मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

FAU-G गेम होणार लाँच; Pre-Registration ला सुरुवात! कुठे आणि कसा करायचा डाउनलोड?

FAU-G गेम होणार लाँच; Pre-Registration ला सुरुवात! कुठे आणि कसा करायचा डाउनलोड?

FAU - G news18 lokmat

FAU - G news18 lokmat

PUBG चा देसी पर्याय म्हणून चर्चेत असलेला FauG गेम उद्या (26 जानेवारीला) लाँच होणार आहे. हा गेम कसा डाउनलोड करायचा? कुठल्या फोनवर उपलब्ध आहे, पूर्वनोंदणी कशी करायची हे वाचा..

नवी दिल्ली, 25 जानेवारी : प्रजासत्ताक दिनानिमित्ताने देशात FAU-G हा मोबाईल गेम (Mobile Game) देशभरात लाँच केला जात आहे. या गेमचे विकसक एनकोर गेम्सने (nCore Games) गेम लाँचच्या एक दिवस अगोदर Android8 आणि त्यावरील स्मार्टफोन्ससाठी (Smart Phone) पूर्व नोंदणीची (Pre registration FauG) मुदत वाढवल्याची घोषणा केली आहे. कंपनीने या गेमसाठी सर्वप्रथम नोव्हेंबर 2020 मध्ये गुगल प्ले स्टोअरवर (Google Play Store) पूर्व नोंदणी सुरु केली होती. या मोबाईल गेमसाठी सुरवातीच्या 24 तासांतच 10 लाख युजर्सनी नोंदणी केल्याचं कंपनीने स्पष्ट केले होते. मात्र, आयफोनवर (FauG for iphone) फिअऱलेस अँड युनायटेड गार्डस म्हणजेच FAU-G ही गेम कधी उपलब्ध होईल, हे अद्याप तरी स्पष्ट झालेले नाही.

ओएस 8 (OS8) किंवा त्यावरील व्हर्जेन्स असलेले मोबाईल युझर्स गुगल प्ले स्टोअरवरील सूचीवर या गेमसाठी पूर्व नोंदणी करt शकतात. यासाठी युझर्सला येथील विंडो पॉपअप होताच प्री-रजिस्ट्रेशन यावर क्लिक करावं लागेल. याखाली जेव्हा गेम लाँच होईल त्यावेळी आम्ही तुम्हाला सूचित केलं जाईल,  म्हणजेच Install when available and Ok अशा सूचना दिलेल्या आहेत.

सरकारने PUBG आणि PUBG Lite वर बंदी घातल्याची घोषणा केल्यानंतर FAU-G या गेमबाबत घोषणा करण्यात आली होती. PUBG या गेमचे मासिक अंदाजे 40 दशलक्ष युझर्स होते. मात्र या गेमवर बंदी आल्याने युझर्सला जाणवत असलेली पोकळी एन्कोरच्या नवीन गेममुळे नक्कीच भरुन निघेल, असे सूत्रांनी सांगितले. हे देखील वाचा - Aadhar Update: खोट्या वेबसाईटपासून सावधान, आधार अपडेट करण्याच्या नावाखाली होऊ शकते फसवणूक याबाबत संस्थापक विशाल गोंडाल यांनी न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की FAU-G  हा वास्तविक जीवनातील कथांवर आधारित असलेला पहिला भारतीय गेम असेल. या गेममधील पहिला स्तर हा गलवान खोऱ्यात भारतीय आणि चीनी सैन्यादरम्यान झालेल्या चकमकीवर आधारित असेल, असे विशाल गोंडाल यांनी स्पष्ट केले. बॅटल रायल मोड नसल्याने FAU-G  हा गेम PUBG सारखा नसेल, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, PUBG  भारतात पुन्हा दाखल होणार असून, ही गेम नेमकी कधी उपलब्ध होईल हे अद्याप अस्पष्ट आहे. PUBG काॅर्पने चीनमधील टेन्सेंटशी संबंध तोडले असून, भारतीय युझर्सच्या डाटा सुरक्षिततेसाठी अझ्युर क्लाऊड काॅम्प्युटिंग सर्व्हिसने मायक्रोसाॅफ्टचे (Microsoft) सहकार्य घेतले आहे.
Published by:news18 desk
First published:

Tags: India, Mobile, PUBG, Technology

पुढील बातम्या