देशातल्या पहिल्या 'टॉयलेट कॉलेज'मधून उत्तीर्ण झाले 3 हजाराहून जास्त लोक, दररोज असतो तीन तासांचा क्लास

देशातल्या पहिल्या 'टॉयलेट कॉलेज'मधून उत्तीर्ण झाले 3 हजाराहून जास्त लोक, दररोज असतो तीन तासांचा क्लास

महिलांसाठी दुपारी 1 ते 4 वाजेपर्यंत आणि पुरुषांसाठी संध्याकाळी 4 ते 7 असे वर्ग भरायचे.

  • Share this:

नवी दिल्ली, 03 ऑक्टोबर- गेल्या वर्षी जवळपास 3 हजार 200 स्वच्छता कर्मचाऱ्यांना देशातील पहिलं 'टॉयलेट कॉलेज' म्हटल्या जाणाऱ्या संस्थेत प्रशिक्षण देण्यात आलं होतं. त्यांना प्रशिक्षणानंतर खासगी क्षेत्राप्रमाणे पगारही देण्यात आला. औरंगाबाद येथील 'हार्पिक वर्ल्ड टॉयलेट कॉलेज' हे स्वच्छता कर्मचाऱ्यांना त्यांची कार्यकुशलता वाढवण्यासाठी आणि त्यांच्या कार्यासंबंधीत धोक्यांबद्दल जागरुक करण्यासाठी सहाय्य करत आहेत. ऑगस्ट 2018 मध्ये या कॉलेजची स्थापना करण्यात आली. ब्रिटीश कंपनी रेकिट बेनकायजर द्वारा हे कॉलेज चालवलं जातं.

कंपनीने दिलेल्या एका वक्तव्यात म्हटलं की, कॉलेजने 3 हजार 200 स्वच्छता कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं आहे आणि त्या सर्वांना रोजगार देण्यात सहाय्यही केलं आहे. प्रशिक्षण घेतलेल्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवरील संघटना आणि कंपन्यांमध्ये रोजगार मिळाला आहे.

'हार्पिक वर्ल्ड टॉयलेट कॉलेज' मध्ये 25-30 कर्मचाऱ्यांची संख्या असणाऱ्या वर्गांचे दररोज तीन तास क्लास असायचे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, महिलांसाठी दुपारी 1 ते 4 वाजेपर्यंत आणि पुरुषांसाठी संध्याकाळी 4 ते 7 असे वर्ग भरायचे.

कंपनीने हेही सांगितले की, प्रशिक्षित स्वच्छता कर्मचाऱ्यांनी त्यांच्या क्षेत्रात सर्वोत्तम ज्ञान आणि कौशल्य संपादन केलं आणि ते आपल्या समुदायात जाऊन इतर हजारो स्वच्छता कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाला प्रशिक्षित करतील.

काँग्रेस नेत्यांमधील वाद कॅमेऱ्यात कैद; उमेदवारीवरून नाराजीचा VIDEO VIRAL

Published by: Madhura Nerurkar
First published: October 3, 2019, 3:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading