मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /फिश रेसिपी : एकदम टेस्टी आणि हेल्दी, असा बनवा कुरकुरीत मसाला Fish Fry

फिश रेसिपी : एकदम टेस्टी आणि हेल्दी, असा बनवा कुरकुरीत मसाला Fish Fry

पायाच्या दुखण्यात फिश ऑईल वापरणं योग्य आहे. म्हणून आपल्या आहारात सीफूडचा समावेश करावा. यामुळे सूज,वेदना कमी करण्यास मदत होते.

पायाच्या दुखण्यात फिश ऑईल वापरणं योग्य आहे. म्हणून आपल्या आहारात सीफूडचा समावेश करावा. यामुळे सूज,वेदना कमी करण्यास मदत होते.

Fish Fry Recipe: विविध प्रदेशांनुसार माशांचे विविध पदार्थ प्रसिद्ध आहेत. नारळाच्या तेलात बनलेली ही फिश रेसीपी तुम्हाला खूपच आवडेल.

मुंबई, 25 फेब्रुवारी : तुम्हाला मासे (fish) खाणं आवडत असेल तर तुम्हाला फिश फ्राय (fish fry) नक्कीच आवडेल. ही फिश फ्रायची रेसिपी (fish fry recipe) इतकी चवदार (tasty fish fry) आहे, की एकदा खाऊन तुमचं मन अजिबातच भरणार नाही.

मासे केवळ चविष्टच नाही तर पौष्टिकही (tasty and healthy fish) असतात. मासे पचण्यासही हलके असतात. आहारतज्ञही मटण-चिकनच्या तुलनेत मासे खाण्यास सांगतात. त्वचा आणि केसांची गुणवत्ताही मासे खाल्ल्यानं सुधारते.

संध्याकाळचे स्नॅक्स (snacks fish recipe) आणि गरमागरम चहा किंवा कॉफीसोबत या अनोख्या मसाला फिश फ्रायची मजा अजूनच खास असेल. याची रेसिपी एकदमच सोपी आणि झटपट होणारी आहे. ही रेसिपी तुम्ही केवळ स्नॅक्स म्हणूनच नाही तर मुख्य जेवणासोबतही खाऊ शकता.

मासे - 3 मध्यम आकाराचे आणि चिरा दिलेले

नारळाचं तेल - 3  ते 5 चमचे

कढीपत्ता - मूठभर

काश्मिरी मिर्ची पावडर - 2 चमचे

अद्रक-लसूणाची पेस्ट - 1 चमचा

गरम मसाला पावडर - 2 चमचे

हळद पावडर - 1 चमचा

मीठ - चवीनुसार

लिंबाचा रस - 1 ते 2 चमचे

सर्वात आधी मॅरिनेशनसाठी (marinated fish) सर्व साहित्य एकत्र करा. मिक्स करून त्याची चांगली पेस्ट बनवा. मग माशाला ही पेस्ट चांगली लावा. आता 30 मिनिट हा मासा असाच ठेवा.

हेही वाचा दुधासोबत अजिबात खाऊ नका ब्रेड-बटर! हे पदार्थ आणि दूध असं समीकरण ठरेल हानीकारक

आता एका पॅनमध्ये नारळाचं तेल घेऊन त्यात मासा ठेऊन झाकण लावा. आता याला 7 ते 8 मिनिट शिजवा. मग याला दुसऱ्या बाजूनं उलटून शिजवा. (fry fish in coconut oil) दोन्ही बाजूंनी चांगला फ्राय झाला असल्याची खात्री करून घ्या. वरून कढीपत्ते टाका. गरमागरम खायला घ्या.

First published:
top videos

    Tags: Fish, Food, Lifestyle, Mumbai, Superfood, Tasty food