इडली, डोसा, ढोकळा; चविष्ट नाश्त्यासह कोरोनाशी लढण्यासाठी ताकदही वाढवा

इडली, डोसा, ढोकळा; चविष्ट नाश्त्यासह कोरोनाशी लढण्यासाठी ताकदही वाढवा

कोरोना काळात आपली इम्युनिटी (immunity) वाढवण्यासाठी आहारही महत्त्वाचा आहे.

  • Share this:

दिल्ली, 3 मे :  कोरोनापासून बचाव करण्यासाठी (Coronavirusमास्क, स्वच्छता, सोशल डिस्टन्सिंग यांच्याप्रमाणेच महत्त्वाची आहे इम्युनिटी म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती. ती वाढवण्यासाठी चांगल्या आहाराकडे लक्ष द्यायला हवं. फर्मेंटेड फूड (fermented food) इम्युनिटी  वाढवण्यासाठी फायदेशीर असतात. फर्मेंटेड फूड इम्युनिटी वाढवतातच त्याबरोबर शरीराशी संबंधीत अनेक समस्या संपवातात. फर्मेंटेड फूड म्हणजे नेमकं काय आहे ? ते खाण्याचे काय फायदे आहेत ? जाणून घेऊयात.

फर्मेंटेड फूडम्हणजे आंबवलेले पदार्थ. फर्मेंटेशन होताना बॅक्टेरीया, ईस्ट किंवा बुरशीजन्य सुक्ष्मजीव आर्गेंनिक कंपाऊंडला अॅसिडमध्ये बदलतात. अॅसिड प्रिजर्वेटीव्ह सारखं काम करतं त्यामुळे जेवणाची चव वाढते. एखादा पदार्थ फर्मेंट करताना रात्रभर किंवा काही तास रूम टेंप्रेचरवर ठेवला जातो. त्यानंतर त्यात प्रक्रिया सुरू होते. आंबवण्याच्या प्रक्रियेवेळी जो बॅक्टेरीया तयार होतो त्याला प्रोबायोडिक म्हणतात. फर्मेंटेड फूड खाण्याचे बरेच फायदे आहेत.

(एक रेमडेसिवीर इंजेक्शनची 35 हजारला विक्री; काळाबाजार करणाऱ्या नर्ससह दोघांना अटक)

इडली, डोसा, ब्रेड,ढोकळा,दही, मठ्ठा, लोणचं, दही-भात, योगर्ट, जिलेबी अशा प्रकारचे काही फर्मेंटेड फूड आहेत. हे फर्मेंटेड फूड आपल्या रोजच्या आहारात समाविष्ट करा. जरी दरारोज यांचे सेवन जमले नाही तरी, काही दिवसाआड हे पदार्थ जेवणात घ्यावेत.

इम्युनिटी बूस्टर

फर्मेंटेड फूड इम्युनिटी बूस्टर (Immunity booster)  आहेत. त्यांच्यामुळे इम्युनिटी मजबूत होते. फर्मेंटेड फूड इम्युनिटी वाढवून शरीर ताकतवान बनवतात.

आतड्यासाठी फायदेशीर

फर्मेंटेड फूड आतड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे पचनक्रिया सुधारते. अपचन, गॅस, अॅसिडीटीसारखे आजार दूर राहतात. फर्मेंटेड फूडमध्ये असणारं लॅक्टीक अॅसिड आतडे चांगले राहण्यासाठी फायदेशीर आहेत.

(Oxygen Crisis : ऑक्सिजन संपल्याने रुग्णालयात डॉक्टरसहित 8 रुग्णांचा मृत्यू)

वजन कमी करण्यासाठी

वजन कमी करायचं असेल तर फर्मेंटेड फूड खा. मेटॉबॉलिजम चांगलं राहण्यासाठी फर्मेंटेड फूड खाणं चांगलं आहे. त्याने पोटाच्या समस्या कमी होतात त्यामुळे वजन लवकर कमी होतं.

(दगड, माती आणि बरंच काही...; 8 महिन्यांच्या बाळाला खायला देते ही आई कारण...)

व्हिटॅमिन बी 12

फर्मेंटेड फूड शरीरातील व्हिटॅमीन बी 12 ची कमी पूर्ण करतं. नॉनव्हेज न खाणाऱ्यासाठी फर्मेंटेड फूट बी 12 चा स्त्रोत आहे. शरीराची बी 12 ची गरज पूर्ण करण्याचं काम फर्मेटेड फूडने होऊ शकतं.

Published by: News18 Desk
First published: May 3, 2021, 9:00 AM IST

ताज्या बातम्या