मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Cow dung Electricity | काय सांगताय? गाईच्या शेणापासून विजनिर्मिती! एक गाई 3 घरांना वर्षभर प्रकाश देणार

Cow dung Electricity | काय सांगताय? गाईच्या शेणापासून विजनिर्मिती! एक गाई 3 घरांना वर्षभर प्रकाश देणार

भारतात गाईला कामधेनू म्हणतात. कारण, ती अनेक प्रकारे मनुष्याच्या उपयोगात येते. तिच्या दुधापासून शेणापर्यंत (Cow Dung) अनेक फायदे सांगितले जातात. आता शेणापासून विजनिर्मिती (Electricity) केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. ब्रिटनमध्ये हा प्रयोग करण्यात आला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 20 नोव्हेंबर : हिंदू धर्मामध्ये गाय पवित्र मानली जाते. गायीचं शेण (Cow Dung) ग्रामीण भागामध्ये घर किंवा अंगण सारवण्यासाठी वापरलं जातं. तसंच इंधन म्हणून गोवऱ्यांच्या स्वरूपातही वापरलं जातं. अशा प्रकारे शेणाचा अनेक गोष्टींसाठी वापर केला जातो; पण तुम्हाला हे माहिती आहे का, की आता गायीच्या शेणापासून वीजनिर्मिती (Cow Dung Electricity) केली जात आहे. ब्रिटनमधल्या (Britain News) शेतकऱ्यांनी गायीच्या शेणापासून वीज निर्माण (cow poo can produce electricity) करण्याचा पर्याय शोधला आहे. ब्रिटिश शेतकऱ्यांनी गायीच्या शेणापासून एक पावडर तयार केली आहे. त्या पावडरचा वापर करून बॅटरीज बनवण्यात येत असल्याचं शेतकऱ्यांच्या एका गटाने सांगितलं.

ब्रिटिश शेतकऱ्यांनी केलेल्या प्रयोगात गायीच्या एक किलो शेणापासून एवढी वीज तयार झाली, की त्यावर व्हॅक्यूम क्लीनर पाच तास चालवता येणं शक्य आहे. ब्रिटनमधल्या अर्ला डेअरीने शेणाची पावडर बनवून बॅटरी बनवली आहे. त्याला काऊ पॅटरी असं नाव दिलं आहे. AA आकाराच्या पॅटरीजच्या साह्याने साडेतीन तासांपर्यंत कपडे इस्त्री करणं शक्य आहे. हा एक अतिशय उपयुक्त शोध असल्याचे म्हटलं जात आहे. यामुळे गोपालनाला चालना मिळू शकते.

उड उड रे COW : आकाशात उडाल्या 10 गायी, पाहणाऱ्यांना आश्चर्याचा धक्का

गायीच्या शेणापासून विजेची गरज भागवणार

अर्ला (Arla) या ब्रिटिश डेअरी को-ऑपरेटिव्हद्वारे (Dairy Co-Operative) ही बॅटरी विकसित केली जात आहे. एका गायीच्या शेणापासून तीन घरांना वर्षभर वीज मिळू शकते, असा दावा बॅटरी तज्ज्ञ GP Batteries ने केला आहे. एक किलो शेण 3.75 किलोवॉट वीज निर्माण करू शकते. अशा परिस्थितीत 4 लाख 60 हजार गायींच्या शेणापासून वीज बनवली, तर तब्बल 12 लाख ब्रिटिश घरांना वीजपुरवठा करता येऊ शकतो. डेअरी एका वर्षात 10 लाख टन शेणाचं उत्पादन करते. त्यामुळे वीजनिर्मितीचं मोठं लक्ष्य गाठलं जाऊ शकतं.

कोरोनानंतर आता Mad Cow Disease चं संकट; काय आहेत याची लक्षणं आणि कारणं?

डेअरीमध्ये शेणापासून निर्मित विजेचा वापर

अर्ला डेअरीमध्ये अनेक गोष्टींसाठी शेणापासून बनवलेली वीज वापरली जात आहे. यातून निर्माण होणारा कचरा खत म्हणून वापरला जातोय. वीज बनवण्याच्या प्रक्रियेला अॅनारोबिक डायजेशन असं म्हटलं जातं. त्यामध्ये प्राण्यांच्या विष्ठेपासून वीज तयार केली जाते. डेअरीमध्ये 4,60,000 गायी आहेत. या गायींचं शेण वाळवून त्याचं रूपांतर पावडरमध्ये केलं जातं आणि त्यापासून वीज निर्माण केली जाते. सरकारने याकडे लक्ष दिल्यास अक्षय ऊर्जा पुरवठ्यात हा एक मैलाचा दगड ठरू शकतो, अशी प्रतिक्रिया Daily Star शी बोलताना अर्लाच्या (Arla) कृषी संचालकांनी दिली.

First published:

Tags: Cow science