उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्ही या 10 ठिकाणी जायलाचं हवं!

उन्हाळ्याच्या सुट्टीत थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जाण्याकडे अधिक ओढा असतो. या सुट्टीत आवर्जुन भेट द्यावी अशी 10 थंड हवेची ठिकाणं.

  • Share this:

 हिमाचल प्रदेश- हिमाचल प्रदेशमध्ये सफरचंदांच्या बागा, सतलज घाटीमध्ये वसलेलं सराहन पर्यटन स्थळ, देवदारचं जंगल, पाट्यांचं छप्पर असलेली घरं याशिवाय कांगडा आणि ज्वालाजी मंदिर ही इथली प्रसिद्ध ठिकाणं आहेत.

मध्य प्रदेश- मध्य प्रदेशातील पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण झऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. होशंगाबाद जिल्ह्यापासून 1100 मीटर उंचावर असलेलं पंचमढी हे सर्वात उंच आणि थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखलं जातं. वाघांसाठी प्रसिद्ध असणारं बांधवगढ उद्यान हे पाहण्यासारखं आहे.

उत्तराखंड- मसुरी हे इथलं पर्यटकांचं आवाडते पर्यटनस्थळ. म्युन्सिपल गार्डन हे इथे आकर्षणाचं केंद्र आहे.

अरूणाचल प्रदेश- शांत वाहणारे झरे, चहू बाजूंनी बर्फ, उंच धबधबे निसर्गाचा नयनरम्य देखावा डोळ्यांनी अनुभवण्यासाठी अरूणाचल प्रदेशातील तवांग या ठिकाणी नक्कीच भेट द्यायला हवी.

लोणावळा- महाराष्ट्रातील लोणावळ आणि खंडाळा सर्वात जुनी पर्यटनस्थळं आहेत. उंच कडे, धबधबा हे या प्रदेशाचं वैशिष्ट आहे. लोणावळ्याची चिक्की जीभेवर ठेवताच पाणी होणारी आणि लोणावळा चिक्की म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं.

लोणावळा- महाराष्ट्रातील लोणावळ आणि खंडाळा सर्वात जुनी पर्यटनस्थळं आहेत. उंच कडे, डोंगरांवरून वाहणारे धबधबे हे या प्रदेशाचं वैशिष्ट आहे. लोणावळा चिक्की म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं. चिक्की तोंडात ठेवताच विरघळते अशा प्रसिद्ध चिक्कीची चवही चाखता येते

महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगांवर समुद्र सपाटीपासून सुमारे ४५०० फुट उंचीवर वसलेले महाबळेश्वर ठिकाण आहे. धरतीनं जणू हिरवा शालू नेसला आहे असा निसर्गाचा अद्भूत अनुभव, सुंदर बगीचे, पाहण्यासाठी या पर्यटन स्थळाला आवर्जून भेट द्यायला हवी.

केरळ- मुन्नार हे केरळमधील थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. शांत, थंड वातावरण, चहाचे मळे तिन्ही बाजूंनी डोंगररांगा पाहण्यासाठी मुन्नारला भेट द्यावी.

केरळ वायनाड- केरळचा स्वर्ग म्हणून वायनाडची ओळख आहे. सुंदर धबधबे, हिरवागार परिसर, कॉफीचे मळे, आणखी बरंच काही तुम्हाला स्वर्गसुख देऊन जातं

केरळ- केरळचा स्वर्ग म्हणून वायनाडची ओळख आहे. सुंदर धबधबे, हिरवागार परिसर, कॉफीचे मळे, आणखी बरंच काही तुम्हाला स्वर्गसुख देऊन जातं.

आंध्र प्रदेश- आंध्रप्रदेशच्या पर्वतीय सौंदर्याचं प्रतीक म्हणून या होर्सले पर्वतरांगा प्रसिद्ध आहेत. इथे रॅपलींग, ट्रेकींग, रॉक क्लायम्बींग वगैरेही करता येईल. इथून कौंडीण्य वन्यजीव अभयारण्यही जवळच आहे.

आंध्र प्रदेश- आंध्रप्रदेशच्या पर्वतीय सौंदर्याचं प्रतीक म्हणून या होर्सले पर्वतरांगा प्रसिद्ध आहेत. इथे रॅपलींग, ट्रेकींग, रॉक क्लायम्बिंग वगैरेही करता येईल. इथून कौंडीण्य वन्यजीव अभयारण्यही जवळच आहे.

तमिळनाडू राज्यातील उटी सुंदर पर्यटन स्थळ आहे. तामिळनाडू प्रांतातील नीलगिरीच्या डोंगरांनी भरलेलं हे पर्यटन स्थळ आहे. उटी झील, डोडाबेट्टा चोटी, कालहट्टी जलप्रपात, कोटागिरी हिल यांसारखे लोकप्रिय ठिकाणं आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 7, 2019 04:05 PM IST

ताज्या बातम्या