कोरोना काळात GYM मध्ये जाण्याची भीती; घरच्या घरीच 5 App तुम्हाला ठेवतील FIT

कोरोना काळात GYM मध्ये जाण्याची भीती; घरच्या घरीच 5 App तुम्हाला ठेवतील FIT

दसऱ्याच्या मुहूर्तावर राज्यात पुन्हा जिम सुरू होणार आहेत. मात्र तरी कोरोनामुळे तुम्हाला जिममध्ये जाण्याची भीती वाटत असेल तर हे Fitness app तुमच्या नक्कीच कामी येतील.

  • Share this:

मुंबई, 18 ऑक्टोबर : कोरोनाच्या या संकटकाळात बहुतेक लोक घरून काम करत आहेत. त्याचबरोबर जिम (gym) आणि व्यायामाच्या (excericse) इतर सुविधा देखील बंद आहेत. घरात बसून अनेकजण व्यायाम करताना दिसून येत आहेत. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या सप्टेंबर महिन्यातील रिपोर्टनुसार या कोरोनाच्या काळात फिटनेस (fitness) आणि आरोग्याशी संबंधित अ‍ॅप डाउनलोड करण्याचं प्रमाण जगभरात 46 टक्क्यांनी वाढलं आहे. अनेकांनी व्हर्च्युअल क्लासबरोबरच या फिटनेस अ‍ॅपवर (fitness app) देखील विश्वास दाखवला आहे.

भारतात या अ‍ॅप्सच्या वापराचं प्रमाण मोठया प्रमाणात वाढलं असून डाउनलोडचं प्रमाण देखील बरंच वाढलं आहे. 156 टक्के इतकी प्रचंड वाढ झाली असून 56 लाख नवीन युझर्स देखील वाढले आहेत. mobile-first customer engagement अ‍ॅप असणाऱ्या MoEngage च्या डेटानुसार ही आकडेवारी देण्यात आली आहे. लाइव्ह मिंटने याबाबत वृत्त दिलं आहे.

यापुढे देखील या अ‍ॅप्सच्या मदतीने लोक व्यायाम करणार असल्याचं दिसून येत आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच पाच अ‍ॅप्सबद्दल माहिती देणार आहोत. हे सर्व अ‍ॅप तुम्हाला Android आणि iOS ओएस असलेल्या मोबाइलमध्ये वापरता येतील.

1) Nike Training Club

या अ‍ॅपमध्ये तुम्हाला 190 व्यायाम प्रकार मिळतील. सहस सोपे वाटणारे आणि शरीरासाठी उपयुक्त व्यायाम तुम्ही करू शकता.

2) Home Workout—No Equipment

या अ‍ॅपमध्ये असणारे व्यायाम प्रकार तुम्ही कोणत्याही साधनांच्या मदतीविना करू शकता. तुमच्या शरीराच्या वजनानुसार हे व्यायाम प्रकार असून यामध्ये तुम्हाला याची सविस्तर माहिती दिली जाणार आहे.

हे वाचा - Jeans घालू नका आणि घातली तर जास्त धुवू नका; तज्ज्ञांचा सल्ला

व्हिडिओ आणि अ‍ॅनिमेशनच्या मदतीनं हे व्यायाम प्रकार  समजावून सांगितले आहेत. त्यामुळे शरीराच्या विशिष्ट अवयवासाठी तुम्ही वेगवेगळा व्यायाम करू शकता.

3) 30 Day Fitness Challenge—Workout at Home

या अ‍ॅपमध्ये तुमच्या शरीरासाठी सूट होणारे व्यायाम प्रकार दिले आहेत. यामध्ये तुम्हाला 30 दिवसांचं एक व्यायाम फिटनेस चॅलेंज देण्यात आलं असून तुम्ही ते 30 दिवसांच्या आत पूर्ण करायचे आहे. यामध्ये दररोज विविध व्यायाम प्रकार असून व्हिडीओ आणि अ‍ॅनिमेशनच्या मदतीने हे व्यायाम प्रकार  समजावून सांगितले आहेत.

4) Seven—7 minute workout

या अ‍ॅपमधील व्यायाम सर्वात सोपा आहे. यासाठी तुम्हाला केवळ सात मिनिटं व्यायाम करायचा आहे. अ‍ॅपमध्ये जवळपास 200 प्रकारचे व्यायाम देण्यात आले असून कोणत्याही साधनांच्या मदतीने तुम्हाला केवळ 7 मिनिटं व्यायाम करायचा आहे.

5)Aaptiv

जर तुम्हाला व्यायाम करताना संगीत ऐकण्याची आवड असेल तर हे अ‍ॅप तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. व्यायाम करताना संगीत ऐकल्याने फायदा होतो हे संशोधनात देखील सिद्ध झालं आहे. जगभरातील विविध ट्रेनर्सच्या मदतीने या अ‍ॅप्समधून तुम्ही व्यायाम करू शकता.

Published by: Priya Lad
First published: October 18, 2020, 10:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading