Home /News /lifestyle /

सावधान! अरुंद जागा, चिंचोळ्या गल्ल्यांमधून चालणाऱ्या लहान मुलांना कोरोनाचा सर्वाधिक धोका

सावधान! अरुंद जागा, चिंचोळ्या गल्ल्यांमधून चालणाऱ्या लहान मुलांना कोरोनाचा सर्वाधिक धोका

एखाद्या मॉलमधल्या चिंचोळ्या कॉरिडॉरमधून किंवा गल्लीतून गर्दी असणाऱ्या ठिकाणी एकामागोमाग चालताना कोरोना संक्रमणाचा सर्वाधिक धोका असतो आणि विशेषत: लहान मुलांना या ठिकाणी Coronavirus चा संसर्ग लवकर होऊ शकतो, असं नव्या संशोधनातून समोर आलं आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 17 डिसेंबर: एखाद्या चिंचोळ्या कॉरिडॉरमधून किंवा गल्लीतून गर्दी असणाऱ्या ठिकाणी एकामागोमाग चालताना कोरोना संक्रमणाचा धोका जास्त आहे, विशेषत: लहान मुलांमध्ये हा धोका सर्वाधिक आहे, असं एका संशोधनातून लक्षात आलं आहे. या गर्दीतील एखादा संक्रमित रुग्ण शिंकला किंवा खोकला तर त्यावेळी ड्रॉपलेट्स त्यानंतर येणाऱ्या व्यक्तीला संक्रमित करू शकताता. असा निष्कर्ष एका कॉम्प्युटर सिम्युलेशनवर आधारित संशोधनातून काढण्यात आल्याचं फिजिक्स ऑफ फ्लुइड्स (Physics of Fluids) या शास्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखात म्हटलं आहे. याआधी बीजिंगमधल्या चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सेसने (Chinese Academy of Sciences, Beijing) च्या अभ्यासानुसार मोकळ्या आणि मोठ्या जागी विषाणूचे संक्रमण सर्वाधिक होईल असं संशोधन करण्यात आलं होतं. पण नव्या संशोधनामुळे लहान ठिकाणीही असा संसर्ग होऊ शकतो हे अधोरेखित झालं आहे. या लहान कॉरिडॉरमध्ये असलेल्या भिंतीच्या माध्यमातून होणारा संसर्ग यात गृहित धरलेला नाही असं संशोधकांनी स्पष्ट केलं आहे. जर एखाद्या लहान कॉरिडॉरमधून जाणारी व्यक्ती खोकते  किंवा शिंकते तेव्हा श्वसनक्रियेतून बाहेर पडणारे ड्रॉपलेट त्याठिकाणी पसरतात. ज्याप्रमाणे पाण्यातून जाणारी एखादी बोट पुढे जाते तेव्हा तिच्या मागे आणि अवतीभोवती पाण्याचा एक पॅटर्न तयार होतो. तसंच कोविडच्या रुग्णाच्या शिंकेतून बाहेर पडलेल्या थेंबांचाही एक बुडबुडा निर्माण होतो त्याला re-circulation bubble म्हणतात तो थेट मागून येणाऱ्या माणसाला संसर्ग करू शकतो. माणसाच्या शरीराचा विचार करता या बबलचा आकार मोठा असतो. माणसाच्या शरीराचा विचार करता या बबलचा आकार मोठा असतो. संसर्गित माणसाच्या मागे दोन मीटरपर्यंत हा बबल दिसतो, असं या संशोधनाचे सहअभ्यासक झिओलेई यांग यांनी सांगितलं. संसर्गित माणूस चालत असताना त्याच्या शिंकेतून निर्माण झालेला क्लाउड वाऱ्याच्या दिशेनी प्रवास करतो. त्यामुळे या विषाणूंनी भरलेल्या क्लाउडचा अभ्यास केला गेला. एक निरीक्षण असं होतं की क्लाउडमधले शिंतोडे वेगळे होऊन हवेत पसरतात तर दुसरं निरीक्षण असं होतं की एखाद्या शेपटीप्रमाणे हे शिंतोडे हवेत तरंगत राहतात. यांग  म्हणाले, ‘ जेव्हा शिंतोडे वेगळे होऊन हवेतून प्रवास करतात तेव्हा ते शेपटीसारख्या तरंगणाऱ्या शिंतोड्यांपेक्षा अधिक घातक ठरू शकतात. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग राखणं खूपच महत्त्वाचं होतं. त्यामुळे लहान कॉरिडॉरमध्ये संसर्गित व्यक्तीच्या शिंकेतील संसर्गजन्य विषाणू मागे असलेल्या व्यक्ती श्वासोच्छवासावाटे त्यांच्या शरीरात घेऊ शकतात. ’ याचा धोका मुखत्वेकरून लहान मुलांना अधिक असतो. हा संसर्गजन्य क्लाउड हा संसर्गित मोठ्या माणसाच्या कंबरेच्या उंचीपर्यंत घोटाळत राहत असल्याने तो मुलांच्या तोंडापर्यंत थेट येऊ शकतो त्यामुळे त्यांना संसर्गाचा धोका अधिक असल्याचं शास्रज्ञांचं म्हणणं आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Corona, Coronavirus

    पुढील बातम्या