नवी दिल्ली, 30 डिसेंबर : हृदयविकाराच्या झटक्याने एखादी व्यक्ती छातीला हात लावून लोळते, डोळे विचित्रपणे फिरवते, तीव्र वेदनांनी आक्रोश करते, असे आपण अनेकांनी पाहिले किंवा ऐकले असेल. पण, अनेकांच्या बाबतीत हे फार क्वचितच घडते. अनेकदा प्रत्येकाला असे वाटते की, हृदयविकाराचा झटका नेहमीच तीव्र वेगानं येतो. पण सत्य हे आहे की काहीवेळा तुम्हाला हृदयविकाराचा झटका आला आहे की, नाही हे देखील कळत नाही कारण तो अगदी लहान ( what is a silent heart attack and its symptoms) स्वरूपात येतो.
'टीव्ही 9'ने दिलेल्या माहितीनुसार, बर्याच लोकांसोबत असे घडते की, हृदयविकाराचा झटका इतका सूक्ष्म असतो की लोकांना तो लक्षातही येत नाही, परंतु नंतर तो जीवासाठी धोकादायक ठरतो. अशा स्थितीत आज आपण अशा सायलेंट लक्षणांबद्दल जाणून घेऊया, जे हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे आहेत-
सायलेंट हृदयविकाराचा (silent heart attack) झटका म्हणजे काय?
हृदयाला कार्य करण्यासाठी ऑक्सिजन-समृद्ध रक्ताची आवश्यकता असते, त्यामुळे हृदयापर्यंत रक्त वाहून नेणाऱ्या धमन्यांमध्ये प्लेक तयार झाल्यास, हा रक्त प्रवाह लक्षणीयरीत्या किंवा पूर्णपणे बंद होऊ शकतो. त्यावेळेस आणि जितका जास्त काळ तुमच्या हृदयाला रक्तपुरवठा होत नाही तितके अधिक नुकसान होईल, ज्यामुळे सायलेंट आर्ट अटॅक होण्याची शक्यता असते.
1: छातीत दुखणे, दाब आणि अस्वस्थता या गोष्टी काहीवेळा हृदयविकाराच्या झटक्यामध्ये तीव्र स्वरुपात जाणवतात, या लक्षणांवर आपण ओळखू शकतो. असे नसल्यास, तुमच्या छातीच्या मध्यभागी फक्त थोडी वेदना किंवा अस्वस्थता जाणवते. यामुळे तुम्हाला थोडासा दबाव आणि अस्वस्थता देखील जाणवू शकते. जेव्हा ही लक्षणे दिसतात तेव्हा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो, जी नंतर धोकादायक बनतात.
हे वाचा - EPF अकाऊंटवर नॉमिनी जोडण्यासाठी दोन दिवस बाकी; 5 मिनिटात ऑनलाईन अपडेट करा
2. जर तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा अचानक चक्कर येत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नये. तुम्हाला छातीत दुखण्यासोबत किंवा त्याशिवाय श्वासोच्छवासाचा त्रास होऊ शकतो आणि हे सायलेंट हृदयविकाराचे सामान्य लक्षण आहे. तुम्हाला चक्कर येऊ शकते किंवा तुम्ही बेशुद्ध होऊ शकता.
3. थंड घाम येणे, मळमळणे ही देखील सायलेंट हृदयविकाराची लक्षणे असू शकतात. सहसा ही लक्षणे फ्लूमध्ये आढळतात परंतु फ्लूच्या उपचाराने आराम मिळत नसेल तर गंभीरपणे घ्या आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.
4. तुम्हाला कधीही कोणत्याही प्रकारे अस्वस्थ वाटत असल्यास हृदयविकाराचा झटका टाळण्याचा सर्वांत चांगला मार्ग म्हणजे तुमच्या हृदयाची तपासणी करणे.
हे वाचा - Kitchen Hacks : काही केल्या रव्यामध्ये किडे होतातच ना? मग या सोप्या उपायांनी स्वच्छ करा
(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.