मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /एकटेपणा वाटतोय? 10 मिनिटांसाठी जरा फोनवर बोला, संशोधनातून स्पष्ट झाला उपाय

एकटेपणा वाटतोय? 10 मिनिटांसाठी जरा फोनवर बोला, संशोधनातून स्पष्ट झाला उपाय

सतत अशक्तपणा वाटणे, तीव्र अंगदूखी हे अम्योट्रॉफिक लेटरल स्क्लेरोसिसचं लक्षणं असू शकतं.

सतत अशक्तपणा वाटणे, तीव्र अंगदूखी हे अम्योट्रॉफिक लेटरल स्क्लेरोसिसचं लक्षणं असू शकतं.

खूपदा लोकांना एकटं वाटतं; पण अशा वेळी काय करावं हे त्यांना सुचत नाही. आता या एकटेपणाच्या समस्येला कसं तोंड द्यायचं यावर संशोधनाद्वारे उपाय सांगितला आहे.

  नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी: आजच्या जगात सगळी सुखं पायाशी लोळण घेत असली, तरी अनेकांना ज्या समस्येला तोंड द्यावं लागतं, ती म्हणजे एकटेपणा. (Loneliness) एकटेपणाच्या या समस्येमुळे पुढे मानसिक आणि शारीरिक समस्यांनाही चालना मिळते. त्यामुळेच एकटेपणाच्या या समस्येच्या विविध पैलूंवर संशोधन होत असतं. अमेरिकेत नुकताच या संदर्भात एक अभ्यास करण्यात आला. त्याबद्दलचा लेख जामा सायकिअॅट्री नावाच्या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे. तुमच्या संभाषणावर मर्यादा असतील आणि तुम्ही आठवड्याभरात अनेक वेळा कोणाशीही 10-10 मिनिटं फोनवर बोललात, तर तुमचा एकटेपणा कमी होऊ शकतो, असं निरीक्षण या अभ्यासात नोंदवण्यात आलं. सीएनएनने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

  या अभ्यासात 240 जण सहभागी झाले होते. त्यापैकी निम्म्या सदस्यांना महिन्याभरात स्वयंसेवकांकडून (Volunteers) काही कमी कालावधीचे फोन-कॉल्स (Phone-Calls) येतील अशी व्यवस्था करण्यात आली होती. ज्यांना या कालावधीत कॉल्स आले, त्यांच्या एकटेपणाच्या भावनेत सरासरी 20 टक्के घट झाली, असं निरीक्षण त्यांनी नोंदवलं.

  पॉप्युलेशन हेल्थ (Population Health) या विषयाच्या सहयोगी प्राध्यापिका आणि ऑस्टिन येथील युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास येथील डेल मेडिकल स्कूलमधील 'फॅक्टर हेल्थ'च्या कार्यकारी संचालिका मनिंदर मिनी काहलोन (Maninder Mini Kahlon) यांच्या नेतृत्वाखाली हा अभ्यास करण्यात आला. त्यांनी सांगितलं, की फोन-कॉल करण्याची जबाबदारी ज्या स्वयंसेवकांकडे दिली होती, त्यांना सहवेदना दर्शवणारी संवादकौशल्यं (Communication Skills) शिकवण्यात आली होती. त्यात ऐकून घेण्याच्या आणि प्रश्न विचारण्याच्या कौशल्याचाही समावेश होता.

  पहिल्या आठवड्यात स्वयंसेवकांनी अभ्यासात सहभागी झालेल्या सदस्यांना आठवड्यातले पाच दिवस फोन-कॉल केला. हे योग्य असल्याचं सदस्यांनी सांगितलं. नंतरच्या आठवड्यांत सदस्यांनी आपल्याला आठवड्यातून दोन कॉल यायला हवेत, की पाच कॉल हे ठरवलं.

  अवश्य वाचा - OTT Rules 2021: सरसकट कुणालाही नाही पाहता येणार Adult Content, केंद्र सरकारची नवी नियमावली जाहीर

  काहलोन यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या आठवड्यात या कॉलवरच्या संभाषणाचा कालावधी 10 मिनिटांपेक्षा थोडा जास्त होता. मात्र नंतर तो 10 मिनिटांवर आला. या कॉल्समध्ये सदस्यांनी विविध विषयांवर संवाद साधला. त्यांच्या रोजच्या आयुष्याबद्दल सांगितलं, तसंच स्वयंसेवकांच्या आयुष्याबद्दलही विचारलं.

  ज्यांना फोन कॉल्स आले त्यांना आणि ज्यांना ताण-तणाव एकटेपणा वाटत नव्हता त्यांना, अशा दोन्ही गटांच्या एकटेपणाचं मोजमाप महिन्याच्या सुरुवातीला आणि शेवटी करण्यात आलं. यूसीएलए लोनलीनेस स्केलच्या आधारे हे मोजमाप करण्यात आलं. याची रेंज तीन ते नऊ अशी असते. फोन-कॉल्स आले त्या गटाला महिन्याच्या सुरुवातीला वाटणारा एकटेपणाचं प्रमाण त्या स्केलनुसार 6.5 एवढं होतं, ते महिन्याच्या शेवटी 5.2वर आलं.

  चिंता (Anxiety) आणि औदासीन्य (Depression) यांचीही चाचणी घेण्यात आली. त्यासाठी अनुक्रमे GAD-7 स्केल आणि PHQ-8 स्केलचा वापर करण्यात आला. त्यात अनुक्रमे 30 टक्के आणि 24 टक्के एवढी घट झाल्याचं निरीक्षण नोंदवलं गेलं.

  याचा अर्थ लावण्याची स्टँडर्ड पद्धत उपलब्ध नाही. तरीही निघालेले निष्कर्ष उत्साहवर्धक आहेत, असं काहलोन यांनी सांगितलं.

  एकटेपणा कमी करण्यासाठी कम्युनिटी बेस्ड अर्थात समुदायावर आधारित अनेक उपाययोजना आहेत; मात्र क्लिनिकली टेस्टेड उपाययोजना सहजासहजी सापडत नाहीत, असं उटाहमधील ब्रिघम यंग युनिव्हर्सिटीच्या सायकॉलॉजी आणि न्यूरोसायन्सच्या प्राध्यापिका जुलिएन होल्ट-लुन्स्टाड यांनी सांगितलं. त्यामुळे हा अभ्यास झाला ही चांगली गोष्ट असल्याचं त्या म्हणाल्या.

  तुमच्या कुटुंबातल्या, तसंच तुमचा परिवार आणि मित्रमंडळींमधल्या व्यक्तींना चिंता, तणाव, न्यूनगंड आदींनी पछाडल्याचं लक्षात आलं, तर तुम्ही त्यांच्याशी संवाद साधायला पाहिजे, असं काहलोन यांनी सांगितलं. तुम्हाला एकटेपणा वाटत असला, तरी तुम्ही तुमच्या संपर्कातल्या व्यक्तींशी संवाद साधला पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं. तुमचं म्हणणं ऐकून घेईल आणि त्याबद्दल जजमेंटल होणार नाही, अशा व्यक्तीशी संवाद साधणं गरजेचं आहे, असंही त्यांनी नमूद केलं. हा अभ्यास अधिक मोठ्या प्रमाणावर करून लोकांना उपयोगी पडण्याच्या दृष्टीने कार्य करण्याचा त्यांचा विचार आहे.

  First published:
  top videos

   Tags: Lifestyle, Mental health, Research