नवी दिल्ली, 17 जून : दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे जगभरात साजरा केला जातो. यावर्षी 19 जून रोजी फादर्स डे आहे. हा खास दिवस आणखी खास बनवण्यासाठी प्रत्येकजण आपल्या वडिलांना कपडे, पुस्तके, परफ्यूम किंवा रोजच्या वापरासाठी वापरण्यात येणारी इतर कोणत्या वस्तू भेट म्हणून देतात. पण, यावेळी तुम्हाला तुमच्या वडिलांना काही खास भेटवस्तू द्यायची असेल, तर तुम्ही आर्थिक गरजा पूर्ण करणारी आर्थिक भेट देऊ शकता.
या फादर्स डे, तुम्ही तुमच्या वडिलांना आरोग्य विमा, तुमच्या वतीने म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक आणि त्यांना आर्थिक सुरक्षा आणि मनःशांती देण्यासाठी आर्थिक सल्लागाराची सेवा गिफ्ट देऊ शकता. त्यांच्यासाठी ही नक्कीच एक अप्रतिम सरप्राईज गिफ्ट असेल. तुमची ही भेट त्यांना केवळ आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवणार नाही तर त्यांचे अनेक तणाव दूर करेल.
आरोग्य विमा -
Moneycontrol.com च्या अहवालानुसार, फादर्स डेच्या दिवशी भेट म्हणून आरोग्य विमा देणे ही एक चांगली कल्पना आहे. विविध आजार कधी कोणाच्या मागे लागतील हे कळत नाही. आजकाल उपचारासाठी खूप खर्च येतो. म्हणून, जर तुमच्या वडिलांचा आरोग्य विमा नसेल, तर त्यांना भेट म्हणून आरोग्य विमा द्या. जर त्यांनी तो आधीच घेतला असेल, तर तुम्ही तो टॉप-अप करू शकता, ज्यामुळे उपचारांच्या खर्चाची मर्यादा वाढेल.
आर्थिक सल्लागार सेवा -
या फादर्स डे गिफ्टमध्ये तुम्ही तुमच्या वडिलांना चांगल्या आर्थिक नियोजकाची सेवा देखील गिफ्ट देऊ शकता. आर्थिक सल्लागार तुमच्या वडिलांच्या गरजेनुसार आर्थिक नियोजन करून देऊ शकतात. तो तुम्हाला गुंतवणुकीचे सर्वोत्तम मार्ग सांगू शकतात. यामुळे वडिलांना त्यांचे बजेट अधिक चांगल्या प्रकारे बनविण्यास मदत होऊ शकते.
हे वाचा - डोळ्यांच्या पापण्या फडफडण्याचा अर्थ काय? धार्मिक आणि वैज्ञानिक कारण समजून घ्या
आर्थिक ज्ञान देणारी पुस्तके -
या फादर्स-डेला वैयक्तिक वित्ताशी संबंधित काही पुस्तके किंवा ब्लॉग किंवा वेबसाइटचे सब्सक्रिप्शन देखील भेट देऊ शकता. यामुळे त्यांचे आर्थिक ज्ञान वाढेल आणि ते त्यांचे आर्थिक नियोजन योग्य प्रकारे करू शकतील. आजकाल अनेक वेबसाइट्स आर्थिक साक्षरतेवर भर देत आहेत. ते नवीन गुंतवणुकीचे ट्रेंड आणि कुठेही गुंतवणूक करण्याचे फायदे आणि तोटे सांगतात.
हे वाचा - मुलांच्या मेंटल ग्रोथसाठी या टिप्स आहेत उपयोगी; लहान असल्यापासूनच होईल फायदा
गिफ्टमध्ये इनवेस्टमेंट -
तुम्ही तुमच्या वडिलांसाठी फादर्स डे निमित्त त्यांच्या नावे गुंतवणूक करू शकता. तुम्ही त्यांना शेअर्स खरेदी करून देऊ शकता किंवा म्युच्युअल फंडात त्यांच्यासाठी एसआयपी सुरू करू शकता. तुम्ही हे काम 500 रुपये प्रति महिना पासून सुरू करू शकता. तुम्ही तुमच्या वडिलांसाठी मुदत ठेव देखील करू शकता. जर आपण ही भेट दिली तर कालांतराने त्यांच्याकडे एक चांगला निधी जमा होईल, जो भविष्यात त्यांच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Father, Investment