधी - तोंडातून दुर्गंधी येत असेल तर ते शरीरात पाण्याच्या कमतरतेचे लक्षण असू शकते. जर आपल्या तोंडात पुरेशा प्रमाणात लाळ असेल तर ते बॅक्टेरिया वाढण्यास प्रतिबंध करते, परंतु कमी पाणी प्यायल्याने लाळेची निर्मिती देखील कमी होते. त्यामुळे बॅक्टेरिया वेगाने वाढू लागतात आणि तोंडातून दुर्गंधी येऊ लागते. हे वाचा - वजन कमी करण्याचा केलाय पक्का प्लॅन; व्यायामासोबतच हिवाळ्यात हे सूप वापरून पाहा परिणाम 4. डोकेदुखी - जेव्हा आपण कमी पाणी पितो तेव्हा शरीरातील रक्ताभिसरण मंदावते. रक्त प्रवाह मंदावण्याचा अर्थ असा होतो की शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊ लागते, ज्याची आपल्या मेंदूला गरज असते. यामुळे, लगेच डोकेदुखी सुरू होऊ शकते. 5. थकवा – आपल्या शरीराला पुरेसे पाणी मिळत नसेल तर शरीर पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी रक्तातून पाणी शोषून घेते. यामुळे हृदयाला आवश्यकतेपेक्षा जास्त काम करावे लागते. जेव्हा हृदय आवश्यकतेपेक्षा जास्त काम करू लागते, तेव्हा शरीराला थकवा जाणवू लागतो. हे वाचा - तुमचंही मूल जास्त चंचल आहे का? काळजी करू नका, त्याचा हा गुण भविष्यात ठरेल फायदेशीर (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips, Lifestyle, Winter

    पुढील बातम्या