कोरोना लशीचं ट्रायल सुरू असतानाच आली मोठी बातमी! लस दिल्यानंतर 5 जणांचा मृत्यू

कोरोना लशीचं ट्रायल सुरू असतानाच आली मोठी बातमी! लस दिल्यानंतर 5 जणांचा मृत्यू

लस (vaccine) दिल्याने मृत्यू होताच तात्काळ लसीकरण (vaccination) थांबवण्यात आलं आहे.

  • Share this:

सिओल, 21 ऑक्टोबर : जगभरात सध्या कोरोना लशीचं (corona vaccine) ट्रायल सुरू आहे. रशियाने तर आपल्या दोन लशींना मंजुरीही दिली. शिवाय आता अमेरिकेतील दोन लशींनाही लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. असं असताना आता लशीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. लस घेतल्यानंतर 5 जणांचा मृत्यू झाला आहे.

दक्षिण कोरियात (South Korea) लसीकरणादरम्यान मृत्यूच्या घटना समोर आल्या आहेत. इथं फ्लूची लस (Flu Vaccination)  दिली जात होती. मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरू होतं. मात्र लस घेतल्यानंतर 5 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता तात्काळ लसीकरण कार्यक्रम थांबवण्यात आला आहे.

थंडीचा मोसम, त्यात फ्लू आणि कोव्हिड 19 चा धोका पाहता दक्षिण कोरियात  गेल्या हिवाळ्यापेक्षा यंदा फ्लू लशीचे 20 टक्क्यांपेक्षा जास्त डोस खरेदी करण्यात आले. फ्लू आणि कोव्हिड 19  रुग्णांमुळे आरोग्यव्यवस्थेवर जास्त भार पडायला नको, म्हणून जास्तीत जास्त लोकांना लस देण्याचा प्रयत्न आहे. मात्र आता या लशीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्हं उपस्थित होत आहेत.

हे वाचा - खूशखबर! जगात 4 CORONA VACCINE तयार! आणखी 2 लशींना याच वर्षात मिळणार मंजुरी

शुक्रवारी सिओलजवळील इन्चानमध्ये एका 17 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. लशीचा डोस दिल्यानंतर दोन दिवसांतच त्याचा दीव गेला आहे. लस दिल्यानंतर झालेला हा पहिला मृत्यू होता, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. शिवाय ज्योंगसांग प्रांतातील डेंगू शहरात एक 70 वर्षांच्या व्यक्तीचाही लस दिल्यानंतर एक दिवसांनी मृत्यू झाला. या व्यक्तीला इतर आजारही होते.  डेगूच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही व्यक्ती 2015 पासून लस घेत होती. मात्र तिच्यावर कोणताही दुष्परिणाम दिसून आला नाही.

उपआरोग्यमंत्री किम गँग लिप यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं, मृत्यू झालेल्यांमध्ये एक 70 वर्षीय व्यक्ती आणि एक 17 वर्षीय मुलगाही आहे. याबाबत अधिक काही स्पष्ट सांगण कठीण आहे.

हे वाचा - मेड इन इंडिया स्वस्त कोरोना टेस्ट तयार; फक्त Paper ने तासाभरात कोरोनाचं निदान

या मृत्यूचा लशीची संबंध नाही असं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. पोस्टमॉर्टेमनंतर आता याप्रकरणात तपास सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान योनहाप वृत्तसंस्थेनुसार, फ्लूच्या लसीकरणासंबंधी सर्वाधित मृत्यू 2005 मध्ये झाले होते. यावेळी सहा जणांनी आपला जीव गमावला होता.

Published by: Priya Lad
First published: October 21, 2020, 6:40 PM IST

ताज्या बातम्या