#FitnessFunda : तापसी पन्नूचा दिवस सुरू होतो 'या' खेळानं
तापसी पन्नूचा बदला रिलीज झालाय. त्याआधी पिंक आणि बेबीमुळे ती चर्चेत आलेली. पाहा तापसीचा फिटनेस फंडा

तापसी पन्नूचा बदला रिलीज झालाय. त्याआधी पिंक आणि बेबीमुळे ती चर्चेत आलेली. पाहा तापसीचा फिटनेस फंडा

तापसी नियमित अर्धा तास स्क्वॅश खेळते. तिच्या मते तो एक चांगला मानसिक आणि शारीरिक व्यायाम आहे.

तापसी योगासनंही करते. फिटनेस फंडामध्ये योगाला ती जास्त महत्त्व देते.

रोज सकाळी उठल्यावर ती भरपूर पाणी पिते. त्यानं तिची त्वचा ग्लो करते. तापसी सकाळी ग्रीन टी पिते.

तापसी प्रोटिन शेक घेत नाही. त्याऐवजी ती ओटमिल बार आणि ड्रायफ्रुट्स खाते.

तापसी म्हणते तुम्ही तुमच्या शरीराचा नीट अभ्यास करा आणि त्याप्रमाणे डाएट प्लॅन करा.
First Published: Mar 13, 2019 06:34 AM IST