मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

निरोगी आणि तंदुरूस्त राहण्यासाठी उपवास आहे गरजेचा; नवं संशोधन आलं समोर

निरोगी आणि तंदुरूस्त राहण्यासाठी उपवास आहे गरजेचा; नवं संशोधन आलं समोर

Fasting is also necessary to Stay Healthy : उत्तम आरोग्यासाठी, आपण काय आणि किती खातो याचीच फक्त काळजी घेणं पुरेसं नाही, तर आहार घेताना केव्हा आणि कधी खावं याबाबतही काळजी घ्यायला हवी.

Fasting is also necessary to Stay Healthy : उत्तम आरोग्यासाठी, आपण काय आणि किती खातो याचीच फक्त काळजी घेणं पुरेसं नाही, तर आहार घेताना केव्हा आणि कधी खावं याबाबतही काळजी घ्यायला हवी.

Fasting is also necessary to Stay Healthy : उत्तम आरोग्यासाठी, आपण काय आणि किती खातो याचीच फक्त काळजी घेणं पुरेसं नाही, तर आहार घेताना केव्हा आणि कधी खावं याबाबतही काळजी घ्यायला हवी.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर : वजन कमी करायचे असो किंवा रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवायचे असो, यासाठी तज्ज्ञांनी बऱ्याच काळापासून अन्नातील कॅलरीज कमी ठेवण्याचा सल्ला दिला आहे. अन्नाचे प्रमाण कमी करून, चयापचय प्रक्रियेत बदल करून, त्यातून जास्तीत जास्त लाभ घेता येतो, असे तज्ञ्जांचे म्हणणं आहे. दैनिक जागरण वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, विस्कॉन्सिन-मॅडिसन विद्यापीठाच्या संशोधकांना एका नवीन अभ्यासात असे आढळून आलं आहे की, फक्त अन्नामध्ये कॅलरी कमी करणे पुरेसे नाही. तर उपवास करणेदेखील गरजेचे (Fasting is also necessary to Stay Healthy) आहे. या अभ्यासाचे निष्कर्ष जर्नल नेचर मेटाबोलिझममध्ये प्रकाशित झाले आहेत.

उत्तम आरोग्यासाठी, आपण काय आणि किती खातो याचीच फक्त काळजी घेणं पुरेसं नाही, तर आहार घेताना केव्हा आणि कधी खावं याबाबतही काळजी घ्यायला हवी.

उपवास करण्याचे फायदे

संशोधकांना असे आढळले आहे की, उपवास केल्याने म्हातारपणातील कमजोरी कमी होते आणि आयुष्य वाढते. संशोधकांनी उंदरावर केलेल्या संशोधनात असे आढळले की, दररोज कमी उष्मांक वापरणारे उंदीर, मात्र ते कधीही उपाशी राहत नव्हते, अशांचा तारुण्यातच मृत्यू होण्याचे प्रमाण नेहमी मुबलक अन्न खाणाऱ्या उंदरांच्या मृत्युच्या प्रमाणापेक्षा जास्त होते. यूडब्ल्यू स्कूल ऑफ मेडिसिन आणि पब्लिक हेल्थ मेटाबोलिझमचे डडली लेमिंग यांनी या संशोधनाचे नेतृत्व केले.

हे वाचा - भयंकर अपघात! रेल्वेनं धडक मारताच हवेत उडाल्या गाड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO

उंदरांवर प्रयोग

लॅमिंगच्या टीमने आहारानुसार उंदरांची चार गटांमध्ये विभागणी केली. एका गटातील उंदरांना पाहिजे तेवढे आणि हवे तेव्हा खायला दिले. दुसऱ्या गटातील उंदरांनी कमी कालावधीत भरपूर खाल्ले, म्हणजेच त्यांची कॅलरी कमी न करता उपवास केला गेला. इतर दोन गटांना एकाच वेळी किंवा दिवसभरात 30 टक्के कमी कॅलरीज देण्यात आल्या. म्हणजे काही उंदीरांनी जास्त दिवस उपवास केला, तर काहींनी कमी कॅलरीज घेतल्या, पण कधीही त्यांचा उपवास झाला नाही.

हे वाचा - सावधान! QR Code द्वारे होणारी ऑनलाईन फसवणूक वाढली; असा करा स्वतःचा बचाव

अभ्यासात काय निष्कर्ष

प्रयोगांमध्ये असे दिसून आले की, रक्तातील साखरेचे चांगले नियंत्रण, ऊर्जेसाठी चरबीचा वापर आणि वृद्धावस्थेतील कमजोरी टाळण्यासाठी तसेच दीर्घायुष्यासाठी कॅलरी नियंत्रणासाठी उपवास करणेदेखील आवश्यक आहे. उपवासाशिवाय कमी अन्न खाणाऱ्या उंदरांमध्ये कोणताही महत्त्वपूर्ण बदल झाला नाही. असेही सांगितले गेले की अन्नाचे प्रमाण कमी केल्याशिवाय उपवास केल्याने कॅलरी नियंत्रित करण्याइतकाच फायदा होतो. उपवासाद्वारे इन्सुलिन संवेदनशीलता वाढवता येते आणि चयापचय देखील बदलते. उपवास करणाऱ्या उंदरांचे यकृत चयापचयच्या दृष्टीने अधिक निरोगी होते.

First published:

Tags: Health, Health Tips