मुंबई, 27 नोव्हेंबर : जर तुम्ही कामावरून आलात आणि खूप थकला असाल तर तुमच्या शरीरात वेदना होतील. थकलेले शरीर तुम्हाला लहान बाळासारखे झोपायला भाग पडते. पण जेव्हा असा थकवा येतो तेव्हा केवळ झोपल्याने आराम मिळत नाही. पायाला मसाज केल्याने तुमच्या शरीराला जास्त आराम मिळतो. आज आम्ही तुम्हाला पायाला मसाग केल्याने होणाऱ्या काही अद्भुत फायद्यांबद्दल माहिती देणार आहोत.
तुमचे पाय तुमच्या शरीराची प्रत्येक क्रिया, प्रतिक्रिया सहन करतात. थकल्यावर कोणी पाय दाबले किंवा हलका मसाज दिला तर शरीराला आराम मिळतो. झोपण्यापूर्वी पायाची मसाज केल्याने तुम्हाला चांगली झोप येण्यास मदत होईल. पायाला मसाज केल्याने वेदना कमी होतातच पण रक्तप्रवाहही वाढतो. इंस्टाग्रामवर आयुर्वेद एक्सपर्ट डॉ. वारा लक्ष्मी यनामांद्रा यांनी पायाला मसाज करण्याच्या काही अद्भुत फायद्यांबद्दल माहिती दिली आहे.
Cold Home Remedy : सर्दीपासून मिळेल लवकर आराम; फक्त वाफ घेताना पाण्यात टाका या गोष्टी
पायांना मसाज करण्याचे फायदे
- आपल्या पायांमध्ये 4 महत्त्वाचे पॉईंट्स असतात, जे आपल्या डोळ्यांशी संबंधित आहेत. जर तुम्ही रोज पायांना मसाज केली. तर तुमची दृष्टी सुधारू शकते आणि यामुळे डोळ्यांना आराम मिळतो.
- पायातील असलेले प्रेशर पॉईंट्स दाबले गेल्याने शरीरातील वात संतुलित करण्यास मदत होते. वात असंतुलित झाल्यास बद्धकोष्ठता, अशक्तपणा, उच्च रक्तदाब अशा अनेक समस्या उद्भवू शकतात. पायाला मसाज केल्याने वाताला योग्य दिशा मिळते.
- पायाला मासे केल्याने तुम्हाला वेदनांपासून अराम मिळतो, तुम्ही रिलॅक्स होता आणि तुम्हाला काही ताण तणाव असेल तर तोही कमी होतो. ,सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला लवकर आणि चांगली झोप लागण्यास मदत होईल.
- पायांना मसाज केल्याने तुमचे पाय मजबूत होतील आणि ते कायम निरोगी राहतात. पायाच्या मसाजमुळे तुमचे सांधे आणि स्नायूदेखील मजबूत होतात.
या पांढऱ्या गोष्टी अनेक गंभीर आजारांचं आहेत मूळ; मर्यादेपेक्षा जास्त खाणं टाळाच
तज्ञांनी सांगितली पायांना मसाज करण्याची योग्य पद्धत
रात्री झोपण्यापूर्वी पायाला मसाज करणे चांगले मात्र तुम्ही सकाळीही करू शकता. यासाठी तीळ आणि ब्राह्मी तेल वापरणे जास्त चांगले. तेल कोमट करून ते तळपायावर लावा आणि याने पायाला चांगली मसाज करा.
View this post on Instagram
(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips, Lifestyle