Home /News /lifestyle /

हा शेतकरी 15 देशांमध्ये निर्यात करतोय Food processing Machine; 8000 लोकांना दिलाय रोजगार

हा शेतकरी 15 देशांमध्ये निर्यात करतोय Food processing Machine; 8000 लोकांना दिलाय रोजगार

धर्मबीर कंबोज सुरुवातीपासूनच प्रयोगशील होते, पण फूड प्रोसेसिंग मशीन बनवण्याची कल्पना त्यांना रेल्वे प्रवासादरम्यान आली. वास्तविक, तेव्हा कंबोज अजमेरला जाणार होते. त्यांच्या शेजारी शेतकरी बसले होते.

    नवी दिल्ली, 18 जानेवारी : धर्मबीर कंबोज हे शेतकरी अन्न प्रक्रिया (Food processing Machine) मशीन बनवतात. विशेष म्हणजे त्यांच्याकडे अभियांत्रिकी आणि व्यवस्थापनामधील कसली पदवी देखील नाही. असे असूनही त्यांच्या मशीन्स इतक्या चांगल्या आहेत की, त्यांना परदेशातून ऑर्डर्स येतात. आतापर्यंत त्यांनी 15 देशांमध्ये या मशीन्सची निर्यात केली आहे. फूड प्रोसेसिंग मशीन्स बनवून ते स्वतःचे उत्पन्न तर वाढवत आहेतच शिवाय शेतकऱ्यांना मदतही करत आहेत. यासोबतच त्यांनी आतापर्यंत 8000 लोकांना रोजगार दिला आहे. फायनान्शिअल एक्स्प्रेस आणि टीव्ही 9 ने दिलेल्या वृत्तानुसार, हरियाणातील धर्मबीर कंबोज सुरुवातीपासूनच प्रयोगशील होते, पण फूड प्रोसेसिंग मशीन बनवण्याची कल्पना त्यांना रेल्वे प्रवासादरम्यान आली. वास्तविक, तेव्हा कंबोज अजमेरला जाणार होते. त्यांच्या शेजारी शेतकरी बसले होते. त्यांच्याशी संवादादरम्यान त्यांनी आवळ्यावर प्रक्रिया आणि गुलाबपाणी काढताना येणाऱ्या समस्या जाणून घेतल्या. तेव्हाच कंबोज यांनी शेतीच्या कामांसाठी प्रोसेसिंग मशीन बनवण्याचा निर्णय घेतला. कंपनीची उलाढाल 1 कोटी कंबोज सांगतात की, मी फूड प्रोसेसिंग मशीन बनवली, पण सुरुवातीला त्याचा दर्जा चांगला नव्हता. तेव्हाही बाजारात अशी यंत्रे नव्हती. 2012 मध्ये कंबोज यांनी नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशनच्या मदतीने मशीनमध्ये सुधारणा केली आणि आज हे मशीन एका तासात 200 लिटर रस काढते. हा प्रवास तितका सोपा नव्हता. दहावीपर्यंत शिकलेल्या कंबोज यांना या मशीनचा प्रोटेटाइप बनवण्यासाठी 8 महिने लागले. हे वाचा - Hot Water Benefits at Night: सकाळी ठीक आहे, पण रात्री गरम पाणी पिण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत नसतील सुरुवातीच्या यशाने आनंदित झालेल्या कंबोज यांनी 2017 मध्ये त्यांची धर्मबीर फूड प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन केली. आज त्यांचे संपूर्ण देशभरात ग्राहक आहेत. यासोबतच ते त्यांची मशीन 15 देशांमध्ये निर्यात करतात. सध्या त्यांची कंपनी दर महिन्याला 15 ते 20 मशीन बनवते. गेल्या वर्षी आमची उलाढाल एक कोटींवर पोहोचल्याचे कंबोज यांनी सांगितले. आमचा प्रयत्न अशी मशीन्स बनवण्याचा आहे, ज्यामुळे शेतकर्‍यांचा वेळ वाचेल आणि त्यांना खूप कमी मेहनत घ्यावी लागेल. हे वाचा - Budget 2022 : दुचाकी गाड्या स्वस्त होणार! सरकार GST कमी करून किंमती खाली आणणार? 100 देशांमध्ये निर्यात करण्याचा कंपनीचा मानस भविष्यातील योजनांबद्दल बोलताना ते म्हणतात की कंपनीची फूड प्रोसेसिंग मशिन्स 5 वर्षांत जवळपास 100 देशांमध्ये निर्यात करण्याचा मानस आहे. या आर्थिक वर्षात व्यवसाय 2 कोटी रुपयांपर्यंत आणि आर्थिक वर्ष 27 पर्यंत सुमारे 10 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य आहे. कंबोज यांनी आतापर्यंत सुमारे 900 मशिन्सची विक्री केली असून, त्यातून जवळपास 8,000 लोकांना रोजगार मिळाला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Agriculture, Farmer

    पुढील बातम्या