मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Healthy Drink : मेथी-ओव्याचे पाणी पिण्याचे आरोग्यासाठी आहेत अनेक फायदे, जाणून घ्या बनवण्याची पद्धत

Healthy Drink : मेथी-ओव्याचे पाणी पिण्याचे आरोग्यासाठी आहेत अनेक फायदे, जाणून घ्या बनवण्याची पद्धत

ओवा आणि मेथी दोन्ही पचनासाठी खूप चांगली असते. त्यामुळे पचनक्रिया सुधारते. यामुळे बद्धकोष्ठता, अपचन आणि जळजळ यांसारख्या पाचन समस्या कमी होतात. तज्ज्ञांच्या मते, ओवा आणि मेथीचे पाणी पोटाच्या आरोग्यासाठीही खूप चांगले असते.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 09 डिसेंबर : मेथी आणि ओव्याचे पाणी पिण्याचे (Fenugreek and ova water) अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. पचनक्रिया मजबूत होण्यासह वजन वाढण्यावर नियंत्रण ठेवण्यापर्यंत हे पेय तुम्हाला अनेक आरोग्य समस्यांवर उपचार करण्यास मदत करू शकते.

मेथी ओव्याचे पाणी कसे बनवायचे?

हे पाणी बनवण्यासाठी तुम्हाला 1 टेबलस्पून मेथीचे दाणे, 1 टेबलस्पून ओव्याचे दाणे आणि पाणी लागेल. एक ग्लास पाण्यात मेथी आणि ओव्याचे दाणे घाला. हे मिश्रण रात्रभर तसेच ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी हे पेय गाळून प्यावे.

मेथी-ओव्याचे पाणी (Fenugreek and ova water) पिण्याचे फायदे

पचनासाठी फायदेशीर

ओवा आणि मेथी दोन्ही पचनासाठी खूप चांगली असते. त्यामुळे पचनक्रिया सुधारते. यामुळे बद्धकोष्ठता, अपचन आणि जळजळ यांसारख्या पाचन समस्या कमी होतात. तज्ज्ञांच्या मते, ओवा आणि मेथीचे पाणी पोटाच्या आरोग्यासाठीही खूप चांगले असते.

वजन कमी

मेथी शरीरातील चयापचय दर सुधारण्यास मदत करते, तर ओवा शरीरात जमा झालेली चरबी काढून टाकण्यास मदत करतो. या दोन्हींमुळे वजन कमी होते. सकाळी मेथी आणि ओव्याचे पाणी प्यायल्याने तुम्‍हाला दीर्घकाळ ताजेतवाणे आणि अ‌ॅक्टिव राहण्यास मदत होते.

हे वाचा - भारताचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेणाऱ्या 21 वर्षीय महिला शूटिंग खेळाडूची आत्महत्या

मधुमेह

मेथी आणि ओव्याचे दाणे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते फायदेशीर आहे. ओवा रक्तातील साखरेचे प्रमाण स्थिर ठेवण्यास मदत करतो. ज्यामुळे मधुमेह नियंत्रित ठेवण्यास मदत होते. आहारतज्ज्ञांच्या मते मेथीचे पाणी मधुमेहाच्या रुग्णांसाठी चांगले असते. तसेच हाडांचे दुखणे दूर होण्यास मदत होते.

हे वाचा - Mega Job Alert: महाराष्ट्र भूमी अभिलेख विभागात तब्बल 1013 पदांसाठी मोठी भरती; या शहरांमध्ये जागा रिक्त

सर्दी, खोकल्यावर उपयोगी

या बदलत्या ऋतूमुळे आपल्यापैकी अनेकांना सर्दी आणि खोकल्याचा त्रास होतो. यामध्ये मेथी आणि ओव्याचे पाणी सर्दी आणि खोकला नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. भरलेली छाती हलकी होण्यास मदत होते. याचे पाणी तुमच्या शरीरात उष्णता निर्माण करण्यास मदत करते ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते आणि सर्दी आणि खोकला सारख्या समस्या टाळता येतात. हे पेय पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि सहसा त्याचे कोणतेही साइड इफेक्ट्स नसले तरी, अगोदरपासून तुम्ही काही उपचार घेत असल्यास याचा उपयोग करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Health, Health Tips