Home /News /lifestyle /

पांघरुणातही हुडहुडी भरते! 'तुमच्या पायजम्यात दडलंय गुपित', थंडी घालवण्याचा महिलेने सांगितला सॉलिड फंडा

पांघरुणातही हुडहुडी भरते! 'तुमच्या पायजम्यात दडलंय गुपित', थंडी घालवण्याचा महिलेने सांगितला सॉलिड फंडा

दि फ्रेंच बेडरूम कंपनीच्या (The French Bedroom Company) सह-संस्थापक आणि क्रिएटिव्ह डायरेक्टर, झोपविषयक तज्ज्ञ जॉर्जिया यांनी थंडीतही शांत झोप लागण्यासाठी टिप्स दिल्या आहेत.

    नवी दिल्ली, 26 जानेवारी : तसं पाहायला गेलं तर उकाडा कोणालाही फारसा आवडत नाही. पण थंडी खूप वाढू लागली की, उन्हाळ्याची आठवण येऊ लागते. रोजच्या कडाक्याच्या थंडीशी सामना करणं खूप कठीण वाटतं (Tips to beat the cold). अनेकांना दिवसभर पांघरूण घेऊन झोपून रहावसं वाटतं (Winter tips). मात्र, जाडजूड पांघरूण घेऊनही थंडी पळून जात नाही आणि झोप लागत नाही तेव्हा मात्र, परिस्थिती कठीण होते (Feeling cold in blanket). जॉर्जिया मेटकाफ (Georgia Metcalfe) यांनी हिवाळ्यात गोठवणाऱ्या थंडीतही स्वत:ला आणि आपल्या सभोवतालचा परिसर उबदार कसा ठेवायचा याच्या टिप्स देतात. जॉर्जिया या दि फ्रेंच बेडरूम कंपनीच्या (The French Bedroom Company) सह-संस्थापक आणि क्रिएटिव्ह डायरेक्टर आहेत. यूकेमध्ये राहणारी जॉर्जिया देखील झोपविषयक तज्ज्ञ आहे. त्यांनी चांगली झोप लागण्यासाठी टिप्स दिल्या आहेत. हे वाचा - जलद चालल्याने हृदय होतंय मजबूत, Heart fail चा धोका कमी; कसं ते पाहा सविस्तर जॉर्जिया यांच्या मते, थंडीत सर्वात मोठी समस्या म्हणजे पाय उबदार नसणं. त्यामुळं रात्रभर आपण जाड पांघरूण घेऊनही कुडकुडत राहतो. 'माझं कूस बदलण्याचं धाडसही होत नाही. कारण, थंडीत संपूर्ण बेडच बर्फाळ वाटू लागतो. अशा परिस्थितीत, झोपण्यासाठी वापरल्या जाणार्‍या स्लिपवेअरच्या जागी रेशमी पायजमा घालावा,' असं जॉर्जिया यांनी सुचवलं आहे. सिल्क पायजमा तुम्हाला रात्रभर उबदार ठेवेल. अंगावरची चादर बाजूला झाली तरी पायजमा तुम्हाला उबदार ठेवेल. शिवाय, आपल्या पलंगावरील पलंगपोसावर आणि एका वेलवेटची किंवा मखमली चादर अंथरली तर ते अधिक चांगलं होईल. मखमली कापड तुम्हाला नेहमीच्या चादरीइतकं थंड वाटणार नाही. यामुळं रात्रभर कितीही वेळा कूस बदलली तरी तुम्हाला थंडी वाजणार नाही. हे वाचा - Phone Charging करतानाही खबरदारी घेणं महत्त्वाचं, वाचा काय आहे कारण आणि वापरा या टिप्स एकाच वेळी संपूर्ण घर उबदार ठेवणं इतकं सोपं नाही. म्हणून ज्या खोलीत बसायचं आणि झोपायचं आहे, त्या खोलीत हीटर वापरा आणि त्या खोलीचा दरवाजा बहुतांशी बंद ठेवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून बाहेरची थंडी आत येऊ शकणार नाही. हा उपाय बऱ्याच काळासाठी खोलीची उष्णता टिकवून ठेवेल. तसंच झोपताना मऊ मोजे नक्की घाला. तुम्ही सुती किंवा लोकरीचे मोजे वापरू शकता. हे उपाय केल्यानं तुम्हाला रात्रभर थंडीचा त्रास होणार नाही. तसंच पाय उबदार ठेवल्यानं शरीरातील रक्तप्रवाहही चांगला राहतो. त्यामुळं झोप सहज येते.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Lifestyle, Sleep, Sleep benefits, Winter, Winter session

    पुढील बातम्या