मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

चिडचिड करणाऱ्या मुलांना चुटकीसरशी करा शांत, या 5 गोष्टी ठरतात रामबाण

चिडचिड करणाऱ्या मुलांना चुटकीसरशी करा शांत, या 5 गोष्टी ठरतात रामबाण

लहान मुलांची चिडचिड दूर करून त्यांना (Five psychological tips to calm down angry kids) शांत करण्यासाठी मानसशास्त्रज्ञांनी पाच महत्त्वाचे उपाय सुचवले आहेत.

लहान मुलांची चिडचिड दूर करून त्यांना (Five psychological tips to calm down angry kids) शांत करण्यासाठी मानसशास्त्रज्ञांनी पाच महत्त्वाचे उपाय सुचवले आहेत.

लहान मुलांची चिडचिड दूर करून त्यांना (Five psychological tips to calm down angry kids) शांत करण्यासाठी मानसशास्त्रज्ञांनी पाच महत्त्वाचे उपाय सुचवले आहेत.

  • Published by:  desk news

लहान मुलांची चिडचिड दूर करून त्यांना (Five psychological tips to calm down angry kids) शांत करण्यासाठी मानसशास्त्रज्ञांनी पाच महत्त्वाचे उपाय सुचवले आहेत. अनेकदा मुलं (Reasons behind anger of children) चिडचिड करताना दिसतात, मात्र त्यामागचं कारण पालकांच्या लक्षात येत नाही. असं म्हटलं जातं की कुठलंही मूल विनाकारण कधीच चिडचिड करत नाही. त्याच्या चिडचिडीमागे काही ना काही कारण असतं. कमी वयात (How to find reason of anger) या कारणाचा शोध स्वतः मूल घेऊ शकत नाही, मात्र ते कारण समजून त्यावर उपाय करेपर्यंत त्याची चिडचिडही कमी होत नाही. यासाठी अशा वेळी पालकांची भूमिका महत्त्वाची ठरते. मुलावर ओऱडण्याऐवजी किंवा त्याला फटके देण्याऐवजी काही चांगले उपाय मानसशास्त्रज्ञांनी सुचवले आहेत, जे कायमस्वरुपी तोडगा ठरू शकतात.

1. मोकळ्या जागी चालण्यासाठी न्या

अनेकदा टीव्ही आणि मोबाईल पाहिल्यामुळे मुलांची चिडचिड वाढते. एखाद्या गोष्टीला मिळणारा नकार त्यांना सहन होत नाही. अशा वेळी मुलांना मोकळ्या हवेत किंवा बागेत फिरायला घेऊन जाणं, हा सर्वोत्तम उपाय सांगितला जातो. मुलांना निसर्गातील गोष्टींची माहिती करून द्यावी आणि त्यांच्याशी मोकळ्या गप्पा माराव्यात.

2. मुलांचे श्रोते बना

मुलांना सतत आणि खूप काही पालकांना सांगायचं असतं. मात्र अनेकदा पालक मुलांना गप्प बसवतात आणि बोलू देत नाहीत. त्यामुळे मुलांना त्यांचं मन मोकळं करता येत नाही. या कारणामुळेदेखील मुलांनी चिडचिड होण्याची शक्यता असते. त्यामुळे मुलांना हवं तेवढं बोलू द्या आणि तुम्ही पालक म्हणून एक उत्तम श्रोते बना.

3. प्रायव्हसी द्या

मुलांना अनेकदा एकांतात जाऊन बसायचं असतं. घऱातील एखादा कोपरा, खिडकी किंवा त्यांच्या आवडत्या जागी बसण्याची त्यांची इच्छा असते. दरवेळी त्यांना असं करण्यापासून रोखणं किंवा सतत त्यांच्यापाशी जाऊन त्यांना डिस्टर्ब करणं हे प्रकार कमी करावेत. मुलाला एकांतात शांत बसू द्यावं आणि त्यानंतर काही वेळाने जाऊन त्याच्या कलाने त्याची समजूत काढावी.

4. सहानुभूती द्या

काही पालक प्रत्येक गोष्टीवरून मुलावर टीका करत असतात. त्यामुळे मुलांच्या भावविश्वावर त्याचा परिणाम होताना दिसतो. मुलांना सहानुभूती देणं आणि त्यांचं म्हणणं ऐकून घेणं या बाबी महत्त्वाच्या ठरतात.

हे वाचा- PPF vs VPF : कोणती योजना गुंतवणुकीसाठी फायदेशीर? वाचा सर्वकाही

5. आवडीचे पदार्थ द्या

अनेकदा मुलांना सरप्राईज म्हणून त्यांच्या आवडीचे पदार्थ तयार करणे किंवा त्यांना बाहेरून ते आणून देणे, याचाही उपयोग होतो. मात्र त्यांना सतत या बाबींची सवय लावू नये.

First published:

Tags: Lifestyle, Mental health