Home /News /lifestyle /

भारतीयांचा Sex विषयक गंड दूर करणारे प्रख्यात सेक्सॉलॉजिस्ट डॉ. वत्सा यांचं निधन; नव्वदीतही होते कार्यरत

भारतीयांचा Sex विषयक गंड दूर करणारे प्रख्यात सेक्सॉलॉजिस्ट डॉ. वत्सा यांचं निधन; नव्वदीतही होते कार्यरत

sexul Wellness हा विषय आजच्या आधुनिक काळातही आपल्याकडे टॅबू मानला जातो. मात्र या विषयाचं निषिद्धपण नष्ट करत त्याकडे पाहण्याचा शास्त्रीय (scientific) दृष्टीकोन रुजवणारे सेक्सपर्ट म्हणून डॉ. वत्सा यांचं नाव कायम राहील.

    मुंबई, 28 डिसेंबर : अत्यंत नाजूक, खूप पर्सनल आणि चार चौघात बोलू शकत नाही असा विषय Sex. सेक्स (sexul Wellness) हा विषय आजच्या आधुनिक काळातही भारतीयांमध्ये टॅबू मानला जातो. मात्र या विषयाचं निषिद्धपण नष्ट करत त्याकडे पाहण्याचा शास्त्रीय (scientific) दृष्टीकोन रुजवणारे लोक म्हणजे सेक्सॉलॉजिस्ट्स. अशाच एका आयुष्य समर्पित करणाऱ्या भारतीय सेक्सॉलॉजिस्टच्या (sexologist) निधनानं असंख्य लोक आज हळहळत आहेत. हे व्यक्तिमत्व म्हणजे, डॉ. महिंदर वत्सा (Dr. Mahinder Watsa). डॉ. महिंदर वत्सा यांचं आज वयाच्या 96 व्या वर्षी निधन झालं. एका बड्या वृत्तपत्रात 'आस्क द सेक्सपर्ट' या नावानं त्यांनी सलग 10 वर्ष चालवलेला कॉलम खूप लोकप्रिय ठरला. ते आयुष्याच्या अखेरपर्यंत निरंतरपणे याविषयी समुपदेशन करत होते. सेक्स्शुअल वेलनेसविषयी सल्ला देत होते. सेक्सबाबतच्या सामान्य माणसांच्या समस्या आणि शंकांना ते या कॉलममध्ये खूप तर्कशुद्ध स्पष्टतेसह आणि कधीकधी नर्मविनोदी शैलीतही उत्तर द्यायचे. लोकांना त्यांची शैली खूप आवडत असे. मुंबई मिररमधला त्यांचा सेक्सपर्ट हा कॉलम कमालीचा लोकप्रिय झाला होता. 80 वर्षांचे तज्ज्ञ आजोबा आपल्या अत्यंत खासही, सेक्सविषयीच्या प्रश्नांना अशा प्रकारे हसत-खेळत पण शास्त्रोक्त पद्धतीची उत्तरं देत आहेत, हेच वेगळं होतं. त्यामुळेच डॉ. वत्सा यांच्यासारख्या अनुभवी समुपदेशकाला कमालीची लोकप्रियता मिळाली. डॉ. वत्सा याविषयी मोकळेपणाने मुख्य प्रवाहातल्या माध्यमांमध्ये सेक्शुअल वेलनेसबद्दल लिहिलं. लोकांच्या मनातल्या शंका दूर करण्याचा प्रयत्न केला. तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत, सगळ्या वयोगटाच्या लोकांच्या सर्व प्रकारच्या सेक्स समस्या आदर्श पद्धतीने सोडवण्यात वत्सा यांनी पूर्ण आयुष्य गुंतवलं. सेक्सपर्टसोबतच ते स्त्रीरोगविशेषज्ञही होते. त्यांनी वयाच्या 80 व्या वर्षी सुरू केलेला कॉलम अगदी अखेरच्या दिवसापर्यंत सुरू होता. यामाध्यमातून जवळपास 20 हजार वाचकांच्या प्रशांना त्यांनी उत्तरं दिली. याशिवाय आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांनी 40 हजाराहून अधिक लोकांना समुपदेशकाच्या रूपात सल्ला दिला. डॉ. वत्सा यांना पहिल्यांदा 1960 साली एका मासिकानं सेक्सपर्ट या नात्यानं कॉलम लिहिण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र तेव्हा आपल्याला अजून पुरेसा अनुभव नसल्याचं सांगत त्यांनी हा प्रस्ताव नाकारला होता. मात्र काही काळानंतर त्यांना सेक्स एजुकेशनच्या अभावामुळे लोकांमध्ये असलेल्या संभ्रमांबाबत समजू लागलं. कारण लोक त्यांना याबाबत लिहून पाठवू लागले होते. त्यांनी सर्वात आधी फॅमिली प्लॅनींग असोसिएशन ऑफ इंडिया (FPAI ) सोबत जोडून घेत काम सुरू केलं. त्यानंतर कौन्सिल ऑफ सेक्स एजुकेशन अँड पॅरेण्टहूड इंटरनेशन (CSEPI) ची त्यांनी स्थापना केली. भारतीयांमध्ये कुटुंब नियोजनाचं महत्त्व रुजवण्यात त्यांनी मोठं योगदान दिलं. आयुष्यभर आपल्या अटींवर ते मनापासून जगले असं त्यांच्या मुलांनी त्यांच्याबाबत भावना व्यक्त करताना सांगितलं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Sexual wellness

    पुढील बातम्या