Home /News /lifestyle /

Diabetes च्या भीतीने तुम्हीही Sweet खाणं पूर्णपणे बंद केलंय का? मग हे वाचाच

Diabetes च्या भीतीने तुम्हीही Sweet खाणं पूर्णपणे बंद केलंय का? मग हे वाचाच

अति साखर खाण्याचे जसे दुष्परिणाम आहेत तसेच ती पूर्णपणे बंद केल्यानेदेखील परिणाम होऊ शकतो.

मुंबई, 09 ऑक्टोबर : आपल्यापैकी कित्येक लोक गोड पदार्थांचे शौकीन असतात. पण मधुमेह झाल्यानंतर, हेच गोड कडू ठरतं. मधुमेह होऊ नये किंवा मधुमेहाची (Diabetes) लक्षणं दिसू लागल्यानंतर, वजन कमी करायचं असल्यास लोक पहिल्यांदा गोड खाणं म्हणजेच साखर (Sugar) सोडतात. कित्येक लोक मनावर दगड ठेऊन चहादेखील सोडतात. पण हे सगळं करणं खरंच फायद्याचं (Is skipping sugar beneficial) ठरतं? साखर पूर्णपणे सोडल्यामुळे आपल्याला फायदा (Benefits of skipping sugar) होतो की नुकसान? जर महिनाभर आपण साखर (Don’t eat sugar for a month) किंवा गोड पदार्थ (Sweet) खाल्लेच नाहीत तर काय होईल? अमेरिकेमध्ये करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात असं समोर आलं होतं, की साधारणपणे एक व्यक्ती वर्षाला 28 किलो साखर (Average person sugar consumption) फस्त करते. एवढ्या मोठ्या प्रमाणात साखर खाणं हे शरीरासाठी नक्कीच घातक आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिलेल्या निर्देशांनुसार, एका व्यक्तीने दिवसाला जास्तीत जास्त पाच ते सहा चमचे, किंवा 25-30 ग्रॅम साखर खायला हवी. याहून अधिक साखर खाणं (How much sugar should you eat) आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. तर दुसरीकडे अमेरिकन हार्ट असोसिएशनने (American Heart Association) म्हटलं आहे, की पुरुषांनी एका दिवसात साधारणपणे 150 कॅलरीज आणि महिलांनी 100 कॅलरीपर्यंत साखरेचं सेवन करावं. पुरुषांच्या तुलनेत महिलांनी कमी साखर खावी असं या संस्थेचं म्हणणं आहे. पण मग कमीत कमी 5-6 चमच्याऐवजी जर पूर्णपणेच साखर बंद केली तर? हे वाचा - दूषित हवा, अति आवाजामुळे बंद पडेल तुमचं हृदय; दिवाळीआधी धक्कादायक संशोधन समोर साखरेचा वापर केलेले गोड पदार्थ पूर्णपणे सोडणं हे आरोग्यासाठी फायदेशीरच (Avoiding sugar beneficial for health) ठरू शकतं. केवळ महिनाभर साखर खाणं वा वापरणं सोडल्यामुळे, तुम्हाला पहिल्यापेक्षा जास्त एनर्जेटिक वाटू लागेल. यामुळे तुमची चिडचिडही नाहीशी होईल, तसंच वेळोवेळी जाणवणारा थकवाही कमी होऊ शकतो. एवढे सगळे फायदे पाहून तुम्ही विचार करत असाल, की आता साखर बंद करू तर थोडं थांबा. एकदमच साखर खाणं सोडणंही तुमच्या शरीराला घातक ठरू शकतं. तुम्ही जर पहिल्यापासून नियमित साखर खात असाल, तर तुमच्या शरीराला त्याची सवय झालेली असते. एकदमच साखर खाणं सोडल्यामुळे (How to stop eating sugar) तुम्हाला अचानक थकवा जाणवू शकतो. असं होऊ नये यासाठी तुम्हाला टप्प्याटप्प्याने (How to skip sugar) साखर खाणं कमी करावं लागेल. म्हणजे, तुम्ही जर चहामध्ये दोन चमचे साखर घेता; तर ते कमी करून एक चमचा, अर्धा चमचा आणि मग शेवटी बंद अशा टप्प्यांमध्ये तुम्हाला साखर कमी करावी लागेल. हे वाचा - 15 ते 30 मिनिटांत कमी होते ब्लड शुगर; डायबेटिज औषधापेक्षा कमी नाही हा ज्युस आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. तुम्ही साखर पूर्णपणे बंद करणं तुमच्या आरोग्यासाठी फायद्याचं असलं तरी फळं, ड्रायफ्रूट्स असे गोड पदार्थ खाणं गरजेचं आहे. पूर्णपणे गोड पदार्थ सोडणं (Eating sweet fruits is a must) तुमच्यासाठी घातक ठरू शकतं. यामुळे तुमच्या बॉडी फॅटपासून ग्लुकोज बनवण्यासाठी आवश्यक घटक कमी पडतात. त्यामुळे शरीर कीटोन्सची निर्मिती सुरू करते. हे कीटोन्स तुमची चरबी जाळतात, मात्र अशा प्रकारे फॅट कमी केल्यास तुमच्या मसल्समध्ये दुखण्यास सुरूवात होते.  एकंदरीत, साखर सोडल्यामुळे तुम्हाला फायदाच आहे. पण पूर्णपणे गोड पदार्थ सोडल्यामुळे तुमचं नुकसानच होऊ शकतं.
First published:

Tags: Diabetes, Health, Lifestyle, Sugar

पुढील बातम्या