या घरांवर होत नाही वादळ, पाऊस आणि उन्हाचा कोणताच परिणाम, जाणून घ्या वैशिष्ट्य

या घरांवर होत नाही वादळ, पाऊस आणि उन्हाचा कोणताच परिणाम, जाणून घ्या वैशिष्ट्य

इंजीनिअर मॉर्गन बायसरचेंक यांनी ही घरं डिझाइन केली आहेत. विशेष म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागी तुम्ही ही घरं हलवू शकता.

  • Share this:

नवनवीन तंत्रज्ञानासोबत लोकांच्या राहणीमानात आणि दिनक्रमात अनेक बदल झाले. आता जीवन जगण्यासाठी लोकांच्या समोर असणारी आव्हानं ही फार वेगळी आहेत. सुरुवातीला लोक विटा, मातीच्या घरांमध्ये राहायचे. आता लोक फुलप्रूफ घराच्या शोधात असतात. असं घर ज्यावर वादळ, पूर अशी कोणतीही नैसर्गिक आपत्ती आली तरी त्याचा फारसा परिणाम होणार नाही. लोकांच्या बदलत्या गरजा पाहून अमेरिकेतील सियटल राज्यातील जियोशिपने काही अशी घरं तयार केली ज्यावर हवा, पाणी आणि उन्हाचा कोणताच फरक पडणार नाही.

इंजीनिअर मॉर्गन बायसरचेंक यांनी ही घरं डिझाइन केली आहेत. विशेष म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागी तुम्ही ही घरं हलवू शकता. मॉर्गन यांनी नोकरी सुरू करण्यापूर्वी ते अशा ठिकाणी राहत होते जिथे नैसर्गिक आपत्ती ही फार जास्त प्रमाणात होती. हे पाहून त्यांनी टिकाऊ आणि बजेटमध्ये असणारी घरं बांधण्याचा निश्चय केला. अशी घरं जी नैसर्गिक आपत्तीमध्येही सक्षम असतील.

या घरांच्या निर्मितीसाठी त्यांनी बायोसेरेमिक मटेरियलचा वापर केला. हे खनिजापासून तयार होतात. याचमुळे ते फार लवचिकही असतात. डॉक्टर या मटेरियला उपयोग दांत आणि हाडं तयार करण्यासाठी करतात. सर्वात विशेष गोष्ट म्हणजे या मटेरिअलपासून तयार करण्यात आलेल्या घरांवर केमिकलचाही काही परिणाम होत नाही.

आता प्रेमाला म्हणा नकोच, कारण त्याचाही आहे अनोखा फायदा!

हॉट योगा करून या आजारापासून होऊ शकता मुक्त

या रामबाण उपायांनी मिळवा मायग्रेनपासून सुटका!

हे चार ड्रायफ्रूट्स तुम्हाला अनेक आजारांपासून ठेवतं दूर!

VIDEO: मुंबईत असल्फा इथे घराची भिंत कोसळली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: lifestyle
First Published: Sep 8, 2019 05:28 PM IST

ताज्या बातम्या