Home /News /lifestyle /

Fenugreek leaves: मधुमेहावर मेथीची पाने आहेत रामबाण इलाज; हिवाळ्यातील आहारात असा करा समावेश

Fenugreek leaves: मधुमेहावर मेथीची पाने आहेत रामबाण इलाज; हिवाळ्यातील आहारात असा करा समावेश

मेथीची पानं मधुमेहींसाठी (Diabetics) आणि हृदयरोगींसाठी फायदेशीर मानली जातात. मेथीची पानं स्थूलपणा कमी करण्यातही खूप (Fenugreek leaves health benefit) गुणकारी आहेत.

    नवी दिल्ली, 10 डिसेंबर : हिवाळा ऋतू तब्येतीसाठी खूप चांगला मानला जातो. या हंगामात हिरव्या भाज्या सर्वत्र आढळतात. त्यांचा आरोग्यासाठी खूप फायदा होतो. मेथीची पानं मधुमेहींसाठी (Diabetics) आणि हृदयरोगींसाठी फायदेशीर मानली जातात. मेथीची पानं स्थूलपणा कमी करण्यातही खूप (Fenugreek leaves health benefit) गुणकारी आहेत. मेथीच्या भाजीचे अनेक आरोग्यदायी गुणधर्म (Healthy benefit) असल्यानं आणि ती सहजपणे उपलब्धही होत असल्यानं बहुतेक घरांमध्ये ही भाजी केली जातेच. काही जणांना मेथीची पानं कच्ची खायला आवडतं, काहींना मेथीची भाजी आवडते. तसंच, मेथीच्या बियांचाही अनेकजण वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वापर करतात. चला जाणून, घेऊया मेथीच्या पानांचा शरीराला कसा फायदा होतो. मधुमेहात फायदेशीर- मेथीची पाने टाइप 1 आणि टाईप 2 या दोन्ही मधुमेहांत खूप फायदेशीर आहेत. मेथी शरीरातील इन्सुलिनचं प्रमाण वाढवते, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप महत्वाचे आहे. यामध्ये असलेले फायबर पचनक्रिया मंदावते, ज्यामुळं शरीरात साखरेचं शोषण लवकर होत नाही. मधुमेहाच्या रुग्णांनी मेथीची भाजी जरूर खावी. कोलेस्टेरॉल कमी करते - मेथीची पाने कोलेस्टेरॉलचं शोषण कमी करतात आणि यकृतामध्ये कोलेस्टेरॉल तयार होण्यापासून रोखतात. डायबिटीजसह एथेरोस्क्लेरोसिसच्या रुग्णांसाठी देखील हे खूप फायदेशीर आहे. काही अभ्यासानुसार, मेथी शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल (HDL) वाढवण्याचं आणि खराब कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करण्याचं काम करते. पचन सुधारते मेथी- मेथीच्या पानांमध्ये फायबरसोबत अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. ज्या लोकांना पोटाचा त्रास होतो, त्यांनी आपल्या आहारात मेथीचा समावेश जरूर करावा. मेथीच्या पानांचा चहा बद्धकोष्ठता, अपचन आणि पोटदुखी दूर करतो. याशिवाय आतड्यांवरील जळजळ आणि पोटातील अल्सरमध्येही हे खूप फायदेशीर आहे. मेथीची पाने खाल्ल्यानं अॅसिडिटीची समस्याही दूर होते. पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन वाढवते - मेथी पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोनचं उत्पादन वाढवण्याचं काम करते. मेथीमध्ये फ्युरोस्टानोलिक सॅपोनिन्स असतात, जे टेस्टोस्टेरॉन वाढवतात. मेथीमुळं लैंगिक इच्छादेखील वाढते, असं अनेक अभ्यासात आढळून आले आहे. हे वाचा - Smoking Effect: धुम्रपानामुळे होऊ शकतो हा गंभीर आजार, बरा होणेही शक्य नाही – नवीन संशोधन हृदयाच्या रुग्णांसाठी फायदेशीर- मेथीचे दाणे किंवा त्याची पानं नियमित सेवन करणं हृदयरोगींसाठी खूप फायदेशीर आहे. मेथीमुळं हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक झाल्यास रक्त गोठण्यास प्रतिबंध होतो. मेथीची भाजी रोज खाल्ल्यानं हृदयाशी संबंधित अनेक आजारांचा धोका कमी होतो. हे वाचा - Healthy Drink : मेथी-ओव्याचे पाणी पिण्याचे आरोग्यासाठी आहेत अनेक फायदे, जाणून घ्या बनवण्याची पद्धत स्थूलपणा कमी करण्यासाठी मेथी प्रभावी- जर तुम्ही स्थूलपणा कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर मेथीपेक्षा चांगला पर्याय असू शकत नाही. एक कप मेथीच्या पानात फक्त 13 कॅलरीज असतात. हे थोडंसं खाल्ल्यानं तुम्हाला तुमचे पोट चांगलं भरलं आहे, असं वाटतं. त्यानंतर तुम्हाला लवकर भूक लागत नाही. यामुळंच तुम्ही अतिरिक्त कॅलरी खाण्यापासून वाचता आणि स्थूलपणा सहजपणे कमी होण्यास मदत होते. (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health Tips, Tips for diabetes

    पुढील बातम्या