मथुरेच्या नंद मंदिरात नमाज पठण करणारा फैजल खान आहे तरी कोण?

मथुरेच्या नंद मंदिरात नमाज पठण करणारा फैजल खान आहे तरी कोण?

मंदिरात मुस्लिम तरुणांनी नमाज पठण करताच फोटो व्हायरल झाले आणि त्याच्यावरून वाद सुरू झाला.

  • Share this:

मथुरा, 04 नोव्हेंबर :  29 ऑक्टोबरला 4 मुस्लिम व्यक्तींनी मथुरेतल्या (mathura) नंद मंदिराच्या परिसरात नमाज पठण केलं आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. फोटो व्हायरल होताच पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवून त्यांना अटक केली.  या चौघांवर कलम 153-A (धर्माच्या आधारावर वेगवेगळ्या समाजात तेढ निर्माण करणं), 295 (एखाद्या धर्माचा अपमान करण्याच्या हेतूने त्या धर्माच्या प्रार्थनास्थळाला अपवित्र करणं), आणि 505 (जाहीरपणे गुन्हा करणं) अंतर्गत खटला दाखल करण्यात आला. यापैकी एक म्हणजे फैजल खान (faizal khan).

फैजल खान आपण खुदाई खिदमतगार संघटनेचा राष्ट्रीय संयोजक असून गांधीवादी कार्यकर्ता असल्याचं सांगतो. खुदाई खिदमतगार संघटनेची स्थापना सरहद्द गांधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खान अब्दुल गफार खान यांनी 1929 मध्ये केली होती. त्यामुळेच ही संघटना गांधीजींच्या अहिंसेच्या तत्त्वावर चालते. खुदाई खिदमतगार या फार्सी शब्दाचा अर्थ देवाने तयार केलेल्या दुनियेचा सेवक. या संघटनेचे पुरुष सदस्य लाल शर्ट आणि महिला काळे कपडे घालायच्या. त्यांना फाळणीविरहित स्वातंत्र्य हवं होतं. स्वातंत्र्यपूर्वकाळात अखंड हिंदुस्थान असताना खैबर पख्तुनख्वा प्रांतात या संघटनेचं मोठं काम होतं.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर खुदाई खिदमतगार संघटना बंद झाली होती. पण 2011 मध्ये फैजल खानने ती पुनरुज्जिवित केली. मंदिरात नमाज पठण करणारी हीच ती व्यक्ती. फैजलच्या फेसबुक प्रोफाइलचा हवाला संस्था देते आणि तो एकात्मतेचं काम करत आहे असं सांगते. फेसबुक प्रोफाइलवरच्या मुख्य फोटोमध्ये फैजल एका हिंदू कुटुंबात जेवताना दिसतो आहे. त्याचबरोबर पुजाऱ्याच्या वेशातील व्यक्ती त्यांच्या शेजारी बसलेली दिसते.

हे वाचा - इंग्लंडच्या दरबारात ज्यांचे झाले कौतुक, ते हात आता फोडत आहेत दगड!

त्यानं व्हॉट्सअप स्टेटसमध्ये स्वत:च मंदिरात नमाज पठण केल्याचं सांगितलं. जुहरच्या नमाजाची वेळ झाल्यावर मुख्य पुजाऱ्यांनीच त्याला तिथं नमाज पठण करायला दिलं, असं तो सांगतो. पण त्याला दुजोरा देण्यात आलेला नाही. तसं तर फैजल स्वत: ला कृष्णभक्त म्हणून घेतो आणि एखाद्या फोटोत कपाळावर टिळा लावून देवाची पूजा करतानाही तो दिसतो.

हे वाचा - 4 वर्षांच्या चिमुकल्यानं मृत्यूला दिला हुल ,91तासांनंतर ढिगाऱ्याखालून जिवंत काढल

फैजलच्या अटकेनंतर खुदाई खिदमतगार संस्थेने अधिकृत पत्रक काढलं. गेल्या दहा वर्षांपासून संघटना हिंदू-मुस्लिम एकतेसाठी काम करत आहे. गोवर्धनच्या प्राचीन चौरासी कोसी यात्रेत फैजल सहभागी झाला आहे. त्याचवेळी नमाज पठणाची वेळ झाल्यामुळे असं झालं. फैजल गांधीवादी कार्यकर्ता असून त्यांची संस्था धार्मिक सलोख्यासाठी काम करते. त्यामुळे अपमान करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं संस्थेनं सांगतिलं.

Published by: Priya Lad
First published: November 4, 2020, 6:03 PM IST
Tags: temple

ताज्या बातम्या