मुंबई, 03 ऑगस्ट : पावसाळाच नव्हे तर एरवीसुद्धा आपल्याला गरमागरम (Hot food) जेवण खायला आवडतं. स्वयंपाक आधीच करून ठेवला असेल आणि तो थंड झाला असेल तर आपण पुन्हा गरम (Reheat food) करतो. तसंच अन्न किंवा एखादा पदार्थ शिल्लक राहिला तर तो फ्रिजमध्ये ठेवतो आणि संपेपर्यंत पुन्हा पुन्हा गरम (Reheat food harmful for health) करून खातो. गरम करणं ही प्रक्रिया अन्नपदार्थ टिकवण्यासाठी चांगली आहे. पण ती वारंवार करणं आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं (Reheat food cause health problem).
शरीराचं स्वास्थ्य चांगलं (Good Health) राखण्यासाठी सर्वांत महत्त्वाचा असतो तो आहार. शारीरिक वाढ आणि पोषणासाठी सर्वोत्तम आहार (Best Diet) घेणं आवश्यक असतं. आहार हेदेखील एक शास्त्र आहे. कोणत्या पदार्थाबरोबर कोणता पदार्थ खाणं योग्य आहे, हे आपल्याला माहिती असणं जसं गरजेचं आहे. तसंच, कोणते पदार्थ पुन्हा गरम करून खायचे नाहीत, याचीही आपल्याला माहिती असणं आवश्यक असतं.
काही पदार्थ पुन्हा गरम केले तर त्यातली पौष्टिक तत्त्वं नष्ट होतात. शिवाय काही वेळा त्यामुळे काही आजार होण्याचीही शक्यता असते. हे पदार्थ कोणते ते पाहुयात.
हे वाचा - जेवणावरून इच्छा उडाली असेल तर, हे आयुर्वेदिक उपाय करा
मशरूम : अळंबी अर्थात मशरूम (Mushroom) हा पोषणाचा एक चांगला स्रोत आहे. तुमच्या आहारात अळंबी असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे. मात्र मशरूम वापरून जो कोणता पदार्थ तयार केला जाईल, तो तयार करताना एकदा पुरेल एवढाच तयार करावा आणि तो शिल्लक राहिला तर तो पुन्हा गरम न करता थंडच खावा. खरंतर मशरूमपासून तयार केलेला पदार्थ दुसऱ्या दिवशी खाऊच नये. मशरूममध्ये असे काही घटक असतात जे पुन्हा गरम केल्यानंतर पचनक्रियेसाठी नुकसानकारक ठरतात.
भात : सर्वसाधारणतः भात (Rice) हा सर्व भारतीयांच्या दैनंदिन आहारात कमी-जास्त प्रमाणात असतो. एकदा शिजवलेला भात अनेकदा उरतोही. मग उरलेला तो भात खाण्याआधी पुन्हा गरम केला जातो. तसं करू नये, असं आहारतज्ज्ञ सांगतात. तांदळात काही स्पोअर्स असतात. तांदूळ शिजवल्यानंतर म्हणजे भात केल्यानंतरही ते त्यात असतात. मात्र ते शरीराला हानिकारक नसतात. शिजवलेला भात बराच काळ सामान्य तापमानात म्हणजे रूम टेम्परेचरला ठेवल्यानंतर स्पोअर्सचं बॅक्टेरियात रूपांतर होतं. हे बॅक्टेरिया शरीरात गेले, तर फूड पॉयझनिंग होऊ शकतं.
हे वाचा - जगातील सर्वात महागडे पदार्थ; किंमत वाचूनच येईल चक्कर
अंडी : अंडी (Eggs) हा प्रथिनांचा चांगला स्रोत (Source of Protein) आहे. त्यामुळे 'संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे' असं सांगितलं जातं. मात्र अंड्यांचा वारंवार उष्णतेशी संपर्क येणं हानिकारक ठरू शकतं. अंड्यांमध्ये असलेली पोषक तत्त्वं पुन्हा गरम केल्यानंतर नाहीशी होतात. अंड्यांमध्ये प्रोटीनसोबत नायट्रोजनही असतो. अंड्याचे पदार्थ पुन्हा गरम केल्यानंतर तो नायट्रोजन कॅन्सरसाठीही कारणीभूत ठरू शकतो.
पालेभाज्या : पालेभाज्यांमध्ये (Leafy Vegetables) असलेल्या फायबर्समुळे त्यांचा आहारात समावेश असावा, अशी शिफारस केली जाते. मात्र पालेभाज्या किंवा खासकरून पालकाची भाजी पुन्हा गरम करून खाऊ नये. पालकामध्ये लोह मोठ्या प्रमाणावर असतं. पुन्हा गरम केल्यानंतर लोहाचं ऑक्सिडायझेशन होतं. त्यामुळे अनेक आजारांचा धोका वाढतो.
चिकन : चिकनही (Chicken) पुन्हा पुन्हा गरम करून खाऊ नये, असा सल्ला दिला जातो. कारण त्यातल्या प्रथिनांची संरचना पुन्हा पुन्हा गरम केल्यामुळे बदलून जाते. त्यामुळे पचनसंस्थेवर विपरीत परिणाम होऊ शकतो.
हे वाचा - उभं राहून पाणी पिण्याची पद्धत या 7 कारणांमुळे ठरेल धोकादायक; जडतील सगळे विकार
एकंदरीत लक्षात घेता कोणतेही अन्नपदार्थ एकदा शिजवून ताजे असतानाच गरमागरम खाल्ले, तर खाण्याचा आनंदही लुटता येतो आणि ते प्रकृतीसाठीही चांगलं असतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Food, Health, Health Tips, Lifestyle