Home /News /lifestyle /

Health Budget 2022: अर्थसंकल्पातून आरोग्य विभागाला मिळाला का बूस्टर डोस? आणखी 75 हजार ग्रामीण आरोग्य केंद्रे उघडणार

Health Budget 2022: अर्थसंकल्पातून आरोग्य विभागाला मिळाला का बूस्टर डोस? आणखी 75 हजार ग्रामीण आरोग्य केंद्रे उघडणार

Health Budget 2022-23: मानसिक आजारांसाठी राष्ट्रीय टेलिमेंटल हेल्थ प्रोग्राम सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. टेलीमेंटल हेल्थ म्हणजे मानसिक आजारांच्या बाबतीत आरोग्य सेवांसाठी दूरसंचार किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 01 फेब्रुवारी : आज 2022-23 या वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी (Health Sector) अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी विशेषतः कोरोनाच्या काळात (भारतातील कोविड-19 कालावधी) केलेल्या अनेक घोषणांचा उल्लेख केला. त्या म्हणाल्या की, आमच्यासमोर ओमिक्रॉन लाटेचे आव्हान आहे. देशातील लसीकरणाच्या गतीने या आव्हानाला सामोरे जाण्यास खूप मदत झाली आहे. आत्मनिर्भर स्वास्थ्य योजनेविषयी मोठी घोषणा करताना अर्थमंत्र्यांनी आरोग्य बजेटमध्ये 135 टक्के वाढ करणार असल्याचे सांगितले. यासाठीचे बजेट 94 हजार कोटीवरून 2.38 लाख कोटी रुपये करण्यात आलं आहे. यासोबतच केंद्र सरकार पुढील 6 वर्षात आरोग्य क्षेत्रात सुमारे 61 हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. आता प्राथमिक स्तरापासून उच्च स्तरापर्यंत आरोग्य सेवांवर सरकारचे लक्ष असेल, असे अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे. विशेषत: नवीन आजारांबाबत विशेष काळजी घेतली जाईल आणि त्यावर होणारा खर्च राष्ट्रीय आरोग्य अभियानापेक्षा वेगळा असेल. 75 हजार ग्रामीण आरोग्य केंद्रे सुरू होतील या अर्थसंकल्पानुसार देशात आणखी 75 हजार ग्रामीण आरोग्य केंद्रे उघडण्यात येणार आहेत. देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये चाचणी केंद्रे आणि 602 जिल्ह्यांमध्ये अतिदक्षता रुग्णालये उघडली जातील. यासोबतच पोषणावर भर देण्यात येणार असून जल जीवन मिशन (शहरी) देखील सुरू करण्यात येणार आहे. 500 अमृत शहरांमध्ये स्वच्छता करण्यावर भर दिला जाणार आहे. स्वच्छतेसाठी सुमारे 2 लाख 80 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. शहरी स्वच्छ भारत मिशन 2.0 वर पुढील 5 वर्षांत एक लाख 41 हजार कोटी रुपये खर्च केले जातील. यासोबतच 2 हजार कोटी रुपये फक्त स्वच्छ हवेसाठी केले जाणार आहेत. गेल्या अर्थसंकल्पात काय होते विशेष म्हणजे, 2021-22 च्या शेवटच्या अर्थसंकल्पात कोविड-19 लसीसाठी 35,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. गेल्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी प्रतिबंध, उपचार आणि काळजी या तीन गोष्टींवर भर देण्यात आला होता. 2022-23 च्या अर्थसंकल्पातही याची दखल घेण्यात आली आहे. कोरोना संदर्भात कोणता विशेष आरोग्य कार्यक्रम या अर्थसंकल्पात कोरोनापासून मानसिक आजारांसाठी राष्ट्रीय टेलिमेंटल हेल्थ प्रोग्राम सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. टेलीमेंटल हेल्थ म्हणजे मानसिक आजारांच्या बाबतीत आरोग्य सेवांसाठी दूरसंचार किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मानसिक रुग्णांसाठी टेलीमेंटल हेल्थ खूप प्रभावी आहे. कोविड महामारीमुळे त्याची गरज आणखी वाढली आहे. हे वाचा - Union Budget 2022: 60 लाख नोकऱ्या ते 200 चॅनेल्स, शिक्षण आणि रोजगारासंबंधी ‘या’ आहेत मोठ्या घोषणा; वाचा सविस्तर मानसिक आरोग्य कार्यक्रम सुरू होतील त्याचबरोबर नॅशनल डिजिटल हेल्थ इकोसिस्टमसाठी खुले व्यासपीठ सुरू केले जाईल. यामध्ये, आरोग्य पुरवठादार आणि आरोग्य सुविधांची डिजिटल नोंदणी, आरोग्याची विशिष्ट ओळख, संमती फ्रेमवर्क आणि आरोग्य सुविधांमध्ये सहज प्रवेश सुनिश्चित केला जाईल. यासोबतच नॅशनल टेली मेंटल हेल्थ प्रोग्रामही सुरू करण्यात येणार आहे. कोरोना महामारीमुळे सर्व वयोगटातील लोकांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. दर्जेदार मानसिक आरोग्य समुपदेशन आणि काळजी सेवा मिळण्यासाठी 'नॅशनल टेली मेंटल हेल्थ प्रोग्राम' सुरू केला जाईल. हे वाचा - Budget 2022 : ‘हर घर, नल से जल’ योजनेसाठी 60,000 कोटी रुपयांची तरतूद; 3.8 कोटी घरांना लाभ मिळणार या बजेटमध्ये ईशान्य भारतातील गुवाहाटी येथे 129 कोटी रुपये खर्चून बालरोग आणि कर्करोग रुग्णालय उभारले जाणार आहे. 2022-23 च्या आरोग्य बजेटमध्ये 86 हजार 606 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 2021-22 या वर्षासाठी 85 कोटी 915 रुपये वाटप करण्यात आले.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips, Union budget

    पुढील बातम्या