भूत नव्हे तर सुंदर स्त्री दिसताच घाबरतात या व्यक्ती, तिचा विचार करूनही फुटतो घाम

भूत नव्हे तर सुंदर स्त्री दिसताच घाबरतात या व्यक्ती, तिचा विचार करूनही फुटतो घाम

बहुतेक पुरुषांना सुंदर स्त्री आवडते, मात्र विन्सट्राफोबिया (Venustraphobia) असलेल्या पुरुषांना सुंदर महिलांची भीती (fear of woman) वाटते.

  • Share this:

मुंबई, 20 फेब्रुवारी : भूतांना सर्वच घाबरतात मात्र एखाद्या सुंदर स्त्रीला कुणी घाबरत असल्याचं तुम्ही ऐकलंय का? हे वाचूनच तुम्हाला थोडं हसू येईल. मात्र हे खरं आहे, सुंदर स्त्रीलाही घाबरणाऱ्या व्यक्ती आहेत. एखादी सुंदर स्त्री पाहताच भीती वाटणं, हातपाय कापणं, घाम फुटणं, असं कधी तुमच्याबाबत घडलंय का? किंवा तुमच्या कुटुंबात, नात्यात, मित्रपरिवारात असं कुणी आहे का? तर त्याला हसण्यावर घेऊ नका, ती व्यक्ती विन्सट्राफोबिया (Venustraphobia) ची शिकार झालेली असू शकते.

प्रत्येक व्यक्तीला कशाची ना कशाची भीती असतेच. भीती हा एका स्वभावाचा गुण आहे. मात्र काही जणांना अगदी छोट्या छोट्या गोष्टींचीही भीती वाटते, जे हास्यास्पद वाटू शकतं. अशा भीतीकडे दुर्लक्ष केलं जातं मात्र जर का या भीतीनं एकदा मनात घर केलं की ही भीती मर्यादा ओलांडते आणि फोबियाचं (phobia) रूप घेते. विन्सट्राफोबिया हा याच फोबियातील एक प्रकार. fearof.net ने विन्सट्राफोबियाबाबत अधिक माहिती दिली आहे.

काय आहे विन्सट्राफोबिया?

विन्सट्राफोबिया म्हणजे सुंदर स्त्रीची भीती. हा फोबिया असलेले पुरुष सुंदर महिलांना भेटायला, त्यांच्याशी बोलायला घाबरता. त्यांना प्रत्यक्ष भेटणं, त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलणं सोडाच याचा विचारही त्यांच्या मनात आला की त्यांचा थरकाप उडतो.

हेदेखील वाचा - PUBG चा नादखुळा! घरातून गायब झाला मुलगा, तब्बल 1500 किमी दूर महाराष्ट्रात सापडला

विन्सट्राफोबियाची शारीरिक लक्षणं

शरीर भरपूर कापणं

श्वासाची समस्या

हृदयाचे ठोके वाढणे

हातापायांना घाम फुटणे

धाप लागणे

गुदमरल्यासारखं वाटणे

अचानक रडणे,ओरडणे

विन्सट्राफोबियाची मानसिक लक्षणं

कुठेतरी दूर निघून जाण्याचं मन करणं

आत्महत्येचा विचार मनात येणं

आपला मृत्यू झाला,आपण आंधळे झालो किंवा आपल्याला स्ट्रोक आला असं वाटणं

स्वत:ला पूर्णपणे मूर्ख समजणं

स्वत:वर नियंत्रण न राहणं

हेदेखील वाचा - तुम्हालाही खाल्ल्यानंतर खोकला येतो का? दुर्लक्ष नको, असू शकते गंभीर समस्या

First published: February 20, 2020, 3:55 PM IST

ताज्या बातम्या