• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • शोधा म्हणजे सापडेल! खोडात लपलेला भयंकर प्राणी तुम्हाला दिसला का?

शोधा म्हणजे सापडेल! खोडात लपलेला भयंकर प्राणी तुम्हाला दिसला का?

या फोटोत दडलेला प्राणी तुम्हाला सापडतोय का?

 • Share this:
  मुंबई, 02 सप्टेंबर : काही जणांना एखादी वस्तू समोर असली तरी दिसत नाही तर काही जणं अगदी दूरूनही वस्तू एका फटक्यात शोधून दाखवतात. मग त्यांचे डोळे शार्प असतात म्हणा किंवा त्यांची नजर तेज असते म्हणा. पण त्यांच्यातील टॅलेंटला मात्र दाद देण्यासारखी असते. तुमच्याकडेही असं कौशल्य असेल तर मग तुम्ही हे चॅलेंज घ्या (Challenge). सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल (Social media viral photo) होतो आहे. जो एका झाडाच्या खोडाचा फोटो आहे. या फोटोत एक भयंकर प्राणीही लपलेला (Find the animal) आहे. जो प्रत्येकाला दिसेलच असं नाही.  तो तुम्हाला शोधून दाखवायचा आहे (Find the object). आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटरवर हा फोटो शेअर केला आहे. फोटो पाहिला तर तुम्हाला हे फक्त झाडाचं खोड वाटेल. पण हे फक्त खोड नाही तर या खोडात लपला आहे एक भयंकर प्राणी. विश्वास बसत नाही आहे ना. मग हा फोटो नीट पाहा. हे वाचा - दाखवून द्या तुम्हीच आहात हुश्शार! VIDEO मध्ये मधमाश्यांच्या 'राणी'ला शोधा फोटो नीट निरखून पाहिला तर तुम्हाला  यामध्ये एक विषारी साप लपला आहे. खोडाच्या अगदी समोरच हा साप आहे, जो अगदी खोडाप्रमाणेच आहे. त्याची रचना, त्याचा रंग त्याचा आकार अगदी या खोडात इतका एकरूप झाला आहे की, या खोडातून साप शोधणं कठीण नाही तर जवळजवळ अशक्यच वाटतं. हे वाचा - इथं लपलाय भला मोठा अजगर; आधी तुम्ही शोधा मग इतरांनाही चॅलेंज द्या तुम्ही हा साप शोधला असेल तर आता हे चॅलेंज तुमच्या मित्रमैत्रिणींना द्यायला विसरू नका. बघा तुमच्याप्रमाणे त्यांचे डोळेही शार्प आहेत ही नाही.
  Published by:Priya Lad
  First published: