Home /News /lifestyle /

वाह रे पठ्ठ्या! अभ्यास न केल्यामुळं घरच्यांनी फटकारलं तर, पार्टीसाठी दीड लाख घेऊन गोव्यात झाला पसार

वाह रे पठ्ठ्या! अभ्यास न केल्यामुळं घरच्यांनी फटकारलं तर, पार्टीसाठी दीड लाख घेऊन गोव्यात झाला पसार

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

चौदा वर्षाच्या एका मुलानं (14 Year old boy) अभ्यास (Study) केला नाही म्हणून कुटुंबियांनी फटकारलं म्हणून हा पठ्ठ्या घर सोडून पळाला आणि जाताना घरातील दीड लाख रुपयेही चोरले. त्यानंतर या पैशात त्यानं गोव्याच्या (Goa) नाईटक्लबमध्ये (Night club) जोरदार पार्टी (party) केली आहे.

पुढे वाचा ...
    वडोदरा, 1 जानेवारी : खरंतर मोबाइल फोन आणि व्हिडिओ गेम्सच्या युगात जन्मलेल्या पिढीला अभ्यास म्हटलं की अंगावर काटा येतो. आताचे पालकही आपल्या मुलांना अभ्यास केला नाही म्हणून फारसं पूर्वीप्रमाणे रागावत नाहीत. चुकून कधी एखादं दुसरा शब्द जास्त बोलला, तर मुलं कोणतं पाऊलं उचलतील सांगता येत नाही. अभ्यास केला नाही म्हणून घरच्यांनी फटकारलं म्हणून दहावीत शिकणाऱ्या एका 14 वर्षाच्या मुलांनं अजब गजब प्रकार केला आहे. त्यानं घरातील चक्क दीड लाख रुपये चोरून थेट गोवा गाठला आहे. आणि सर्व पैसे संपेपर्यंत यानं गोव्यात नाईट क्लबमध्ये पार्टी केली आहे. ही गुजरातमधील वडोदरा येथील आहे. येथील चौदा वर्षाच्या मुलानं अभ्यासाकडं लक्ष दिलं नाही कुटुंबियांनी फटकारलं असता, हा पठ्ठ्या दीड लाख रुपये घेऊन पळून गेला आहे. या पैशांची त्यानं गोव्याच्या नाईटक्लबमध्ये जोरदार पार्टी केली आहे. त्यानंतर जेव्हा पैसे संपले तेव्हा त्यानं गुजरातला (Gujrat) परत जाण्याची विचार केला. यानंतर शनिवारी पोलिसांच्या मदतीनं मुलाला त्याच्या घरी नेण्यात आलं आहे. इंग्रजी वृत्तपत्र ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ च्या वृत्तानुसार, हा 14 वर्षाचा मुलगा दहावीत शिकतो. अभ्यास न केल्यामुळे त्याच्या घरातील सदस्यांनी त्याला फटकारलं होतं. थोड्या वेळाने त्याच्या आजोबांनीही त्याला फटकारलं. यामुळं तो रागाच्या भरात घराबाहेर पडला. त्याला रेल्वेने गोव्याला जायचं होतं पण आधार कार्ड नसल्यामुळे त्याला तिकीट मिळालं नाही. त्यानंतर तो बसस्थानकात पोहोचला. बडोद्याहून तो आधी पुण्यात आला आणि मग येथून दुसर्‍या बसने गोव्याला पोहोचला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलानं गोव्यातील नाईट क्लबमध्ये दीड लाख रुपये खर्च केले आहेत. पण त्याचे सर्व पैसे संपताच त्याने गुजरातला परत जाण्याची योजना आखली होती. त्यानंतर या मुलानं पुण्यातून एक नवीन सिम कार्ड देखील खरेदी केलं होतं. यानंतर, तो ट्रॅव्हल एजंटकडून तिकिट घेऊन गुजरातमध्ये पोहोचण्याची तयारी करत होता. पण त्याने मोबाईलमध्ये नवीन सिमकार्ड टाकताच पुणे पोलिसांनी त्याचा मागोवा घेतला. त्यानंतर गुजरात पोलीस त्याला पकडण्यासाठी पुण्यात पोहचली आणि त्याला पकडलं. संबंधित मुलाला पोलिसांनी 25 डिसेंबरला त्याच्या कुटुंबीयांकडे सोपवलं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Goa, Student

    पुढील बातम्या