मुंबई, 25 जानेवारी : निरोगी राहण्यासाठी सकस आहार घेणे आवश्यक आहे. यासाठी लोक आपल्या आहारात वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश करतात. काहींना शाकाहारातून पोषक तत्त्वे मिळतात, तर काहींना उत्तम आरोग्यासाठी मांसाहार करणे पसंत केले जाते. मोठ्या संख्येने लोक मासे खातात आणि ते आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर देखील आहे.
मात्र कोणत्याही गोष्टीचे अतिसेवन हानिकारक आहे. मासे खाणाऱ्या लोकांना कर्करोगाचा धोका जास्त असतो, असे नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून समोर आले आहे. याचा परिणाम गरोदर महिला आणि मुलांवर होऊ शकतो. झी न्यूज हिंदीमध्ये दिलेल्या माहितीनुसार, हल्ली माशांनाही विषबाधा होऊ लागली आहे. पर्यावरण संरक्षण संस्था आणि अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या संयुक्त अभ्यासात असे आढळून आले आहे की, तलाव आणि नद्यांचे पाणी अत्यंत प्रदूषित झाले आहे.
Cancer Symptom : नखंही देतात कॅन्सरचे संकेत! हे बदल दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा
या प्रदूषित पाण्यामुळे त्या पाण्यातील मासेही आता विषारी बनत आहेत. ताज्या पाण्यातील माशांमध्ये 278 पट फॉरेव्हर केमिकल आढळले आहे, ज्यामुळे गंभीर आजार होऊ शकतात. असा दावा अभ्यासात करण्यात आला आहे. जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती.
फॉरेव्हर केमिकल म्हणजे काय?
फॉरेव्हर केमिकलला प्रति-आणि-पॉलीफ्लुरोआल्किल पदार्थ म्हणून देखील ओळखले जाते. हे केमिकल छत्री, रेनकोट, मोबाईल कव्हर इत्यादीसारख्या पाण्याचा विरोध करणाऱ्या गोष्टीमध्ये वापरले जाते. या रसायनाचा थेट परिणाम हार्मोन्स आणि वाढीवर होतो, ज्यामुळे थायरॉईड आणि खराब कोलेस्ट्रॉलसारख्या समस्या उद्भवतात.
फॉरेव्हर केमिकलमुळे गर्भवती महिलांनाही समस्या येऊ शकतात. यामुळे त्यांचा गर्भपात किंवा वेळेपूर्वी प्रसूती होण्याची दाट शक्यता असते. यामुळे मुलांच्या शरीराचा आणि मनाचा योग्य विकास होत नाही. 2017 मध्ये इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरने PFOA ला मानवी कार्सिनोजेन म्हटले आहे. म्हणजे यामुळे कर्करोगाचा धोका असतो. विशेषतः मूत्रपिंड आणि वृषणाचा म्हणजेच टेस्टीसचा कर्करोग.
अमेरिकेतील नद्या आणि तलावांमध्ये 3 वर्षांच्या संशोधनानंतर असे समोर आले की, हे रसायन प्राण्यांमध्ये 2,400 पट जास्त मिळू लागले आहे. याचे उदाहरण द्यायचे झाल्यास आपण असे म्हणू शकतो की, महिन्यातून एकदा मासे खाणे म्हणजे महिनाभर बॅक्टेरिया आणि इतर जंतूंनी भरलेले पाणी पिणे. हा प्रकार अमेरिकेतील एका नव्हे तर ४८ राज्यांमध्ये आढळून आला आहे. त्यामुळे मासे खाताना काळजी घ्या आणि कोणत्याही प्रकारचा त्रास झाल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.
Health Tips : तिशीनंतर महिलांनी करून घ्यायलाच हव्यात या पाच तपासण्या
(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips, Lifestyle